लोक काहीही बोलतील..त्यासाठी मातृभाषेचा त्याग का?

People will talk always but you needto decide your priorities..Mother toung should ne never be a second choice.

नोकरीनिमित्ताने परराज्यात राहत असलेल्या वीणा आणि नितेशचा एकुलता एक मुलगा,विराज अतिशय गोंडस आणि गुणी..दोनच वर्षांचा पण अतिशय बोलका आणि हुशार पण बाहेर गेल्यावर किंवा मुलांमधे जास्त खुलत नव्हता,मिसळत नव्हता कारण घरात फक्त मराठीतच संवाद व्हायचा,फारतर एखादं वाक्य किंवा काही शब्द इंग्रजी वापरले जायचे..
आजूबाजूचे लोक नेहमी वीणाला त्यावरून ऐकवायचे तो एकटा पडेल,त्याला बोललेलं समजत नाही,मातृभाषा इथे कामी येणार नाही,मातृभाषा कधीही शिकता येईल,त्याच्याशी तुम्ही इथल्या बोलीभाषेत संवाद साधा वगैरे..
शेवटी त्या दोघांनी ठरवलं,लोक काहीही बोलतील त्यासाठी आपण आपली मायबोली का विसरावी?मराठी माध्यमात शिकूनसुद्धा आपणही शिकलोच की इंग्रजी आणि इथे आल्यावर इथलीही भाषा...आपलं मुलंही हळूहळू शिकेलच..आपण आपल्याला जे पटतं ते करावं.