Oct 24, 2021
कथामालिका

चूक कोणाची.....भाग ५

Read Later
चूक कोणाची.....भाग ५

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

सकाळीच नेहमीप्रमणे 6 चा गजर वाजला, श्रेयस ने तो बंद केला आणि 7 चा गजर सेट करून परत झोपला.

एक तास कसा पटकन संपला त्याला कळच नाही, शेवटी 7 वाजता त्याला उठावच लागलं. कालचा प्रवास, त्यात डोक्यातील विचारांनी त्याची नीटशी झोप पण झाली नव्हती त्यामुळे त्याला अजिबात उठवत नव्हत. तरी त्याला ऑफिसला जाने भाग होते. कारण एका महत्त्वाच्या क्लाएंट सोबत त्याची मीटिंग होती.

कसाबसा तो उठला, सकाळचे नित्य कार्यक्रम अवरून ऑफिस साठी तयार झाला. नंतर त्यांनी चहा बनवला सोबतीला ऑमलेट पण बनवले. नाश्ता करत मनात म्हणत होता, बर झालं आईने मला तात्पुरता तरी स्वयंपाक शिकवला ते, नाहीतर बाहेर खाव लागले असते आता. आई खूपच दूरदर्शी आहे. त्याला शामल चे वाक्य आठवले, “ मुलगा असो वा मुलगी सगळ्यांना स्वयंपाक यायलाच हवा, कमीतकमी स्वतःच पोट भरेल इतका तरी जमायला हवा. त्यामुळे आपण कोणावर अवलंबून नाही राहत आणि उपाशी पण रहात नाही, अडीअडचणीत कामात येतात ह्या गोष्टी.”

त्यावेळेस मला फार कंटाळा यायचा शिकायचा पण आईने मात्र बजावून जबरदस्ती शिकवला. असा विचार करत त्यानी नाश्ता संपवला, घराला लॉक लावलें आणि ऑफिसला गेला.
सकाळीच ऑफिसला येताना श्र्वेताशी बोलणं झालं होतं.. आता त्याच काम जोरात सुरू होतं पण चेहेऱ्यावर थकवा मात्र दिसत होता.

इकडे शामल , विलासराव आणि श्र्वेता गप्पा मारत बसले होते. म्हणजे फक्त शामल आणि श्र्वेता बोलत होत्या. सारंग बागेत खेळत होता.

ऑफिस, मैत्रिणी, करंट अफेअर्स अशा सगळ्या विषयांवर चर्चा चालू होती. पण विलासराव मात्र फक्त एकत होते. त्यांचा सहभाग नव्हता चर्चेत, अगदी त्यांच्या आवडीचा विषय करंट अफेअर्स ह्यात सुद्धा ते सहभागी झाले नाही.

म्हणून श्र्वेताने त्यांना आवाज दिला, थोडं गमतीत ती बोलत होती.
श्र्वेता: बाबा आज न्यूज पेपर वाचला नाही वाटतं तुम्ही?
आणि दोघी सासू सूना हसू लागल्या?

विलासराव: बर का श्र्वेता माझ्या वाचनात कधीच खंड पडत नाही.

श्र्वेता: मग आज तुम्ही चर्चेत सहभागी नाही झालात ते.

विलासराव: आयुष्याचं गणित सोडवण्याचा प्रयत्न करतोय मी, पण ते काही सुटत नाहीये. अधिक, वजाबाकी गुणाकार भागाकार सगळं करून बघितलं पण उत्तर काही येत नाहीये.

थोडं गंभीर आवाजात ते बोलत होते....


श्र्वेता: बाबा तुम्ही कसला विचार करताय... मोकळं बोला, बोललं की मन हलकं होतं.

शामल: खरंच अहो, बोला तुम्ही, असा मनात कुढत नका बसू.
विलासराव: शामल सगळीच गणितं चुकलीत ग अगदी सुरुवाती पासून.

म्हणजे बघ ना, मी इतक्या surgeries केल्या, खूप लोकांना बर केलं पण माझ्या घरात उसवलेल्या नात्याला नाही शिऊ शकलो मी. कधी ते इतकं उसवत गेलं की मला कळलंच नाही ग. आणि जेव्हा समजल तेव्हा खूप उशीर झाला.

विलासरावांचा कंठ दाटून आला....

तरी तू मला नेहमी संगायचीस की एखादा दिवस तरी मुलांसोबत घालवत जा. त्यांच्याशी प्रेमाने वागा. पण मी स्वतः ला अती हुशार समजत होतो. मुलांना वेळ दयला माझ्याकडे वेळच नव्हता. आणि कधी मिळालाच वेळ तर प्रेमाने वागलो नाही मी, कमीत कमी प्रेमाचे चार शब्द तरी मी बोलूच शकत होतो. ते ही केलं नाही मी.


कारण...

विलासराव बोलताबोलता थांबले...


श्र्वेता: कारण काय बाबा?

विलासराव: कारण माझ्या मनात भीती होती पोरी...

श्र्वेता: म्हणजे कसली भीती बाबा?

तिला काही कळत नव्हत ... पण शामल मात्र गप्प होती.

विलासराव: माझे एक मित्र होते... तसे माझे सिनियर डॉक्टर पण आम्ही मित्रा सारखेच राहायचो. त्यांना पण एक मुलगा होता, श्रेयस पेक्षा ६-७ वर्षांनी मोठा होता. एकुलता एक त्यामुळे खूप लाडाचा. त्याचा प्रत्येक हट्ट ते पूर्ण करत. तो कसाही वागला तरी त्याला कधीच रागवायचे नाही. दोघे ही नवरा बायको खूप लाड करत. हळूहळू त्याचे हट्ट वाढायला लागले. अभ्यासात तो मागे पडू लागला. कमी वयात नकोती व्यसनं लागली. वाईट संगत लागली. इतक्या हुशार आणि श्रीमंत मुलाच्या आयुष्याचं वाटोळं झालं.

एक दिवस, त्याला मित्रांना पार्टी द्यायची होती, पार्टी म्हणजे साधीसुधी नाही, दारूची... तेव्हा तो निव्वळ १६-१७ वर्षांचा होता. त्याच्या आई, वडीलांनी पैसे द्यायला नकार दिला, खूप भांडला त्यांच्याशी आणि.....

श्र्वेता: आणि काय?

शामलने विलासरावांचा हात घट्ट पकडला...इतक्या वर्षांनी ते मोकळे होत होते, त्यांना आधाराची गरज होती.

विलासराव: आणि त्यांनी रागाच्या भरात आई वडीलांचा खून केला.... चाकूने सपासप १५-२० वर केले. दोघे पण जागीच ठार झाले. त्यांना असा रक्ताच्या थारोळ्यात बघून तो भानावर आला... आई बाबा म्हणून त्यांना जवळघेत आक्रोश करत होता, पण तोपर्यंत सगळं संपल होतं.

विलासराव रडत होते. शामल त्यांना थोपटत होती, श्र्वेता ने त्यांना पाणी दिले. पण तीच डोकं काम करेनास झालं होतं. विचारच इतका भयंकर होता तो.

विलासराव पुढे बोलू लागले....

त्यानंतर माझ्या मनात भीतीने घर केलं. मी श्रेयस शी कधीच प्रेमाने बोललो नाही. नेहमी त्याला रागवयचो. मला वाटायचं प्रेमाने हा पण बिघडेल. रियाला कधी रागवायची वेळच नाही आली, कारण श्रेयसला रागवतोय हे बघून तिने कधी चुका केल्याचं नाहीत, आणि ती सर्वात लहान होती घरात त्यामुळे जरा नरम धोरण होत माझं तिच्यासाठी. पण श्र्वेता माझा हेतू फक्त इतकाच होता की माझ्या मुलाचं आयुष्य वाया नको जायला...
शामल तू मला नेहमी सांगायचीस की इतकी सक्ती पण बरी नव्हे, हाताची पाचही बोटं सारखी नसतात. तुमच्या मित्राच्या मुलाने जे केलं तसा सगळ्यांचच होत असं नाही. त्याला तुमच्या प्रेमाची गरज आहे. पण माझी भीती माझ्यावर हवी झाली होती. आणि आता त्याची फळं मी भोगतो आहे.

पण तू तुझी जबाबदारी अगदी चोख पार पडलीस शामल.
मुलांवर अगदी छान संस्कार केलेत. पण माझ्या अशा वागण्यामुळे तुझ मात्र नुकसान झालं. त्यासाठी मी स्वतः ला कधीच माफ करू शकणार नाही.

शामल: अहो काहीतरीच काय, अस काही नाहीये. तुम्ही असा विचार मनातून काढून टाका...

विलासराव: नाही शामल तू कितीही नाही म्हणालीस तरी हेच सत्य आहे.

श्र्वेता: आई काय झालं होत?

विलासराव: शामल आणि माझा प्रेम विवाह... एका नामवंत, श्रीमंत वकिलांची मुलगी आहे शामल. पण माझ्या प्रेमात पडली, मी एक गरीब घरातला मुलगा. शामल मला २ वर्ष ज्युनिअर होती. बघता क्षणीच तिच्या प्रेमात पडलो. होतीच ती इतकी सुंदर, त्याकाळातील ऐश्वर्या. त्यात अगदी साधी, सालस.

ती पण माझ्या प्रेमात पडली, घरी रीतसर सांगितलं आम्ही, पण तिच्या वडिलांचा विरोध होता आमच्या लग्नाला, अर्थात त्यांचं बरोबरच होतं, त्यांना त्यांच्या तोलामोलाचा मुलगा हवा होता, मुलीला सुखात बघावं असं कोणत्या बापाला वाटणार नाही. पण मुलीच्या हट्टामुळे त्यांनी होकार दिला...

विलासराव सांगतच होते की, तितक्यात श्र्वेताला एक कॉल आला... श्र्वेता खुर्चीतून उठली आणि खिडकीत ठेवलेला फोन उचलला.

श्र्वेता: हॅलो...

तिकडून कोणीतरी बोलत होत.
त्याच बोलणं एकत श्र्वेता पटकन खाली बसली, तिच्या हातातून फोन पण पडला, जणू तिच्यात शक्तीच राहिली नव्हती..


तिकडून ती व्यक्ती हॅलो हॅलो करत होती, शामल व विलासराव तिला आवाज देत होते. पण तिला काही सुचत नव्हतं...

फोन अजूनही सुरूच आहे हे लक्षात आल्यावर शामलने फोन उचलला...
क्रमशः

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now