Oct 24, 2021
कथामालिका

कोण होती ती....? भाग 4.

Read Later
कोण होती ती....? भाग 4.

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..


कोण होती ती....?भाग 4.

©रेश्मा आणि साक्षी.

(सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून यातील स्थळ, व्यक्ती, घटना, वास्तू, यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही....)

*************************************************

(मागील भागात आपण पाहिलं आदित्यच्या आठवणीतील आणखी एक आठवण म्हणजे कॉलेज मध्ये असतांना केलेला भंडारदऱ्यातील कॅम्प..... या कॅम्प मध्ये सगळे फिरून दमलेले असतात व झोपी जातात, आदित्यचा डोळा उघडतो व रात्रीच्या लख्ख अंधारात आदित्य बाहेर पडतो... आता पुढे....)..


मी त्या काजव्यांच्या मागे असा चालत होतो जणू मला कोणी संमोहित केले आहे....मी त्या निसर्गरम्य वातावरणात हरवून गेलो होतो.... काजवे पाहत पाहत मी बऱ्याच लांब डोंगराळ भागात चालत आलो...

माझ्या एका हातात टॉर्च आणि दुसऱ्या हातात मोबाईल होता...मी त्या काजव्यांचे फोटो आणि व्हिडिओ काढत होतो.... नुकताच पाऊस पडून गेल्याने हवेत गारवा होता....

आजूबाजूचे डोंगर काजव्यांनी लखलखत होते...जणू त्या डोंगरांवर दिवाळीच साजरी होत आहे.... आणि त्यात ओल्या मातीचा सुगंध दिवाळीतील उटण्याची आठवण करून देत होता....

जणू ते डोंगर दिवाळीच्या पहिल्या दिवशी तेल लावून उटण्याने अभ्यंगस्नान करत आहेत....अहाहा....काय ते दृश्य...!ही रात्र संपूच नये असं वाटत होतं....

मी तिथल्या प्रत्येक काजव्याकडे निरखून पाहत होतो....ते लख्ख अंधारात चमचम करणारे काजवे, \"अंधारातही कुठेतरी प्रकाशाचा उजेड हा असतोच...आपण प्रयत्न सोडू नयेत...\"हे दाखवून देत होते....

सहज काजवे पाहता पाहता माझी नजर काही अंतरावर असलेल्या डोंगरावर गेली, तिथे मला काजव्यांच्या अंधुक प्रकाशात तीन-चार सावल्या दिसल्या....

त्या सावल्या आहेत की माझा भास आहे यावर माझा विश्वास बसत नव्हता आणि माझ्या टॉर्च चा उजेड त्या डोंगरापर्यंत पोहोचू शकत नव्हता....

म्हणून मी नजर फिरवणार.... तितक्यात मला तिथे काहीतरी हालचाल जाणवली...त्या सावल्यांपैकी काही सावल्या जोर-जोरात हालचाल करू लागल्या....त्यातील एक सावली बाकीच्यांना जणू स्वतःपासून लांब करू पाहत होती....आणि अचानक...

कोणत्यातरी एका मुलीची किंकाळी ऐकू आली....\"आSSSSSSS\"....
कोणतरी मुलगी संकटात आहे आणि आपल्याला मदतीसाठी बोलावतेय असं काहीसं त्या ठिकाणी उभं राहून मला वाटत होतं....

मी आजूबाजूला नजर फिरवली पण डोंगरावरून काहीतरी खाली कोसळलं असा एका क्षणासाठी मला भास झाला....पण मी काहीच करू शकलो नाही..."

हे सर्व सांगतांना मला दरदरून घाम फुटला व मी माझे डोळे पटकन उघडले.... माझं डोकं आता सहन करण्यापलीकडे दुखत होतं.... डॉ.रजनीने मला लगेचच एक इंजेक्शन दिलं व मला शांत झोप लागली.....

डॉ.रजनी बाहेर आल्या...
"कसा आहे आदि? any problem?..."नेहाने विचारलं...

"Nothing... फक्त त्याला एका मुलीचे भास होतायत की ती त्याला मदतीसाठी बोलावतेय पण तो काहीच करू शकत नाही, असं त्याला सतत वाटतंय...
तुला त्याच्या भूतकाळातील एखादी अशी मुलगी माहिती आहे का, जिला त्याची मदत हवी होती पण तो करू शकत नव्हता?.."डॉ. रजनीने नेहाला विचारलं....

"नाही...मला असं काहीच माहिती नाही.."नेहाला काय बोलावं काहीच सुचत नव्हतं....

"म्हणजे त्याने त्याच्या भूतकाळातील ज्या आठवणी सांगितल्या त्या आठवणींमध्ये त्याने दोन वेळा मुलीचा उल्लेख केला....आता ती एकच मुलगी आहे की दोन वेगवेगळ्या मुली आहेत याचा शोध आपल्याला घ्यावा लागेल.....

आदित्यने एकदा त्याचा accident झाला तेव्हा, आणि भंडारदऱ्यातील प्रसंग जो त्याने पाहिला तेव्हा....मुलीचा उल्लेख केला आहे...याबद्दल आठवून बघ तुला काही आठवतंय का??"डॉ.रजनीने नेहाला दोन्ही प्रसंग आठवायला सांगितले....

"हो...म्हणजे जेव्हा आदित्यचा accident झाला तेव्हा त्याच्याबरोबर आमची मैत्रीण समिधा तिथे होती...पण त्या मुलीला आदित्यची मदत हवी होती किंवा तिने तिला मदत हवी आहे असं काहीच सांगितलं नव्हतं....आणि नंतर तिचा काही पत्ता सुद्धा सापडला नाही..

आणि आदित्यने भंडारदऱ्यातील त्या मुलीबद्दल किंवा तू जो प्रसंग सांगतेयस त्याबद्दल कोणालाच काहीच सांगितलं नाही...."नेहाला त्या प्रसंगाबद्दल काहीच माहिती नसल्याने नेहाला धक्काच बसला....

"ठीक आहे...टेंशन नको घेऊस... आणि आता आदित्यला याबद्दल काहीच विचारू नकोस, कदाचित त्याला त्रासही होईल..."डॉ. रजनी नेहाशी बोलत असतानाच आदित्य बाहेर आला....

"आता बरं वाटतंय का आदित्य?"डॉ. रजनीने विचारल्यावर आदित्यने त्याचं डोकं खूप दुखतंय व गरगरतंय असं सांगितलं....

त्यावर डॉ. रजनीने आदित्यला काही औषधं दिली, याने तुला बरं वाटेल आता तू या गोष्टींचा विचार बाजूला ठेव असं सांगितलं... आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सहा वाजता पुन्हा एकदा सेशन साठी बोलावलं...

"थँक्स रजनी..आम्ही उद्या येतो.."नेहा रजनीला म्हणाली व दोघेही घरी जायला निघाले....

दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये आदित्यचं नीट लक्ष लागत नव्हतं... मोहितच्या ते लक्षात आलं तेव्हा त्याने नेहाला विचारलं,"नेहा any problem? गेल्या दोन-तीन दिवसांपासून आदित्य सरांचं कामात लक्ष नाहीये..."

"हो, जरा त्याची तब्येत बरी नाहीये...सांगेन मी तुला नंतर..."एवढं बोलून नेहा तिचं काम करण्यात गुंग झाली....

आदित्यने कसंबसं कामात लक्ष घालून काम पूर्ण केलं व हेड ब्रांचला हाफ डे आणि काही दिवसांची रजा हवी असल्याचा मेल करून ठेवला...

त्याचं संपूर्ण काम होईपर्यंत हेड ब्रांचचा रिप्लाय आला...आदित्यच्या आधीच्या रजा बाकी असल्याने त्याला रजा मिळण्यास काही प्रॉब्लेम आला नाही, पण त्या मेल मध्ये नवीन CEO यायच्या आधी तुला कामावर पुन्हा रुजू व्हावं लागेल असं स्पष्ट केलेलं होतं.... आदित्य घरून डॉ.रजनीच्या क्लीनिकमध्ये डायरेक्ट पोहोचणार होता....

नेहाने सुद्धा तिची कामं लवकर पूर्ण करायला सुरुवात केली... कारण काही दिवसांत नवीन CEO कडे सर्व कामाचे रिपोर्ट्स देणं गरजेचं होतं....

संध्याकाळी पावणे सहा च्या सुमारास नेहा डॉ.रजनीच्या क्लीनिक जवळ पोहोचली...आदित्यसुद्धा पुढच्या पाच मिनिटांत तिथे पोहोचला....

"Good Evening रजनी..."
"Good Evening..."
आता कसं वाटतंय आदित्य? औषधाने आराम मिळाला का?"डॉ. रजनीने आदित्यला विचारलं...

"हो...पण ..." आदित्यला सांगू की नको हाच प्रश्न पडत होता...

"पण काय आदित्य? अजूनही काही त्रास होतोय का? तसं असेल तर सांग मी औषधं बदलून देते.."डॉ.रजनीने आदित्यला विचारलं असता आदित्य फक्त एवढंच म्हणाला ," माझ्या मनात अजूनही त्याच मुलीचा विचार येतोय... कोण होती ती??.."

"ओके... मी आता तुझीच फाईल चेक करत होते, तुझी सगळी history, तुला पडणारी स्वप्न, होणारे भास ह्याचा मी नीट अभ्यास केला...
काल आपण काही पेपर्स sign करायचे होते ते केले नाहीत, जस्ट फॉर या फॉर्मलिटी ते महत्वाचं असतं, तू sign कर ... तोवर मी आलेच..."असं म्हणून डॉ.रजनीने काही पेपर्स आदित्यला sign करायला दिले, व काही कारणासाठी केबिनच्या बाहेर आल्या....

काही मिनिटांत डॉ.रजनी पुन्हा केबिन मध्ये आल्या व म्हणाल्या, " माझ्या अनुभवानुसार ज्या ठिकाणी घटना घडली असेल त्या ठिकाणी जर पेशंट पुन्हा गेला तर त्याला सगळं आठवायला मदत होते...

त्यामुळे मला असं वाटतं आदित्य, की तू पुन्हा भंडारदऱ्यातील त्या ठिकाणी जाऊन पहावंस, कदाचित अशी एखादी गोष्ट असेल की ती तुला तिथे गेल्यावर आठवेल... कदाचित तुझ्या \"कोण होती ती..?\"चं उत्तर तुला तिथेच मिळेल....

या सगळ्यात तुझं मत फार महत्त्वाचं आहे तुला जर तिथे जायची इच्छा असेल तरच जा...."

"हो, मला तर तिथे जायचंच आहे.. मला \"कोण होती ती..?\" चा उलगडा केल्याशिवाय आता चैन पडणार नाही..." आदित्य ठामपणे बोलत होता...

"बरं तू जा...!पण नेहाला सुद्धा सोबत घेऊन जा...अश्या परिस्थितीत तू एकट्याने तिथे जाणं योग्य नाही..."डॉ. रजनीने आदित्यला सांगितलं...

"हम्म... माझं काहीही झालं तरी चालेल पण मी त्या मुलीचा शोध घेणारच..." आदित्यच्या डोळ्यात आता एक वेगळीच चमक जाणवत होती...

"नेहा आणि आदित्य निघायच्या वेळी पुन्हा एकदा नेहाला आदित्यने तिथे एकट्याने जायला नको...हे डॉ.रजनीने बजावून सांगितले आणि जर त्याला तिथे त्रास झाला आणि गरज पडली तर मी एक इंजेक्शन लिहून देते ते त्याला दे."

"आदित्य माझं थोडं ऑफिसमध्ये काम पेंडिंग आहे ते झालं की मग आपण जाऊयात का?.." नेहाने आदित्यला विचारलं...

"हो चालेल... आणि हो काही दिवसांची रजा घे आपल्याला कधी परत येता येईल ते सांगता येत नाही..." चला उद्या आपण निघू म्हणजे माझ्या \"कोण होती ती..?\" च उत्तर मला मिळेल म्हणून मी खुश आहे...उद्या सकाळी 10 वाजता बोरिवली स्टेशन जवळ भेट...."आदित्य म्हणाला, आणि खरंच तो आज जरा रिलॅक्स वाटत होता...

नेहा घरी पोहोचल्यावर नेहाला मोहितचा फोन आला...

"hello नेहा झोपली नाहीस का?"मोहित..

"झोप लागत नाहीये..."नेहा..

"म्हणजे?.. काही problem आहे का? मी येऊ का मदतीला?.." मोहित..

"मोहितने असे विचारल्याबरोबर नेहाच्या डोक्यात ट्यूब पेटली, आपण आपल्यासोबत मोहितला सुद्धा न्हेलं तर त्याची मदतच होईल....."नेहा स्वःशीच विचार करत होती...

"हॅलो नेहा, मी येऊ का?, काही प्रॉब्लेम आहे का?" मोहितच्या आवाजाने नेहा भानावर आली...

"नेहाने आदित्यला होणाऱ्या भासबद्दल व स्वप्नांबद्दल सविस्तर मोहितला सांगितलं आणि तू सुद्धा उद्या आमच्याबरोबर येशील का?" असं विचारलं...

"why not... मी जरी ऑफिस मध्ये आदित्य सरांचा कलीग असलो तरी ऑफिसच्या बाहेर मी आदित्यचा मित्र आहे..." मोहित एवढं सगळं ऐकून सुद्धा शांतपणे बोलत होता...

"चला मग उद्या आपल्याला सकाळी 10 वाजता बोरिवली स्टेशन जवळ पोहोचायचंय आदि तिथेच येणार आहे.... आताच मेन ब्रांचला रजेचा मेल करून ठेवू आणि झोपू....चल good night..."असं म्हणून नेहाने फोन कट केला...आता नेहासुद्धा थोडी रिलॅक्स वाटत होती....

दुसऱ्या दिवशी सकाळी नेहा आणि मोहित बरोबर 10 वाजता आपापल्या बॅगा घेऊन स्टेशनला पोहोचले....

अरे मोहित तू कुठे निघाला आहेस का?" आदित्यला काहीच माहिती नसल्याने आदित्यने मोहितला विचारलं....

"आदि अरे तो आपल्याबरोबर येतोय....म्हणजे i am really sorry मीच त्याला सगळं सांगितलं आणि आमच्याबरोबर येशील का म्हणून विचारलं.. अरे म्हणजे आपल्याला मदतच होईल की, plzz आदि नाही म्हणू नकोस..."नेहा आदित्यला समजावत कमी आणि मस्के जास्त मारत होती...

"हो रे आदित्य तूच म्हणतोस ना मी ऑफिस बाहेर तुझा मित्र आहे...मग तुला आपल्या मैत्रीची शप्पथ...मी येणार आहे..."मोहित आणि नेहा त्याला मस्का मारतायत हे बघून आदित्य बऱ्याच दिवसांत आज हसला व म्हणाला, "मी कुठे काही म्हणालो...चला आता..."

तिघेही गाडीत बसले...गाडीत बसल्यावर मोहितने जवळच्याच हॉटेल मध्ये 2 रूम ऑनलाईन बुक केल्या...साधारणतः 4 वाजताच्या सुमारास तिघेही हॉटेलवर पोहोचले....


*************************************************

भंडारदऱ्यात गेल्यावर आदित्यला त्याच्या \"कोण होती ती..?\" च उत्तर मिळेल?

हा जर फक्त आदित्यचा भास असेल तर?

आणि जर भास नसेल तर मग कोण होती ती..?

या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन भेटूया पुढच्या भागात......

क्रमशः

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Reshma Sonawane

Housewife

Listening and reading