पत्नी परमेश्वर

It's A story Of Female Doctor


दिवसभर कोरोना बद्दल न्यूज बघून मी पूरता घाबरलोय..मला मान्य आहे मला वर्क फ्राँम होम दिलय पण तीचं काय...

मला काय दिवसभर आँफीसचं काम घरी कसं पण लोळा पण जेव्हा साधा चहा बनवायला गेल्यावर चटका जेव्हा बसतोना तेव्हा तीची आठवन येते...

केबलचं बील, लाईट बील, दूध वाल्याचा हफ्ता, किराणामालाची किचनमध्ये रितसर पद्घतीने केलेली मांडनी हे सगळं ती कसबरं करते याची सतत चिंता वाटते..

सध्या बरं आहे मुलाना सुट्टी आहे पण शाळा सुरू असतानी त्यांना अंघोळ घालने , डबा करने हे ती खूप पटापट करायची आणि आता मी पण काहीवेळेस अंघोळ करत नाही आणि मूलं पण करत नाही आळशी बनून गेलयं घर तीच्या शिवाय.

तिचा विचार करतानी तेवढ्यात तीचा काँल आला..

ती - हँलो ....काय करताय ?

मी - काही नाही कामं चालूयेत..

ती - मुलं कशी आहेत..

मी - कशी असनारं...सतत विचारतात मम्मी कधी येणार घरी...

ती - (हुंदका देत ) मला पण तूमच्या सगळ्यांची खूप आठवन येते रोज....या हाँस्पीटलच्या भींतीशी बोलते मी रोज...कोणी लहान मूल पेंशट म्हणून आलं की त्यात आपल्या मुलांना शोधते मी... सरकार कडून जेवायची सोय झालीये..पण मला घरचं जेवन खायचंय ओ...मला ना खूप रडायला येतयं

मी - ये वेडाबाई...असं रडू नको गं... ए माझी डँशींग बायको..तूच अशी रडत बसली तर पेंशटला कोण आधार देणार....वाटलसं तर एकदा ये घरी लांबून तरी बघ आम्हाला..गेले 20 दिवस झाले तू घरी नाही आलीस...

ती- कदाचीत आता मी लवकर नाही येऊ शकनार..

मी -का ?..असं का बोलतेयस तू ?

ती -मी सांगनार नव्हते तूम्हाला...पण तूमच्या शिवाय कोण आहे माझं ? , दुख: शेअर करायला ?...दोन तीन दिवसांपासून खोकला येत होता सारखा कालचं टेस्ट केल्या ..रिपोर्ट पाँसीटीव आलाय..आता मीच पेशंट झालेय...खूप थकवा येतोय ओ.. माझं काही बरं वाईट झालं तर पोरांची काळजी घ्या..

मी- ये गप बस तू काही नाही होणार तूला... तू तर परमेश्वर आहे सगळ्या कोरोनाग्रस्तांना वाचवनारी, तूला काही नाही होणारं...तू गेलीस तर माझं काय होईल...तूला लग्न झाल्यावरचं सांगीतलं होतं ..माझं सर्वस्व तू आहेस शेवटी माझे ह्रदय तूला दिलयं मी...त्याची काळजी घे...

ती - हो..आणि माझंही ह्रदय मी तूम्हाला दिलयं...बरं ठेवते फोन आता....पून्हा फोन नाही आला दोन दिवसात तर (आवंढा गिळत) समजून घ्या...(हुदका देत) बाय...


समाप्त..