जलद लेखन स्पर्धा - नोव्हेंबर
विषय - अधूरी प्रेमकहाणी
शीर्षक - असं का झालं?
( भाग -३) अंतिम
लेखिका - स्वाती बालूरकर , सखी
" तर नंदू! मन घट्ट कर आणि ऐक, तुझी ती मैत्रीण श्यामल आता जगात नाहीय!"
" काय सांगताय सर, नाही ! असं होऊ शकत नाही. काहीही काय बोलताय? काय झालं तिला?"
" अरे मुर्खा तुझ्या कर्माची फळ तिने भोगली !तुझ्या मित्रांनीच तिला . . . जाऊ दे! तर जीव दिला ना त्या पोरीने! उडी मारली डोंगरावरून!"
"नाही सर. . . नाही!" आता मात्र नंदू कोसळलाच. तिची आठवण आली तरी बेचैन व्हायचा, ती वेगळी गोष्ट!
ती जगात नाही हे दुःख वेगळं दुसरच आणि तिने जीव दिला आहे हे तिसरंच !
ती जगात नाही हे दुःख वेगळं दुसरच आणि तिने जीव दिला आहे हे तिसरंच !
आता गंभीरतेने विचार करता त्याच्या लक्षात आलं होतं, तो नेमका कुठे फसला आहे!
म्हणजे श्यामलच्या जीव देण्यामागे पोलीस त्याला जबाबदार ठरवतायत आणि म्हणून त्यांनी त्याला अटक केली होती.
आता मात्र तो मोठ्या -मोठ्या ने रडायला लागला.
" साहेब मी काही नाही केलं, मला ती खूप आवडली होती. माझी मैत्रीण होती, मला नोकरी लागली की मी लग्न केलं असतं तिच्याशी. मी आता काय करू ?"
"नको रडू , तुमच्यासारखे मुलं तरूण पोरींना टाईमपास समजतात. ज्यांना लग्न करायचं असतं ना ते मुलीला घेऊन असा निर्जन ठिकाणी जात नाहीत , नको ती कामं करायला.?"
तो शांतच होऊन गेला.
नंदूला सतत श्यामलचा व घरी आई वडिल व बहिणीचा चेहरा आठवत होता.
दोन दिवसात आई वडिलही इकडे आले नाहीत म्हणजे ते आता माझा तिरस्कार करत असतील.
पण मी काहीच केलं नाही.
गिरणीवर जाऊन जाऊन , तिला पाहून ती आवडत होती. मग बस स्टॉपवर जुजबी ओळख झाली होती पण तो वेड्यासारखा तिच्या प्रेमात होता.
हळू हळू फोन नंबर मिळाले, मैत्री वाढली.
कधी कधी बोलणं व्हायचं, रोजच नाही.
एकदा दोघांनी सोबत कॉफी पण पिली होती.
पण प्रत्येकवेळी भेटण्यासाठी हॉटेल मधे जाणं परवडणारं नव्हतं . तो कमावत नव्हता आणि ती कमवायची पण तिचा पगार घरी द्यावा लागायचा , परिस्थिती तशी बेताचीच होती. एकदा तिचा हात हातात घेतला होता. तेव्हापासून नंदूला सारखंच तिला भेटावं , पहात रहावं , तिला मिठी मारावी आणि जवळ घ्यावं वगैरे वगैरे सतत वाटायला लागलं.
पण गर्दीत शक्य नव्हतं शिवाय कुणी पाहण्याची व ओळखीचं कुणी भेटण्याची शक्यता होती.
त्याच्या त्या तथाकथित मित्रांनी त्याला सल्ला दिला होता की जंगलात , निर्जन जागी ,दरी डोंगरात जा व निवांत वेळ घालव वगैरे. त्याला कल्पनाही नव्हती की ते असं काही करतील म्हणून!

एकांतात भेटण्याची कल्पना तिलाही आवडली होती म्हणून वीकली ऑफ दिवशी ती नंदूबरोबर गाडीवर तिकडे आली होती.
नंदू विचारात असताना शिंदे हवालदार आत आले , " ए पोरा हा तुझाच फोन ना ?"
"हो माझाच सर , कुठे सापडला ?"
"घटनास्थळी मिळालय. बंद होता , आता चालू केलाय आम्ही. याचं लॉक उघड!"
"हो माझाच सर , कुठे सापडला ?"
"घटनास्थळी मिळालय. बंद होता , आता चालू केलाय आम्ही. याचं लॉक उघड!"
नंदू व्यवस्थित कॉपरेट करत होता.
त्याचा फोन उघडल्यावर पोलीसांना कळालं की नंदूने त्या चिल्लर मित्रांच्या ग्रुपवर टाकलं होतं. . "मी खूप एक्सायटेड आहे मित्रांनो, तुमच्यासल्ल्यानुसार तिला घेवून डेटवर जातोय, संध्याकाऴी त्या गावामागच्या डोंगरावर!"

या एका पोस्टमुळे त्या मुलीचा जीव गेला होता.
दोन दिवस तपासकार्य चालू होतं पण तिसर्या दिवशी डोंगराखालच्या जंगलात मुलीचा मृतदेह सापडला होता व डॉक्टरांनी शंका व्यक्त केली होती की तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला होता.
हे कळालं आणि नंदूने कस्टडीतच स्वतःला लटकून घेण्याचा प्रयत्न केला.
आवडलेल्या मुलीला स्पर्श करायलाही न धजावलेल्या सामान्य मुलाच्या एका मेसेजमुळे त्या मुलीला नरक भोगून जीव गमवावा लागला होता. तिच्या किंकाळ्या त्याचा पाठलाग करू लागल्या. तो बेशुद्ध होता तेव्हा हे सगळं झालं तर श्यामल ने स्वतःला किती असहाय्य अनुभव केलं असेल या कल्पनेने तो स्वतःला धिक्कारत होता.

ही केस मोठी झाली.
पेपरबाजी झाली , वेगवेगळी टिवी चॅनल कवर स्टोरी बनवू लागली.
दरम्यान फरार अपराधी , दोघे सापडले आणि त्यांनी बेदम मार खाल्यावर गुन्ह्याची कबूली दिली.
त्या्नी सांगितलं की नंदूला मारून बेशुद्ध केल्यावर तिच्यावर अतिप्रसंग करण्यात आला व तोंड उघडल्यास विडिओ वायरल करण्याची धमकी दिली गेली.
जिवाच्या आकांताने रडणारी अन ओरडणारी ती भविष्याची कल्पना करून भेदरली आणि या मुलां देखतच ती डोंगराच्या टोकापर्यंत गेली आणि त्यांच्यादेखत तिने वेगाने खाली उडी टाकली.

सुदैव की दुर्दैव पण संध्याकाळच्या लाल केशरी प्रकाशात विडीयो ग्राफी करणार्या मुलांच्या ग्रुपने या मुलीला पडताना पाहिलं , ते दृश्य त्यांच्या कॅमेरात कैद झालं आणि त्यांनी पोलिसांना कळवलं होतं.
पोलिस तिथे पोहोचले तोपर्यंत नंदू तिथेच बेहोश पडलेला होता आणि डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या प्रमोदच्या बाईकमुळे तो पकडला गेला होता.
कोर्टात केस उभी राहिली. चर्चांना पूर आला सोशल मेडियावर पोस्टचे ढिगार पडले पण . . .
इकडे एकदाच प्रेम केलं तर माझ्यासोबतच असं का व्हावं? या प्रश्नाने नंदू मौनात गेला . श्यामलचा चेहरा आठवून आठवून फक्त डोळ्यातून अश्रू वहायचे.
त्याची मानसिक अवस्था ठीक नाही म्हणून त्याच्यावर मानसोपचार सुरू झाले. केस थंड पडली पण
एका भोळ्या भाबड्या मुलाची प्रेमकहाणी अधूरी राहीली ही हुरहुर कुणालातरी राहीलीच.
त्याची मानसिक अवस्था ठीक नाही म्हणून त्याच्यावर मानसोपचार सुरू झाले. केस थंड पडली पण
एका भोळ्या भाबड्या मुलाची प्रेमकहाणी अधूरी राहीली ही हुरहुर कुणालातरी राहीलीच.
समाप्त
© स्वाती बालूरकर , सखी
दिनांक २९.११ .२२
दिनांक २९.११ .२२
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा