चूक कोणाची भाग २

त्यांना जाताना शामल बघत होती, तिला फार वाईट वाटत होतं त्यांचं. नकळत तिच्या डोळ्यातून पाणी आलं.

श्रेयसने रियाशी बोलून फोन ठेवला आणि एकदा परत बघितलं की कोणाचा मेसेज किंवा मिस्ड कॉल तर नाही ना आला... त्यानंतर तो परत कामाला सुरूवात करणार तितक्यात परत त्याचा फोन वाजला..

आई कॉलिंग...

नाव वाचून त्यांनी पटकन फोन उचलला आणि म्हणाला, “ काय ग आई केव्हाची वाट बघतोय मी तुझ्या फोनची... आता मीच करणार होतो तुला कॉल पण....

पण तुझा फोन, दुसर कोणी उचलत, म्हणून मी करत नाही तुला स्वतःहून फोन शक्यत:, तुला माहीत आहे ना हे?”

शामल: अरे बाळा मी सकाळीच करणार होते फोन, पण म्हंटल सकाळच्या गडबडीत नको बोलायला.

कसा आहेस? कस वाटतंय ?

श्रेयस: मी खूप छान आहे आई आणि आज तर खूपच खुश आहे. माझ्यासाठी हे प्रमोशन किती महत्त्वाचं आहे, ह्याची कल्पना तुला आहेच, आता नंतर २ वर्षांनी मला अमेरिकेत पाठवेल कंपनी आणि तेच माझं स्वप्नं आहे.

(आता पर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल की श्रेयस आणि रिया हे शामल व विलासराव यांची मुलं आहेत)

शामल: होय मला चांगलच माहीत आहे ते, तू खूप मेहनत केलीस इथपर्यंत पोहोचायला.

असच यशस्वी हो आमचे खूप खूप आशिर्वाद तुला.

श्रेयस: तुझ्या आशिर्वादाचेच फाळ आहे हे आई. तुझ्यामुळेच आज मी इथे आहे. तुझ्या खंबीर पाठिंब्यामुळे मला हे शक्य झाले.

You are the best mom.

शामल: पुरे झालं माझ कौतुक, तुझी जिद्द आणि मेहनत आहे ही सगळी, बरं तू येतो आहेस ना ह्या वीकेंड ला? एकटा नको येऊस श्र्वेता आणि सारंग ला घेऊन ये, अशीही सुट्टी आहे आता शाळेला, रहा जरा ४ दिवस जास्त. मागच्यावेळी तू तस प्रॉमिस केल होतस मला, आठवतय ना?

श्रेयस: हो आई येतो आम्ही सगळेच आणि सुट्टी घेऊन येतोय ४ दिवस.

शामल: ठीक आहे छान, मग मी रियाला पण सांगते मुलं आणि (अमेय म्हणजे रियचा पती) सोबत यायला, सगळे मिळून सेलिब्रेट करू तुझ प्रमोशन.

श्रेयस. हे अगदी मस्त होईल आई.

शामल: बाकी सगळं छान आहे काळजी करू नकोस, बाबा पण छान आहेत, ( श्रेयस ने न विचारताच शामल ने सांगितलं) घे बोल त्यांच्याशी.

शामल बागेकडे बघत बोलत होती. पण तिचं लक्ष होतं की विलासराव तिच्याकडे बघत आहेत.

श्रेयस: आई मला त्यांच्याशी काही बोलायचं नाही. असा म्हणत त्यानी फोन बंद केला.

विलासराव आशेने शामल कडे बघत होते, त्यांना वाईट वाटू नये म्हणून शामल ने अस दाखविले की आवाज येत नाहीये ..

शामल: हॅलो अरे श्रेयस तुझा आवाज येत नाहीये रे हॅलो हॅलो... अस म्हणत तिने फोन ठेवला.

आणि विलासरावांना म्हणाली इथे ना नेटवर्क इश्यू फार आहे.

आवाजच येत नव्हता त्याचा.

विलासराव: ठीक आहे मी येतो जरा राऊंड मारून

आणि ते घरात सदरा घालायला गेले.

बाहेर आल्यावर जाताना बोलले, शामल तुला अक्टिंग जमत नाही हा...मला माहित आहे त्यानी फोन ठेवला तिकडून. मला अपेक्षितच होत अस आणि ते बाहेर जायला निघाले.

त्यांना जाताना शामल बघत होती, तिला फार वाईट वाटत होतं त्यांचं.

नकळत तिच्या डोळ्यातून पाणी आलं.

तिला सारख वाटतं होतं की हे अस कुठेतरी संपलं पाहिजे पण योग्य वेळ आली नव्हती अजून..

तिने आधी अनेकदा श्रेयला समजावण्याचा प्रयत्न केला होता पण काही उपयोग झाला नाही.

आजार बरा करायचा तर त्यावर वरवर उपचार करून चालत नाही, त्यासाठी आजाराच्या मुळावर उपचार केले तर कायमचा आजार बरा होतो, हे तिला माहीत होतं. कारण ती पण डॉक्टर होती.

तिकडे श्रेयसचा सबंध दिवस कामात गेला.. आणि संध्यकाळी मित्रांना पार्टी द्यायची अस आधीच ठरलेलं होत अर्थात सहकुटुंब. त्यानुसार सगळे मित्र आणि श्रेयस सहकुटुंब एका हॉटेल मध्ये जमले, प्रत्येकानी आपआपली ऑर्डर दिली आणि मग गप्पांची महफिल जमली सोबतीला जेवणाची लज्जत होतीच, लहान मुलं पण त्यांच्या ग्रुप मध्ये छान जेवण करत गप्पा मारत होती.

तितक्यात श्रेयसचे लक्ष बाजूला बसलेल्या एका कुटुंब कडे गेलं. आई वडील एक मुलगा आणि मुलगी अस ते कुटुंब , त्या मुलाचा वाढदिवस ते सेलिब्रेट करत होते.

श्रेयसला त्याचे लहानपणी चे दिवस आठवले, पण त्यात त्याचे बाबा त्याला दिसलेच नाहीत कधी, नेहमी त्याची आई म्हणजे शामलच दोन्ही मुलांना घेऊन बाहेर जायची, क्वचित बाबा आलेच तरी ते जास्त वेळ थांबत नसत, सतत बाहेर असायचे ते, म्हणजे हॉस्पीटलला. सतत काम, सुट्टीच्या दिवशी पण मुलांना वेळ न देता त्यांच्या डॉक्टर मित्रांसोबत केस डिस्कस करण्यात व्यस्त असतं.

 तितक्यात सारंगनी म्हणजे त्याच्या मुलानी आवाज दिला आणि विचारू लागला “ बाबा आपण आजी कडे कधी जाणार आहोत ? मला माझ्या मित्रांना सांगायचंय.”

श्रेयसनी हसून उत्तर दिलं की ह्या वीकेंडला जाऊ आपण.

असेच 2 दिवस गेले.

रियानी श्रेयस साठी गिफ्ट घेतल, अर्थात श्र्वेता आणि रियाने प्लॅन करून सरप्राइज गिफ्ट घेतलं.

श्र्वेता आणि सरांगची पॅकिंग सुरू झाली, दोघे पण खूप excited होतें जायला, पण श्रेयस मात्र फक्त आईसाठी जाणार होता.

रियाने त्याला सक्त ताकीत दिली होती की आईसाठी तरी बाबांशी बोल, पण त्याला तसं करायचं नव्हतं.

म्हणता म्हणता वीकेंड आला....

श्रेयस, श्र्वेता आणि सारंगला घेऊन नाशिकच्या दिशेने निघाला. रिया पण अमेय आणि मुलांसोबत म्हणजे अक्षय व स्वरा सोबत नाशिकसाठी रवाना झाले.

क्रमशः

🎭 Series Post

View all