चूक कोणाची भाग ३

श्रेयसची गाडी आली हे दोघांनी पण ओळखल, आणि श्रेयस गेटअधून गाडी घेऊन आत आला.

श्रेयस, श्र्वेता आणि सारंगला घेऊन नाशिकच्या दिशेने निघाला. रिया पण अमेय आणि मुलांसोबत म्हणजे अक्षय व स्वरा सोबत नाशिकसाठी रवाना झाली.

इकडे शामलची सकाळपासूनच गडबड सुरू होती, दामू आणि शीलाला सूचना देणे सुरू होते. दामू आणि शीला म्हणजे त्यांचे विश्वासू नोकर, खूप वर्षांपासून त्यांच्या कडे कामाला होते, अगदी घरातले सदस्य झाले होते ते. तसच इतर नोकरमंडळींना सुद्धा सूचनांचा भडिमार सुरू होता. सगळ्यांच्या आवडीच्या पदार्थांची यादी शामलने शिलाला दिली आणि ह्या नुसारच स्वयंपाक कर अस सांगितलं. मदतीला घे अजून कोणाला अस ही सांगितलं.

मुलांसाठी खाऊ तयार करून ठेवला होता, चिवडा, लाडू आणि त्यांच्या खास आवडीचे गुलाबजाम सुद्धा तयार होते. सोबतीला बाजारातून बिस्किट्स, चॉकलेट्स, चिप्स पण आणून ठेवले होते शामलने. सगळं अगदी जातीने लक्ष देऊन करून घेतल होत.

विलासराव सुद्धा मुलं आणि नातवंडांच्या स्वागताच्या त्तयारीत होते. सगळी बाग नीट स्वच्छ करून घेतली होती, अगदी काळजीपूर्वक कुठे काटे, खडे तर नाहीना राहिलेत याची खात्री केली होती, मुलांना खेळताना लागायला नको म्हणून सगळा आटापिटा होता त्यांचा.

विलासराव: शामल अगं झाल्यात का सगळ्यांना सूचना देऊन?

आवर लवकर येतीलच आता सगळे.

विलासराव T shirt घालता घालता बंगल्याच्या गेट कडे बघून शामलला आवाज देत होते.

शामल: हो हो झाल माझ समजाऊन सगळ्यांना.

असा म्हणत शामल छान मोगरयाचा गजरा मळत बाहेर आली.

तुम्ही पण अवरा आता.

तिला अस गजरा मळताना बघून विलासरावांना त्यांचे लग्ना नंतरचे दिवस अठवले.

विलासराव: शामल तू अजून पण तितकीच छान दिसतेस जितकी तू तारुण्यात दिसायचीस.

शामल: तुमच आपल काहीतरीच हा...

शामल लाजत म्हणाली.

आणि तितक्यात गाडीचा हॉर्न वाजला.

श्रेयसची गाडी आली हे दोघांनी पण ओळखल, आणि श्रेयस गेटअधून गाडी घेऊन आत आला.

सरांगणी आजी आजोबा म्हणून दोघांना पण मिठी मारली आणि खाऊ साठी हात पुढे केला. शामल ने त्याला तिने बनवलेला बेसनाचा लाडू दिला.

सारंग खुश होऊन झुल्यात बसला, तितक्यात रियाची पण गाडी आली. अक्षय आणि स्वरा पण आजी आजोबा म्हणत धावत त्यांच्याकडे आले. शामलनी अक्षय व स्वराला पण लाडू दिला आणि तिघे नातवंडं झुल्यावर बसलीत.

श्र्वेता आणि रियाने शामल व विलासरावांच्या पाया पडल्यात. तोपर्यंत श्रेयस आणि अमेयनी गाडीतून सामान खाली काढलं.

दामूने सगळ्यांच सामान त्यांच्या खोल्यांमध्ये नेऊन ठेवलं.

सगळ्यांच्या गप्पा सुरू झाल्या. विलासराव नातवंडाबरोबर रमून गेले. शामल रिया आणि श्र्वेताशी बोलत स्वयंपाक घरातील कामाकडे लक्ष देत होत्या. श्रेयस आणि अमेय पण गप्पा मारत होते.

दुपारची जवणं आटोपलीत आणि सगळ्यांनी थोडा वेळ आराम केला.

संध्याकाळी सगळच स्पेशल होत. कारण ते श्रेयसच्या प्रमोशनचे सेलिब्रेशन होते. सगळी तयारी शामल ने आधीच करून घेतली होती.

जेवणाचे सगळे पदार्थ खास करून श्रेयस च्या आवडीचे होते.

शामल ने तिच्या व विलासरावांच्या वतीने श्रेयसला एक छान ब्लेझर गिफ्ट केलं. श्र्वेतानें त्याला शर्ट दिला. रिया आणि अमेयनी वॉच गिफ्ट केलं.

रात्रीची जेवणं झाली. सगळे बाहेर अंगणात बसून गप्पा मारत होते. विलासराव मुलांना गोष्टी सांगत होते. त्यांच्या मुलांना ते वेळ देऊशकले नाहीत त्याची भरपाई तर होणे शक्य नव्हते पण नातवंडांनसोबत वेळ घालून स्वतःची समजूत काढत.

रिया: आई मला केसांना छान तेल लाऊन दे ना.

शामल: हो आण लाऊन देते, कसे झालेत बघ ते केस, अजिबात काळजी करत नाहीस तू. पण तुझ्या आधी श्र्वेताला लावते तेल, ती पण तुझ्या सारखीच अजिबात काळजी घेत नाही केसांची. श्र्वेता पण अगदी लहान मुली सारखी शामलच्या पुढ्यात जाऊन बसली.

श्र्वेताची आई तिच्या लहानपणीच वारल्यामुळे तिला आईची माया मिळालीच नव्हती, त्यामुळे शामल तिला आई इतकेच प्रेम करत, रीयाच्या आधी श्र्वेता साठी कोणतीही गोष्ट घेत.

बरीच रात्र झाली होती, मुले पण झोपी गेली होती. आता मात्र विलासराव नराहून श्रेयसच्या जवळ गेले, त्याला प्रमोशनसाठी अभिनंदन केले. श्रेयस नी मात्र नुसतीच मान डोलावली.

विलासराव: का रे इतकं पोरका वागतोस, इतका का वाईट आहे मी.?

श्रेयस: मला ह्या विषयावर आज तरी काहीच बोलायचं नाहीये.

पैसा दिला म्हणजे कर्तव्य संपलं असं वाटतं ह्यांना. असा पुटपुटत श्रेयस आत निघून गेला.

विलासरावांनी मात्र त्याच हे बोलणं ऐकले.

त्यांच्यासाठी हे काही नवीन नव्हते.

विलासराव पण, मैत्रीचा पुन्हा एक प्रयत्न अयशस्वी झालं.  असं म्हणत नाराज होऊन आत निघून गेले....

श्रेयस सुट्टी घेऊन आला असला तरी त्याला काम काही सुटत नव्हते. टीम सोबत टच मध्ये रहावं लागायचं. त्यामुळे त्याची चिडचिड होत होती. तो श्र्वेता आणि सारंग वर सतत चिडत होता. शामल हा सर्व प्रकार २ दिवसांपासून बघत होती.

श्र्वेता: आई बघा ना आज काल असाच करतोय श्रेयस, माझ्यावर तर सोडूनच द्या, पण सारंगवर पण चिडतो हल्ली. अजिबात वेळ देत नाहीये त्याला. आधी तर असा नव्हता वागत हा आणि मी समजवायला गेले तर पुन्हा चिडतो.

शामल: बघतेय मी २ दिवसांपासून त्याच वागणं. तू नको काळजी करुस बोलते मी त्याच्याशी...

श्रेयस त्याच्या रूम मध्ये एक अर्जंट मेल करत होता. शामल त्याच्या खोलीत गेल्या.

श्रेयस: आई काही काम आहे का?

थांब जरा ५ मिनिट एवढा एक मेल करुदेत मला.

शामलने हसून होकारार्थी मान हलवली आणि तिथेच बाजूच्या खुर्चीवर बसली.

५ मिनिटांनी श्रेयसच काम झालं. तसं तो शामलला बघून बोलला.

सुट्टीवर असून पण काही सुचुदेत नाहीत मला. काय करणार? ते जाऊदे तू काय म्हणत होतीस?

शामल: तुम्हा मुलांना वेळ दिला नाही म्हणून तुझा तुझ्या बाबांवर राग आहे, पण तू पण तर तसाच वागतो आहेस सारंगशी... उद्या सारंग पण तुझ्याशी अबोला धरेल. मग काय करशील?

श्रेयस: शामलच्या बोलण्यानं श्रेयस चे डोळे एकदम उघडले, त्याच्या लक्षात आले की तोही नकळत तसाच वागतोय जसे त्याचे बाबा वागायचे. एक क्षण त्यानी बाबांना पण समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणाला आई चुकल माझं. वर्कलोड खूप आहे ग. पण मी आता लक्ष ठेवेल. मला अजून एक श्रेयस नाही बनवायचाय माझ्या मुलाला आणि त्याच्या डोळ्यात पाणी आले. तसे त्यानी लगेच सारंगला आवाज दिला आणि त्याला एक घट्ट मिठी मारली. श्र्वेता से सगळं बघत होती, श्रेयस नी तिची सुद्धा माफी मागितली.

शामलला वाटल की आता तरी श्रेयस आणि विलासराव यांच्यातला दुरावा कमी होईल.

क्रमशः

🎭 Series Post

View all