Oct 24, 2021
कथामालिका

चूक कोणाची....भाग ७ ...अंतिम

Read Later
चूक कोणाची....भाग ७ ...अंतिम

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

श्र्वेता: आई विचारायचं का श्रेयसला?

शामल: नको इतक्यात अजून, बरा वाटलं की विचारू आपण.


४-५ दिवस अजून गेलेत.

आता श्रेयसची तब्बेत चांगलीच सुधारली होती. पायाचे प्लास्टर पण निघणार होते १-२ दिवसांत.

शामलने रियाला फोन केला...

शामल: हॅलो रिया कशी आहेस बाळा?

रिया: मस्त आहे मी, तू कशी आहेस सांग...?

शामल: मी पण छान आहे ..

बरं मी काय म्हणते...

तुझा काय प्लॅन आहे वीकेंड चा?

रिया: काहीच नाही ग. माझा ऑफ आहे तेव्हा सो मी आणि अमेय पण घरीच आहोत.

शामल: हे अगदी बरं झाल की अमेय पण फ्री आहे.

तुम्ही एक काम करा इथेच या वीकेंडला. श्रेयसच्या पायाचे प्लास्टर पण काढणार आहेत २ दिवसांनी.

तो बरा झालं म्हणून सत्यनाराणाची पूजा ठेवते आहे. तेवढाच एक get-together पण होईल, आणि मनाला प्रसन्न वाटेल.

रिया: अगदी माझ्या मनातल बोललीस तू आई. बरा केलं पूजा ठेवतेय ते.

येतो आम्ही परवा मग.

शामल: अगदी छान या आम्ही वाट बघतो.

असा म्हणत दोघींनी फोन ठेवला.

शामलने पुजाऱ्यांना बोलावून पूजेची वेळ निश्चित केली, सामानाची यादी घेतली.

दामुला पूजा सामग्री आणि इतर सामान आणायला सांगितले.


रिया एक दिवस आधीच संध्याकाळी आली. श्र्वेता आणि रियाने मिळून दुसऱ्यादिवशी देवाचा चौरंग सजवला. केळीचे खांब लावलें. त्याला छान मोग्ऱ्याच्या गजऱ्यानी सजवले. दारात रांगोळी घातली.

श्रेयस आणि अमेय पण पूजेसाठी तयार झाले. मुलं पण तयार झालीत. शामल आणि विलासरवांचे तर आधीच आवरून झाले होते.

गुरुजी पण आले, त्यानी यथावत पूजा मांडली, पूजा श्र्वेता आणि श्रेयसच्या हातून होती, त्यामुळे ते पूजेसाठी बसले. श्रेयसचा पाय नुकताच बरा झाला होता त्यामुळे त्याला त्रास होणार नाही अशा थोड्या उंच चौरंगावर तो बसला आणि श्र्वेता पाटावर बसली. बाकी मंडली मागे बसली.

रिया आणि शामल स्वयंपाक घरात प्रसादाचा शिरा बनवत होत्या.

गुरुजींनी पूजा सांगायला सुरुवात केली, सगळं कसं अगदी छान वाटत होतं. प्रसन्न होतं. अगरबत्तीचा सुवास दरवळत होता. चौरंगावर सत्यनारायणाचा फोटो कलश सगळं अगदी मोहून टाकत होत.

पूजा संपन्न झाल्यावर आरती आणि मग नैवेद्य दाखवला.

आपण नेहमी करतो तो शिरा आणि प्रसादाचा शिरा यात खूप फरक असतो, फरक म्हणजे शिरा तोच पण त्यात भक्तिचा गोडवा असतो. त्यामुळे तो अधिकच छान लागतो.

दुपारची जेवणं झालीत. तो दिवस अगदी छान पार पडला.


दुसऱ्यादिवशी दुपारच्या जेवणानंतर सगळे बाहेर बसून गप्पा मारत होते, श्रेयस आत सोफ्यात आराम करत सगळ्यांच्या गप्पा एकत होता.

श्र्वेता: छान झालीना कालची पूजा, बऱ्याच दिवसांनी मनाला शांत वाटलं.

रिया: हो खरंच खूप बरा वाटलं काल.

सगळ्यांनीच हसून माना डोलावल्या.

बरेच विषय सुरू होते, लहानपणच्या आठवणी, खेळ, शाळा. श्र्वेता, रिया, शामल, अमेय, विलासराव सगळे काहीना काही सांगत होते.

श्र्वेता: आई तुम्ही, बाबा, रिया सगळेच डॉक्टर आहात मग श्रेयसचा असा का odd man out झाला?

शामल बोलणार तितक्यात विलासराव बोलले.

विलासराव: अगं त्याची इच्छाच नव्हती डॉक्टर बनायची.

हट्ट करून आयटीलाच गेला. माझी खूप इच्छा होती की त्यानी डॉक्टर बनावं. पण त्यानी नाहीच एकल. झाला असता डॉक्टर तर श्र्वेता आणि अमेयला सोबत झाली असती. त्यांचा पणं त्याला support झाला असता. पण नाहीच केलं त्यानी....


श्रेयस हे सगळं एकत होता. तो ताडकन उठून बाहेर गेला. त्याचा चेहेरा रागाने लाल झाला होता. त्याला असा एकदम बघून सगळेच शांत झाले.

श्रेयस विलासरावंना बोलू लागला, त्याचा आवाज वाढलेलाच होता..

श्रेयस: हे सगळं तुमच्या मुळेच झालं. तुम्हीच जबाबदार आहात, ज्यामुळे मी डॉक्टर नाही झालो.

मला आधी खूप वाटायचं की आपण डॉक्टर होऊ पण तुम्ही तिथे पण आडवे आलात.

शामल: श्रेयस आजाव खाली कर, तू तुझ्या बाबांशी बोलतोय, आणि त्यांनी कधी अडवल तुला? काय बोलतोय तू?

शामल पण जरा रागातच बोलत होती.

विलासराव: शामल शांत हो, बोलुदेत त्याला, कमीतकमी मला कळेल की माझा काय काय चुकलं ते. तू अजिबात बोलायचं नाहीस.

तसं शामल शांत बसली, तिने दामूला खुणावले, तास दामू आणि शीला मुलांना घेऊन आत गेले. कोणालाच कळत नव्हत की श्रेयस ला असं एकदम रागवायला काय झालं. डॉक्टर न होण्याचा निर्णय त्याचा होता मग हा असा का बोलतो आहे.

श्रेयस: हो आज मला बोलायचच आहे.

तुम्ही नेहमीच विचारत असता की काय चुकलं माझं?

खरतर काय बरोबर आहे माझं...? असा विचारा.

वडील मागून कोणतं कर्तव्य केलत तुम्ही? सांगा ना मला. ?

तुम्ही चुकलात? नाही नाही तुमची मुलं म्हणून जन्म घेतला हेच चुकलं आमचं....

शामल: श्रेयस...

चिडून शामलने श्रेयसला आवाज दिला...

विलासरावांनी तिला हातानीच शांत रहा अशी खून केली..

श्रेयस: माझा डॉक्टर होण्याचं स्वप्न सुद्धा तुमच्यामुळे धुळीला मिळालं... तुम्हीच कारणीभूत आहात.

तुम्ही फक्त जन्म दिला पण वडील कधीच झाला नाहीत.

तुम्हाला मी माफ पण केलं असतं पण एका गोष्टीसाठी कधीच तुम्हाला माफ करणार नाही...

तुम्ही खून केलंय...

हे ऐकून सगळेच एकदम उभे राहिले.

अरे तू हे काय बोलतोय अस एकदम म्हणाले.

शामल: तुला कळतंय का तू काय बोलतोय?

श्रेयस : हो मला चांगलाच माहीत आहे मी काय बोलतोय.

आई तू केलं असशील ह्या माणसाला माफ कारण तुझा नवरा आहे, पण मी नाही करू शकणार कधीच नाही.

शामल: श्रेयस पुरे झालं तुझं, गप्पा बस आणि आत जा...

श्रेयस: का आता का आत जा? कळुदेत की सगळ्यांना...

पण शामल का खरंच नव्हते माहीत की श्रेयस कशाबद्दल बोलतोय.

शामल: तू भानावर नाहीस, डोक्यावर पडलास म्हणून असा बडबडतोय तू.

श्रेयस: नाही मे अगदी शुध्दीवर आहे.

पण तुला भीती वाटे का की, सत्य सगळ्यांच्या समोर येईल?

शामल: तू जे बोलतो आहेस ते मला माहित नाही,कारण विलासराव अस कधीच करुशकत नाहीत.

श्रेयस: अरे! तू विसरलीस?

शामल: श्रेयस तू काय बोलतो आहेस?

इतकावेळ शांत बसलेले विलासराव शामलला बोलले.

विलासराव: शामल काय बोलतोय त्याच एकून तरी घे..शांत रहा आता एक शब्द बोलायचा नाहीस...

श्रेयस: तिला तुम्ही असच गप्प केलत नेहमी... पण मी आता गप्पा नाही बसणार, सगळ्यांना ओरडून सांगेल की तुम्ही खुनी आहात.


तुमच्यामुळे विशाखा गेली.

हे एकून शामल पटकन खाली बसली. विलासराव पण डगमगले. त्याचे शब्द जसे वीजे सारखे कोसळले.

रिया: दादा तो एक accident होता.

श्रेयस: हो मान्य आहे तो accident होता. पण तिला मारल ह्या माणसानी.

आपण दोघे पण लहान होतो रिया तेव्हा, पण मी इतका पण लहान नव्हतो की मला काही कळत नव्हते.

मला चांगल आठवते की,

रिया तू तेव्हा पहिलीत होतीस, मी आणि विशाखा पाचवीत. आम्ही दोघे जुळे झालोत त्यामुळे एकाच वर्गात होतो. विशाखा माझ्यापेक्षा काही मिनिटांनीच लहान होती.

आई, तू, मी आणि विशाखा आपण शाळेतून घरी येत होतो, आई कार ड्राईव्ह करत होती. मी फ्रंट सीट वर बसलो होतो, तू आणि विशाखा मागे होतात. आपण शाळेत काय काय झालं आईला सांगत होतो, आणि...आणि अचानक गाडी समोर एक लहान मुलगा पळत आला, आईने स्टिअरिंग हलवत लगेच ब्रेक लावला जेणेकरून गाडीची दिशा बदलून त्या मुलाला इजा होणार नाही, पण अशा अचानक ब्रेक आणि गाडीची दिशा बदलली त्यामुळे विषाखाच्या बाजूचा डोअर ओपन झाला आणि ती बाहेर फेकली गेली, आणि रस्त्यावरच्या इलेक्ट्रिक पोल वर आदळली.

डोक्याला जबरदस्त मार बसला तिच्या, बाकी आपण सगळे बचावलो, आईने लगेच कार मधून तिला हॉस्पिटलला आणले. खूप ब्लड गेलं तिचं. त्यात ऑपरेशन पण करावा लागणार होतं.

आईने बाबांना फोन केला ...

तेव्हा हा माणूस मुंबईत नव्हता. पुण्याला एका मोठ्या सेमिनार मध्ये त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं होते . ते तिथेच होते.

श्रेयस रागात बोलत होता, डोळ्यातून अश्रू पण येत होते.

शामल आणि विलासरावांच्या डोळ्यासमोर ती घटना येत होती, रियाला पण पुसट आठवत होतं.

श्रेयस विलासरावां कडे बोट दाखवत पुढे बोलू लागला...

ह्यांना सांगितला, की तुम्ही लवकर या, विशाखाला ब्लड ची गरज आहे, कारण तिचा आणि ह्यांचा ब्लड ग्रुप एकाच होता B-ve., असा की अगदी रेअर, सहज सहजी सापडत नाही.

पण ह्या माणसाला त्याचं कौतुक जास्त प्रिय होत. आला नाही हा माणूस. तिल शेवटच्या क्षणाला कोण एका भल्या व्यक्तीने ब्लड दिलं पण तरी तिला वाचवता आले नाही. केवळ ह्यांच्या खोट्या कौतुक सोहळ्यामध्ये.

इतक्या वेळ राग आवरून ठवणाऱ्या शामल ला आता सहन होत नव्हते. विलासरावं पण हा इतका मोठा आरोप सहन करुशकत नव्हते. श्रेयस बोलत राहिला.

विशाखा गेल्यावर कितीतरी वेळानी आले हे,.. खोटे अश्रू गाळत. तेव्हाच मी ठरवलं, की डॉक्टर नाही व्हायचं कारण ह्यांची ईच्छा पूर्ण करायची नव्हती मला.

स्वतः च्या मुलीच्या रक्तनी माखलेले हात आहेत ह्यांचे.

आता मात्र शामलचा बांध सुटला, तिने सटकन श्रेयस च्या कानाखाली मारली. विलासरावांना त्याचे आरोप आता सहन होत नव्हते, ते अगदी खिन्न मनाने त्यांच्या खोलीत निघून गेले.

शामल: अरे मूर्ख मुला, तुझ्या मनात अस काही आहे हे एकदा तरी बोलायचं होत मला, मी सांगितलं असतं सत्य तुला. ग्रह करून घेतला मनात आणि आयुष्यभर जपलास तो.

मला मैत्रीण म्हणायचास न मग एकदा विचारता नाही आलं की काय झालं होतं तेव्हा?

श्रेयस काही बोलणार तेवढ्यात शामल बोलू लागली...

शामल: विलासराव जरी सेमिनार साठे गेले होते तरी तेव्हा ते सेमिनार मध्ये नव्हते, ते emergency मध्ये एका माणसाचे ऑपरेशन करायला जात होते. त्या माणसाच्या surgery ची तयारी झालेली होती, तो माणूस ओटी मध्ये होता, जेव्हा मी फोन केला त्यांच्या सेमिनारच्या ठिकाणी. त्यांनी तसा निरोप मला दिला, आणि माझा निरोप पण तुझ्या बाबांना दिला. त्यांनी लगेच मला आपल्या हॉस्पिटलला फोन करून सांगितले की तू सांभाळून घे मला असा कोणाला मरणाच्या दारात सोडून येत येणार नाही.

आणि तू ज्या भल्या माणसाची गोष्ट करतोस ना तो माणूस दुसरा तिसरा कोणी नाही, तो म्हणजे तुझे बाबा. येता येत नव्हतं कर्तव्य सोडून, आणि मुलीला पण वाचवायचं होतं, तर त्यानी त्यांच्या असिस्टंटला पाठवले ब्लड घेऊन. पोल ला आदळल्यामुळे मानेच्या मणक्याला पण मार लागला होता, त्यात तिची जखम इतकी खोल होती की, मला आधीच कळलं होतं, ती वाचणार नाही ते, तरी आम्ही सगळे प्रयत्न केलेत.

 हे एकून श्रेयसचे हात पाय गळले, तो रडू लागला. आपण हे काय केलं ह्याची त्याला लाज वाटत होती. शामल पण रडत होती. श्रेयस उठला आणि धावतच विलासरावांच्या खोली कडे गेला, त्यांना आवाज देत होता. तितक्यात आतून काही पडल्याचा आवाज आला, तसे सगळे धावत आत गेले, सगळे त्यांना आवाज देत होते. श्रेयस आणि दामू दार तोडाण्याचा प्रयत्न करत होते, अमेय मागच्या खिडकी कडे गेला त्यानी आत बघितल तर विलासरवांनी गळफास लावलेला होता, त्यांच्या पाया खालचा स्टूल पडण्याचा तो आवाज होता हे त्याच्या लक्षात आले, तो पटकन आत गेला, आणि त्यांच्या पायाला पकडुन उभा राहिला जेणे करून फास अजून आवळला जाऊ नये. आतून त्यानी श्रेयसला खिडकीतून ये अस सांगितलं, तसा श्रेयस पण खिडकीतून गेला, वडीलांना अस बघून त्याला अजूनच अपराध्या सारखं वाटतं होत, त्यानी इतरांसाठी दार उघडले, आणि अमेय दामू आणि श्रेयस नी मिळून विलासरावना खाली उतरवले, सगळेच खूप रडत होते, रिया आणि अमेयनी लगेच उपचार सुरू केलेत. जवळच्या हॉस्पिटलला घेऊन गेले.

विलासरवांचे प्राण वाचले पण मेंदूची एक नस जास्त दाबली गेली त्यामुळे, एक हात कायमचा अधू झाला.

विलासराव शुध्दीवर आल्यावर श्रेयस ने त्यांची माफी मागितली.

दोघे बाप लेक गळ्यात पडून खूप रडले. इतक्या दिवसांनी दोघे भेटत होते, मळभ नाहीसे झाले होते.

श्रेयस त्यांची सेवा केली. पण त्याच्या मनात मात्र एक खंत कायमची राहील की, त्याच्या वडिलांची आजची ही स्थिती त्याच्यामुळे आहे.

शामल मात्र श्रेयसशी अबोल होती,. श्रेयसनी तिची पण माफी मागितली, शेवटी आईच ती, तिने श्रेयसला माफ केले.

पण प्रत्येकाच्या मनात अनेक विचार नेहमी साठी राहिले ...

विलासरवांचे प्राण वाचले नसते तर काय झाले असते? तिथे उपस्थित कोणीही श्रेयसला माफ केले असते?

जर त्याना काही झालं असतं तर ,वडिलांच्या रक्तानी श्रेयसचे हात नसते का माखले?

त्यांच्या खुनाची जबाबदारी श्रेयसनी घेतली असती?

श्रेयस स्वतः ला तरी माफ करू शकतो का?

शेवटी एक नक्की की, गैरसमजातून जे घडतं त्याची मोठी किंमत मोजावी लागते. अगदी सगळ्यांनाच.

धन्यवाद...

प्रिय वाचक

तुमच्या उत्तुंग प्रतिसादामुळे मला आज माझी पहिली कथा मालिका पूर्ण करता आली ह्या साठी तुमचे खूप आभार.

आजचा भाग जरा मोठाच झाला. पण हे सगळं एका भागात मांडणे गरजेचे होते.

ह्या कथामालिकेतून एक अजून सांगू इच्छिते की, गैरसमज जास्त बाळगू नका, आणि कोणावरही कोणताही आरोप करण्या आधी सत्य जाणून घ्या, आपल्या बोलण्याचा काय परिणाम समोरच्यावर होईल ह्याचा विचार करा.

शब्दांची धार तलवारीपेक्षा पण जास्त असते.

आणि शेवटी एक प्रश्न तुमच्या साठी...

ह्यात चूक कोणाची?

तुमचे उत्तर कमेंट मध्ये जरूर कळवा...

मला तुमचे अभिप्राय वाचायला आवडतील. ते माझ्यासाठी एक inspiration चे काम करतात.

लवकरच परत येईल नवीन कथा घेऊन..

पुन्हा एकदा सगळ्यांचे खूप खूप आभार.


❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now