Oct 24, 2021
कथामालिका

कोण होती ती....?भाग 6.

Read Later
कोण होती ती....?भाग 6.

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..


कोण होती ती...? भाग 6.


©रेश्मा आणि साक्षी..


(सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून यातील स्थळ, व्यक्ती, घटना, वास्तू, यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही....)


*************************************************

(मागील भागात आपण पाहिलं, आदित्यने केलेल्या वर्णनानुसार मोहितने स्केच काढले.... त्या स्केच वरून इन्स्पेक्टर अरविंद नी जुन्या मिसिंग केसच्या फाईल्स काढून, त्या मुलीचा पत्ता मिळवून त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली असता, अभिज्ञाचा मामा भेटला....आता पुढे.....)


"भेटली का अभिज्ञा? कुठं भेटली? कशी आहे ती? आम्ही किती वर्ष झाले तिला शोधतोय...बऱ्याच वेळा पोलीस चौकीत सुद्धा येऊन गेलो, पण तुमच्या त्या साहेबांनी मला तिथून हाकलून लावलं बघा...! त्यांनतर आमची पोर कुठं गेली काय बी ठाव नाय आम्हांस्नी..." अभिज्ञाचा मामा कळवळून सांगत होता...

"नाही...अभिज्ञा नाही सापडली...! पण तुम्ही शांत व्हा...आपण पोलीस स्टेशनला जाऊन बोलू...तुम्ही आमच्याबरोबर चला...."इन्स्पेक्टर अरविंद म्हणाले....

सगळेजण गाडीतून पोलीस स्टेशनला पोहोचले....

"बसा आणि शांत व्हा...तुमचं नाव सांगा.."इन्स्पेक्टर अरविंद म्हणाले....

"मी सदानंद पगारे...अभिज्ञाचा सख्खा मामा...पर गावात समदी लोकं मला सदा भाऊ म्हणून ओळ्खत्यात..."सदानंद म्हणाला...

"अभिज्ञाची माहिती यांच्याजवळ आहे...हा आदित्य आणि हे त्याचे मित्र नेहा व मोहित...
अभिज्ञाचा जो अपघात झाला तो याने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला आहे, पण याबद्दल त्यांच्याकडे काहीच पुरावा नाही...

म्हणून आपल्याला ही केस परत रिओपन करावी लागेल...आणि त्यासाठी तुमचं स्टेटमेंट घ्यावं लागेल...सावंत यांचं स्टेटमेंट लिहून घ्या..."इन्स्पेक्टर अरविंद नी सावंत ना स्टेटमेंट घ्यायला सांगितलं.....

"साहेब तुम्ही कुठं पाहिलं माझ्या लेकीला... खरं तर ती माझी भाची हाय, पर मला माझ्या लेकीवानीच हाय बघा...! गेली पाच वर्ष म्या तिला हुडकतोय....
पर तिचा पत्ता लागला न्हाय...
हे साहेब म्हणत होते की, तुम्ही माझ्या अभिज्ञाचा अपघात होतांना पाहिला, मी तुमच्यासमोर हात जोडतो मला सांगा तुम्ही काय पाहिलंत.....!" सदा भाऊ रडचत आदित्यला म्हणाले....

आदित्यने त्यांच्याजवळ जाऊन त्यांचे हात धरले व म्हणाला, "मामा तुम्ही रडू नका..! मी जेव्हा तो अपघात पाहिला तेव्हा अभिज्ञा बरोबर कोणीतरी होतं... पण, मी तिथून लांब असल्याने आणि अंधार असल्याने मला नक्की काय ते माहिती नाही...आणि ती अभिज्ञा आहे हे सुद्धा मला आत्ता माहिती पडतंय...."

"ही केस का बंद झाली? तुम्ही परत येऊन चौकशी केली नाही का?" इन्स्पेक्टर अरविंद यांनी सदा भाऊंना विचारलं....

"नाही ओ साहेब...मी इथं किती खेटा घातल्या, पर कोणी बी काय बी सांगत न्हाय.... गावात तर अशी अफवा पसरवली हाय की, ती कोणाचा हात धरून पळून गेली, नाहीतर मेली असंल कुठंतरी...

एकदा तर इथल्या मोठ्या साहेबांनी मला रस्त्यात गाठलं अन धमकीच दिली बघा... पुन्ह्यांदा चौकीत यायचं न्हाय, तुझी पोर गेली असंल पळून...तिची केस बंद झाली आता...!
असं सांगितल्यावर आम्ही गरिबानं काय करायचं ओ साहेब...

अहो साहेब माझी अभिज्ञा डाक्टर व्हती... ती कशाला कोणसंग पळून जाईल... मला तर वाटतं त्यानंच तिचा काटा काढला असंल..." सदभाऊंच हे बोलणं ऐकून आदित्यच्या मनात त्याच आठवणी पुन्हा पुन्हा येत होता आणि
त्यावेळी आदित्य "मी तेव्हा काहीच का केलं नाही?..." असा विचार करून त्या गोष्टीसाठी स्वतःला जबाबदार धरत होता....

"आदित्य...! हे बघ, तू या गोष्टीसाठी स्वतःला जबाबदार धरू नकोस...आपण आपल्या परीने प्रयत्न करतोय... आणि त्यावेळी तुझी मनःस्थिती ठीक नसल्याने तुला काहीच करता आलं नाही....

\"अभिज्ञाला नक्की न्याय मिळेल....!\" तू काळजी करू नकोस...!" नेहा आदित्यला समजावत म्हणाली...

"अभिज्ञाची जुनी फाईल जळाली असल्याने तुम्ही तिची संपूर्ण माहिती आम्हाला द्या... म्हणजे अभिज्ञाच्या गुन्हेगारांना शोधण्यास मदतच होईल...!"इन्स्पेक्टर अरविंद नी सदा भाऊंनी विचारलं...

"आणि तुम्ही मगाशी काय म्हणत होतात? त्याने म्हणजे कोणी तिचा काटा काढला असेल?तुम्ही मला सविस्तर सांगा..." इन्स्पेक्टर अरविंद नी सदा भाऊंना माहिती देण्यास सांगितलं....

"अभिज्ञाचं नाव अभिज्ञा सुरेश गायकवाड.....
अभिज्ञानं लय हालाकीचं दिवस काढलं... गावच्या शाळेत कसंबसं तिनं शिक्षण घेतलं...अभ्यासात लय डोकं व्हतं बघा पोरीचं...! तसं बी गावात कोणी डाक्टर न्हाय, म्हणून तिला डाक्टर बनायचं व्हतं.... आणि तिच्या आई-बापानं बी कधी विरोध केला न्हाय....

अभिज्ञाला डाक्टर व्हायचं म्हणून ती नाशिकच्या एका मोठ्या कॉलेज मध्ये शिकायला गेली व्हती...तिथं तिनं काय म्हणता तुम्ही ते, एम बी बी काहीतरी ती पदवी घेतली...." सदा भाऊंनी माहिती द्यायला सुरुवात केली...

"तुम्हाला एम. बी.बी.एस (MBBS) म्हणायचं आहे का? " इन्स्पेक्टर अरविंद नी विचारलं...

"व्हय, व्हय तेच ते...!
नंतर तिनं ते दुसऱ्या डाक्टर कडं शिकतात बघा, मग मोठी पदवी घेता येती..."

"तुम्हाला इंटर्नशीप म्हणायचंय का?" इन्स्पेक्टर अरविंद नी विचारलं...

"हा तेच ते..!
ते करून मग ती मोठ्या पदवी साठी एम.डी का काय करायला मुंबईला गेली..."

"म्हणजे अभिज्ञा एम.डी (MD) डॉक्टर होती तर...! मग तिथे तिची कोणाशी दुश्मनी होती का? की तिच्या कॉलेज मध्ये कोणी तिला त्रास देत होतं? " इन्स्पेक्टर अरविंद नी सदाभाऊंना विचारलं...

"अभिज्ञा मुंबईला मुलींच्या हास्टेल मधी राहायची... तिच्याबरोबरच्या एका पोरीला काही गुंडांनी त्रास दिला व्हता... तेव्हा काय झालं ते काय मला नीट माहीत न्हाय... पर त्यातच अभिज्ञाचा अपघात बी झाला व्हता... म्हणून तिची ती मैत्रीण तिला इथं घेऊन आली व्हती बघा....

त्यानंतर त्या पोरीला गुंडांनी धमकी दिली व्हती, तू जर पोलिसात गेलीस तर तुझ्याबरोबर तुझ्या मैत्रिणीला सुद्धा सोडणार न्हाय....

तिला म्या पोलिसात जा सांगितलं तर अभिज्ञाच मला म्हणाली की, आम्ही मुंबईला पोलिसात तक्रार केली आहे, पर नंतर काय झालं ते काय मला कोणी सांगितलं न्हाय....

म्हणून म्या मगाशी म्हणालो की \"त्यानंच अभिज्ञाचा काटा काढला असावा\"...." सदा भाऊंजवळ असलेली सगळी माहिती त्यांनी दिली....

"ठीक आहे, आम्ही शोध घेऊ या सगळ्याचा... पण तुम्ही आम्हाला त्या मुलीचं नाव आणि पत्ता सांगू शकाल का?..."इन्स्पेक्टर अरविंद नी त्या मुलीबद्दल सदा भाऊंना विचारलं....

"ती अभिज्ञा बरोबर त्या हास्टेल मध्ये व्हती.. ती कुठं राहते हे काय मला माहित न्हाय... काय व्हतं बरं तिचं नाव.... हा, सीमा नाईक..! हेच व्हतं तिचं नाव..."सदा भाऊंनी त्यांच्याजवळ असलेली सगळी माहिती दिली...

"आम्ही त्या मुलीचा पत्ता त्या हॉस्टेल ला जाऊन मिळवण्याचा प्रयत्न करतो...जर गरज पडली तर तुम्हांला परत बोलावून घेऊ, आता तुम्ही गेलात तरी चालेल..."इन्स्पेक्टर अरविंद नी सदाभाऊंना जाण्यास सांगितलं...

"मोहित...! तुम्ही तिघेही आता हॉटेलवर जावा... काही गरज वाटली तर मी बोलावून घेतो... तसंही आदित्य अजूनही पूर्णपणे बरा झालेला नाहीये so..."इन्स्पेक्टर अरविंद नी मोहितचे काका या नात्याने तिघांना परत जायला सांगितलं....

"साहेब... हे जे सदाभाऊ म्हणजेच अभिज्ञाचे मामा आले होते ना, त्यांना मी पाहिलंय तेही आपल्या ए. सी. पी. साहेबांबरोबर....

म्हणजे भोसले साहेब त्यावेळी यांनाच धमकावत होते, हे मला आत्ता आठवतंय... त्यादिवशी मी आणि भोसले साहेब एकत्र एका केसच्या चौकशीसाठी गेलो होतो...

तेव्हा मी गाडीत बसलेलो असतांना गाडीच्या काचेत पाहिलं, तेव्हा भोसले साहेब यांनाच धमकावत होते हे नक्की..." सावंत ना ही गोष्ट आठवताच त्यांनी इन्स्पेक्टर अरविंद ना सांगितली....

"सावंत तुम्हांला नीट आठवतंय का? की तुम्ही ए.सी. पी. साहेबांनाच पाहिलं...." इन्स्पेक्टर अरविंद ना या गोष्टीचं आश्चर्य वाटल्याने त्यांनी पुन्हा एकदा सवंतांना नीट आठवायला सांगितलं....

"हो साहेब, मला सगळं नीट आठवतंय..."सावंत ठामपणे बोलत होते...

"तुम्ही जे सांगताय ते खरं असेल ना सावंत, तर ही केस कधीच रिओपन होऊ शकत नाही..."इन्स्पेक्टर अरविंद सावंत ना म्हणाले...

"साहेब , आपण जर ही केस मोठ्या साहेबांच्या हातात दिली तर... ते नक्कीच आपली मदत करतील..."सावंत नी इन्स्पेक्टर अरविंद ना एक कल्पना सुचवली...

"म्हणजे डी.सी.पी. साहेबांकडे?" इन्स्पेक्टर अरविंद म्हणाले...

"हो..." सावंत

"तसंच करावं लागणार सावंत आपल्याला नाहीतर आपण या केस चं पुढचं investigation करूच शकणार नाही..." इन्स्पेक्टर अरविंद म्हणाले....

"मी लगेचच डी.सी.पी साहेबांना फोन करून बघतो... ते जर चौकीत येणार असतील तर उत्तमच होईल..."इन्स्पेक्टर अरविंद

"सर..!" अरविंद नी डी.सी.पी. साहेबांना फोन लावून महत्त्वाचं काम असल्याचं सांगितलं....

"मी थोड्याच वेळात पोलीस स्टेशन ला पोहोचतो मग बोलू..." एवढं बोलून डी.सी.पी साहेबांनी फोन कट केला...


डी.सी.पी. अजय राऊत हे अतिशय हुशार, प्रामाणिक, खोटेपणाची अत्यंत चीड, पण तेवढेच प्रेमळ.... हो पण , शिस्तीच्या बाबतीत अगदी कडक... कायद्यासमोर नाती आणि ओळख बाजूला ठेवणारं व्यक्तिमत्त्व....

अचानक अश्या व्यक्तिमत्त्वाचा चौकीत प्रवेश झाला....

"सर...!" (चौकीत असलेल्या सर्वांनी सेल्युट केला..)

"इन्स्पेक्टर अरविंद, माझ्या केबिनमध्ये या..."डी.सी.पी साहेब एवढंच बोलून केबिन मध्ये निघून गेले...

इन्स्पेक्टर अरविंद आणि सावंत दोघेही अभिज्ञाच्या केस ची जुनी फाईल आणि आत्ताचं आदित्य व सदाभाऊंचं स्टेटमेंट घेऊन डी.सी.पी. साहेबांच्या केबिनमध्ये गेले....

"सर...!"(दोघांनी सेल्युट केला..)

"बोला, इन्स्पेक्टर अरविंद काय महत्त्वाचं बोलायचंय?" डी.सी.पी. साहेबांनी इन्स्पेक्टर अरविंद ना विचारलं...

"सर ते... आपल्याला ही जुनी केस रिओपन करायची आहे, पण ही केस त्यावेळी ए.सी.पी. साहेबांनी क्लोज केली आहे..."इन्स्पेक्टर अरविंद अभिज्ञाच्या केसची जुनी जळलेली फाईल, आदित्य व सदाभाऊंच स्टेटमेंट समोर करत म्हणाले...

"मग, काय प्रॉब्लेम आहे? ए.सी.पी. अजिंक्य भोसले यांना तुम्ही सांगा..."डी.सी.पी साहेब म्हणाले..

"सर, साहेब दोन दिवस रजेवर आहेत..." सावंत म्हणाले...

"आणि सर, सावंतच्या म्हणण्यानुसार ही केस मुद्दाम बंद करण्यात आली आहे...
आणि आत्ता या मुलीच्या मामांनी स्वतः सांगितलं की इथल्या मोठ्या साहेबांनी त्यांना ह्या केसबद्दल पुन्हा काहीही न विचारण्यासाठी धमकावलं होतं...
आणि ते ए.सी.पी. साहेबच होते हे सावंतनी स्वतः पाहिलंय..." इन्स्पेक्टर अरविंद नी एका दमात सगळं सांगून टाकलं....

"काय? सावंत ही एवढी मोठी गोष्ट तुम्ही तेव्हाच का नाही सांगितली?" डी.सी.पी साहेब जरा चिडूनच बोलले...

"साहेब ते....... तेव्हा मी नवीन जॉईन झालो होतो आणि ती केस कुठली आहे हे सुद्धा मला माहिती नव्हतं....
आणि हे सगळं मी गाडीच्या काचेतून पाहिलं असल्याने हे सगळं मला माहिती आहे हे अजूनही त्यांना माहिती नाही.... आणि तुम्ही सुद्धा यातलं काहीच त्यांना सांगू नका साहेब प्लीज..." सावंत जवळजवळ रडकुंडीला येऊनच बोलत होते...

आणि हे कोणाचं स्टेटमेंट आहे? आदित्य सरंजामे कोण आहेत हे? आणि त्यांनी हे तेव्हाच का नाही सांगितलं?.." डी.सी.पी साहेबांनी आदित्यचं स्टेटमेंट पाहून इन्स्पेक्टर अरविंद ना विचारलं...

"सर, त्यावेळी जेव्हा हा सगळा प्रकार घडला तेव्हा आदित्य तिथून लांब उभा होता आणि सर्वत्र अंधार होता...

आणि त्यावेळी त्याचा नुकताच एक accident होऊन गेल्याने आणि त्याने पाहिलेल्या घटनेघटनेमुळे तो भास आहे की सत्य या विचाराने काही दिवसांनी तो डिप्रेशन मध्ये गेला....

आणि आत्ता त्याला काही गोष्टी पुन्हा एकदा आठवू लागल्या....आणि हे सगळं मला ते तिघे इथून जायच्या आधी त्याच्या मैत्रिणीने म्हणजेच नेहाने सांगितलं..." इन्स्पेक्टर अरविंद नी नेहाने सांगितलेला सर्व प्रकार डी.सी.पी साहेबांना सांगितला....

"ठीक आहे... आत्ता सध्या ह्या केसचं investigation महत्त्वाचं आहे...तुम्ही पुढची चौकशी सुरू करा...आणि हो... सावंत तुम्ही सांगितलेला एकही शब्द खोटा निघाला तर...!"डी.सी.पी साहेबांनी पुढची चौकशी करायला सांगितली....

इन्स्पेक्टर अरविंद आणि सावंत दोघेही निश्चिंतपणे पुढच्या चौकशीची तयारी करायला गेले....

"सावंत आपल्याला त्या गर्ल्स हॉस्टेल वर जाऊन त्या सीमा नाईक चा पत्ता शोधायला हवा...चला, आपल्याला मुंबईला निघायला हवं... शिंदे गाडी काढा..."इन्स्पेक्टर अरविंद आणि सावंत सीमाचा पत्ता शोधण्यासाठी गेले.....

गर्ल्स हॉस्टेलला पोहोचल्यावर इन्स्पेक्टर अरविंद आणि सावंत वॉर्डन (व्यवस्था पाहणारा व शिस्त राखणारा अधिकारी) केबिनजवळ गेले....

केबिनमध्ये गेल्यावर समोरच मुकुंद शिर्के नावाची पाटी होती.....


*************************************************

अभिज्ञाच्या मामाला ए.सी.पी. अजिंक्य भोसले यांनी का धमकावलं असेल?

मुकुंद शिर्के यांच्या कडून 4-5 वर्ष जुनी माहिती मिळेल?

ए.सी.पी साहेबांनी ही केस पुन्हा ओपन करू दिली नाही तर..?

या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन भेटूया पुढच्या भागात....

क्रमशः 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Reshma Sonawane

Housewife

Listening and reading