चूक कोणाची भाग १

विलासराव बंगल्याच्या समोरच्या त्या बागे कडे बघत होते . बाजूलाच मोबाईल वर किशोर कुमार चे गणे ला??

विलासराव झुल्यावर बसून कसल्यातरी विचारात मग्न होते.

विलासराव म्हणजे नामवंत डॉक्टर, साधारण सत्तरीच्या आसपास असतील.. पण आता त्यांनी प्रॅक्टिस बंद करून घरीच राहायचं ठरवलं होतं. एव्हढ्या नामवंत डॉक्टरचे घर पण तसेच आलिशान होते. भलामोठा बंगाल होता अगदी शाही वाटावा असा, बंगल्याभोवती मोठ कुंपण होतं त्याला लोखंडी मोठ्ठं गेट होतं.. त्यानंतर छान सजवलेली आणि मेन्टेन केलेली बाग होती, त्यात वेगवेगळ्या प्रकाची फुलझाड आणि फाळझड होती. अगदी मोहक होती ती बाग.

विलासराव बंगल्या समोरच्या त्या बागे कडे बघत होते . बाजूलाच मोबाईल वर किशोर कुमार चे गणे लावले होते....

जिंदगी का सफर, है ये कैसा सफर..

कोई समझा नही, कोई जाणा नही..

त्यांचं लक्ष मात्र गण्या कडे नव्हतं.

तितक्यात शामल चहाचा ट्रे घेऊन आली. शामल म्हणजे विलासरावांची पत्नी, त्यांच्या पेक्षा 2-3 वर्ष लहान होती. पण अजूनही दिसायला सुंदर, श्रीमंती तिच्या चेहेऱ्यावर झळकत होती.

विलासरावांना असे विचारात बघून म्हणाली..” काय हो, कसला विचार करताय इतकं?”

शामलच्या बोलाण्याने विलासरावांची तंद्री तुटली... त्यांनी एक नजर तिच्याकडे बघितलं आणि म्हणालेत काही नाही ग असच..

पण शामलच्या लगेच लक्षात आले की विलासराव कसला विचार करत होते. तीने वातावरण बदलाव म्हणून गाणें गायला सूरूवात केली..

एक प्यार का नगामा है,

मौजोकी रवानी है

जिंदगी और... कुछ भी नही

तेरी मेरी कहानी है...

तिला चांगलच माहीत होतं की विलासरावांना काय आवडतं की ज्यामुळे त्यांचा मूड बदलतो...

विलासराव , शामलच्या आवाजाचे दिवाणे होते. ह्या वयात पण शामलच्या आवाजात तोच गोडवा होता.

पण ह्यावेळेस मात्र तिच्या ह्या युक्तीचा तितकासा परिणाम झाला नाही.

तिचं गाणं ऐकत त्यांनी चहा घेतला, आणि पुन्हा एका प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघितलं...

शामल ने कळून न कळल्यासारख केलं आणि चहा घेऊ लागली..

शेवटी नं राहून विलासरावांनी तिला विचारलं.. शामल तू केलास का ग त्याला फोन? झाल का तुझ बोलून?

शामल: नाही हो अजून नाही केला , वाटल ऑफीस ला पोहोचला की करू कॉल.. सकाळच्या गडबडीत नको बोलायला...

विलासराव: हो ते बरोबर आहे, पण आता 9 वाजलेत पोहोचला असेल एव्हाना, नाही का?

शामल : हो वेळ तर झाली आहे त्याची.

विलासराव: आज खूप मोठा दिवस आहे त्याच्यासाठी तू आत्ताचं कॉल कर त्याला आणि बोल त्याच्याशी. वाट बघत असेल तो.. आणि.....

अस म्हणत ते थांबले..

शामल: आणि काय?

विलासराव: आणि मी पण बोलतो..

शामल : छान लगेच लावते त्याला फोन..

दुसरी कडे....

सकाळचे नऊ वाजले होते.. श्रेयस त्याच्या ऑफिसला पोहोचला होता. एका नामांकित आय टी कंपनी मध्ये तो कामाला होता. त्याच्या ऑफीस ची बिल्डिंग एखाद्या पंचतारांकित हॉटेल सारखी होती.. बिल्डीगच्या आवारात entrance समोरच एक मोठा फाऊंटन होता, आत आल्यावर एकदम आलिशान झुंबर होत आणि त्या खाली रिसेप्शन काउंटर होतं आणि बसायला सोफा होता अर्थात वेटींग एरीया. गेस्टसाठी छोटl कॅफे होता तिथून पुढे गेलं की एक इलेक्ट्रोनिक गेट होतं तिथे सेक्युटी चेक् होत असे आणि मग समोर 4 मोठ्या लिफ्टस होत्या.. जवळपास 15 मजली इमारत होती ती.

श्रेयस च डिपार्टमेंट 10th floor वर होतं, तो लिफ्ट मध्ये गेला आणि १० व्या मजल्यावर गेल्यावर तिथे पंचिंग करून त्या काचेच्या ऑटोमॅटिक डोअर मधून आत गेला. आज तो खूपच खुश होता . कारण आज प्रमोशन नंतर चा त्याचा पहिला दिवस होता कामाचा.. नवीन जबाबदारी अगदी छान सांभाळायची अस त्यांनी ठरवलं. आता प्रोजेक्ट मॅनेजर म्हणजे जास्त जबाबदारी असणार हे त्याला चांगलाच ठाऊक होतं... इतक्या दिवसाची त्याची मेहेनत फळाला आली होती.

श्रेयस त्याच्या केबिन मध्ये जाऊन बसला आणि कामाला सुरुवात केली तितक्यात त्याला फोन आला.. रिया कॉलिंग...

नाव वाचून त्याच्या उजळ चेहेऱ्यावर एक मोठी स्माईल आली..

श्रेयस: बोल चिंक्की काय म्हणतेस.?

रिया: कर रे दादा अजून पण चिंक्की म्हणतोस मला...अरे 2 मुलांची आई आहे मी. किती चिडवतोस मला.

रिया थोडा लाडात बोलली.

श्रेयस: अगं तु अशिल आई 2 मुलांची, पण तू माझ्या साठी अजूनही चिंक्कीच आहेस.. माझी लाडाची लहान बहीण.

अस म्हणून श्रेयस जोरात हसला.. तशी रिया पण हसायला लागली.

रिया: बर, कसा वाटतं आहे Manager साहेब.

श्रेयस: एकदम छान... खरं संगु आज वाटतं आहे की माझ्या कष्टाचं चीज झालं.

रिया: अरे ते होणारच होत दादा.. मी खूप खुश आहे.. तुला हवं ते सगळं मिळो. चल तू आता काम कर आपण बोलू नंतर.. तुमचा जास्त वेळ घेत नाही मी मॅनेजर साहेब... काळजी घे.

हो तू पण काळजी घे असं म्हणत श्रेयस ने फोन ठेवला. आणि एकदा परत चेक केलं की अजून कोणाचा मेसेज किंवा मिस्ड कॉल तर नाही ना आला. तो कोणाच्या तरी फोन ची वाट बघत असावा...

क्रमशः

प्रिय वाचक मित्रांनो,

ईरा द्वारे मला लिखाणाचा प्लॅटफॉर्म मिळाला. माझ्या लिखाणात खूप वर्षांचा खंड पडला आणि आता परत लिहीत आहे. त्यामुळे काही चुकल्यास सांभाळून घ्या.

ही कथा वं यातील सर्व पात्र पूर्णतः काल्पनिक आहेत, ह्याचा कोणाशी कसलाही संबंध नाही, आणि असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

तुम्हाला माझी कथा कशी वाटली नक्की सांगा. आवडल्यास मी अजून कथा घेऊन येईल.

🎭 Series Post

View all