का...?कधी कधी अस होतं, आपण कोणावर तरी इतके प्रेम करतो पण त्याला त्याची अजिबात जाणीव नसते
का ...?कधी कधी अस होत.,
आपले मन कोणासाठी तरी इतके झुरते
पण त्याल्या त्याची अजिबात कदर नसते
का...?कधी कधी असं होत,
ज्या व्यक्ती शिवाय आपण जगूच शकत नाही,
ती व्यक्ती मात्र आपल्याशिवाय ही खूप आनंदी राहते.
का..? कधी कधी अस होतं,
आपल्या असण्याची ज्या व्यक्तीला जाणिवच नसते
त्या व्यक्तीला मिळवण्यासाठी आपण
आपले अस्तित्वच पणाला लावतो.
का..? कधी कधी अस होत,
ती व्यक्ती आपल्या नजरे समोर दुसऱ्या कोणाला तरी
आपलंसं करते ,आणि
आपण मात्र तिच्यासाठी कवडीमोल ठरतो.
का आपण असं आंधळे प्रेम करतो
जे आपले कधी होणारच नाही त्याची आयुष्यभर वाट पाहतो
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा