Oct 18, 2021
कथामालिका

कोण होती ती....? भाग 2.

Read Later
कोण होती ती....? भाग 2.
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
कोण होती ती.....?भाग 2.


©रेश्मा आणि साक्षी..

(मागील भागात आपण पाहिलं...आदित्यला सतत पडणाऱ्या स्वप्ननांमुळे आदित्य नेहाबरोबर डॉक्टर रजनीकडे गेले... डॉक्टर रजनीने सांगितल्याप्रमाणे आदित्यने जुन्या आठवणी आठवून सांगायला सुरुवात केली.... आता पुढे......)


नेहमीप्रमाणे आम्ही सर्वजण कट्ट्यावर बसलो होतो, म्हणजे आमचं पहिलं लेक्चर ऑफ आहे हे आम्हांला कॉलेजमध्ये आल्यावर समजल्याने आम्ही कट्टयावर टाईमपास करण्यासाठी गेलो... समिधा दुसऱ्या लेक्चरच्या दहा ते पंधरा मिनिटं आधी आम्हांला जॉईन झाली.....

"अग समिधा, आम्हाला कॉलेजला आल्यावर समजलं, की आज पहिलं लेक्चर ऑफ आहे म्हणून...तुला कसं कळलं?? मग आम्हाला का नाही सांगितलंस??..."नेहाने समिधाला विचारलं....

समिधाने फक्त एकदा नजर सुशकडे वळवली.....

"तुला कसं कळत नाही ग नेहा?.... सुयशने मेसेज केलाच असेल की!...." सिद्धार्थ सुयशला चिडवत म्हणाला.....

"ए मी काही मेसेज वगैरे नाही केलाय हा???मी कशाला करू??...." सुयशने सारवासारव केलेली पाहून समिधाने लगेच त्याच्याकडे डोळे वटारून पाहिलं.... ते पाहून सगळेच मोठ्याने हसायला लागले.....

"ते सगळं जाऊ देत.. पण ए टॉम तुझी जेरी कुठे राहिली???.." नेहा सिद्धार्थला उद्देशून म्हणाली....

"अरे ती बघा आली आपली लेडी डॉन...!" मी रियाकडे बोट दाखवत म्हणालो.....

"काय ग लेडी डॉन, आज कोणाचे हात-पाय मोडलेस? की डायरेक्ट डोकंच फोडलंस??...." सिद्धार्थ मुद्दाम रियाला डीवचत म्हणाला.....

तशी रियाने तिच्या खांद्यावरची बॅग काढली आणि हलकेच सिध्दार्थच्या डोक्यात मारून म्हणाली "आता हलकेच मारतेय...! परत जर असं काही बोललास ना तर डोकंच फोडीन, लक्षात ठेव..."

"ए बास झालं हा टॉम अँड जेरी..! तुम्ही नंतर continue करा....आपल्याला लेक्चर ला जायला उशीर होतोय...." नेहा दोघांच्या मध्ये मध्यस्ती करत रागाने म्हणाली... आणि आम्ही सगळे लेक्चरला गेलो....

लेक्चर संपल्यावर आम्ही गेटजवळ थांबलो आणि निघणार तेवढ्यात नेहा सहजपणे बोलून गेली..."काय यार, किती बोअर होतंय... किती दिवस झाले आपण सगळे कुठे गेलोच नाही....कुठेतरी फिरायला जाऊ यात ना....!"

"चला आपण हॉरर मुव्हीला जाऊयात, मी उद्याचंच नाईट शो चं तिकीट बुक करते..." रिया उत्साहात म्हणाली....

"ए उद्या नको ना हॉरर मूव्ही...... उद्या अमावस्या आहे.... मला भीती वाटते...."समिधा घाबरून म्हणाली....

"खरच जर समिधाला भीती वाटत असेल तर आपण नको ना जाऊयात उद्या...!" सुयशने लगेच समिधाची बाजू घेतली.....

"ओयय.... कोणत्या काळात जगतोय आपण.....जर तू या कारणासाठी मूव्हीला यायला नको म्हणत असशील ना तर आपण उद्या जायचंच मुव्ही बघायला.... आपण उद्या जातोय म्हणजे जातोय हे ठरलं...!" सिद्धार्थ थोडा रागाने म्हणाला......

सगळ्यांनीच त्याला सहमती दर्शवली....

रियाने लगेचच ऑनलाईन रात्रीची लास्ट शो ची तिकीट्स बुक केली....

दुसऱ्या दिवशी सकाळी कॉलेज , आणि संध्याकाळपर्यंत अभ्यास आवरून सगळे जवळपास रात्री 8:30 वाजता थिएटर जवळ पोहोचले....

रात्री 9 चा शो होता, पण पावसाचे दिवस असल्याने सतत पाऊस सुरू होता, म्हणून सगळे लवकरच निघाले होते ......

जेव्हापासून मुव्ही सुरू झाली होती, तेव्हापासून समिधाने बाजूलाच बसलेल्या नेहा आणि सुयश चा हात घट्ट धरून ठेवला होता...नेहा सतत तिला समजावत होती...पण सुयशच्या मनात मात्र गुदगुल्या होतं होत्या..... ही मूव्ही संपूच नये असं त्याला वाटत होतं....

जशी मूव्ही मध्ये भुताची एन्ट्री झाली तशी समिधा मोठ्याने किंचाळली..... हे पाहून थिएटर मधील सर्व लोकं त्यांच्याकडे पाहत होते.....

"ए समिधा एवढं काही नाही झालंय...! कशाला उगाच आमची लाज घालवतेस?...." सिद्धार्थ चिडून म्हणाला....तशी समिधाने मान खाली घातली व सॉरी म्हणाली....

"ए सिद्ध्या एवढ्या अंधारात तुझा चेहरा कोणाला दिसणार आहे का? आणि कोण ओरडतंय ते तरी कळणार आहे का?..."सुशने पुन्हा एकदा समिधाची बाजू घेतली... हे पाहून मात्र आता सिद्धार्थ फारच चिडला होता....

तोपर्यंत इंटरवल झाला आणि नेहाने सिद्धार्थ ला उठवले..."सिद्ध्या चिल्ल.....चल आपण जाऊन पॉपकॉर्न आणि कॉल्डड्रिंक घेऊन येऊ..." सगळे जरा थंड व्हा......

सगळ्यांनी पॉपकॉर्न खाल्ले....आणि कोल्ड्रिंक पिउन झाल्यावर सगळे जरा शांत झाले....

मूव्ही संपल्यावर आम्ही घरी जायला निघालो...तोवर रात्रीचे 12:30 झाले असतील....आता मात्र बराच वेळ पाऊस पडून गेल्याने संपूर्ण मेन रोड पाण्याखाली गेला असेल याची आम्हाला खात्री होती....

म्हणून आम्ही शॉर्ट कट वाल्या जंगलाजवळून जाणाऱ्या रस्त्याने जाण्याचा निर्णय घेतला....तसं त्या रस्त्यावरून आमचं घर पंधरा ते वीस मिनिटांच्या अंतरावर होतं....

आधीच आम्ही सगळे एकमेकांच्या बाईक वरून आल्याने, ज्याच्या घराजवळच्या अंतरावर ज्याचं घर आहे, त्याने त्याला घरी सोडायचं, असं ठरलं.....

"अरे एवढंच ना!, मग मी आणि समिधा माझ्या बाईक वरून जातो..."सुयश आनंदी होऊन म्हणाला.....

"अरे सुयश, समिधाला आदित्य सोडेल की तसंही ते दोघं एकाच सोसायटीमध्ये राहतात....तू मला सोड!"...नेहा सुयशला जसं म्हणाली तसा सुयशचा चेहरा थोडा हिरमुसला....

पण दुसरा पर्याय नव्हता... कारण, समिधाला सोडून ह्याला परत गाडी मागे फिरवून यावं लागलं असतं.... म्हणून तोही तयार झाला....

"म्हणजे मी ह्या गाढवाबरोबर जाऊ???" रिया सिध्दार्थला उद्देशून म्हणाली.....

"ए तुला यायचं तर ये, नाहीतर रहा इथेच... मी निघालो...." असं म्हणत सिध्दार्थने गाडी सुरू केली...

"ओल्ले माझ्या सुद्धूला राग आला" अशी नौटंकी करत रियाने सिद्धूच्या पाठीत बुक्की घातली आणि गाडीवर बसली...

तसा सिद्धार्थ थोडा कळवळला, आणि म्हणाला," हिला लवकर घरी सोडतो, नाहीतर माझं काही खरं नाही..." तसे सगळेच हसायला लागले.....

काही अंतर पुढे गेल्यावर आमच्या सर्वांचे रस्ते वेगळे झाले.... रिया आणि सिद्धार्थ उजवीकडच्या रस्त्याने गेले, सुयश आणि नेहा डावीकडच्या रस्त्याने गेले, तर मी आणि समिधा सरळ रस्त्याने जात होतो....

अचानक माझी बाईक बंद पडली.... समिधाने त्यावर अनेक प्रश्न विचारायला सुरुवात केली, "अशी कशी बंद पडली तुझी गाडी?,
आता घरी कसं जायचं?,
एकतर मी इथे मावशीकडे राहते, त्यात जर उशीर झाला ना मला तर मावशी चिडेल हा माझ्यावर..!."

अग समिधा पावसाळ्याचे दिवस आहेत ना, बहुदा सायलेन्सर मध्ये गेलं असेल पाणी.....किंवा थंड पडली असेल, पावसाळ्यात होतं असं.....थांब जरा मी बघतो.... उतर खाली....

मी गाडीला किक मारून स्टार्ट करण्याचा प्रयत्न करत होतो, पण गाडी काही चालू झाली नाही.....

"मी सिद्धार्थ किंवा सुयशला फोन करते, ते येतील आपल्या मदतीला...."समिधा फार घाबरल्याने ती असं काहीसं बोलत होती....

"नको... आपण करू काहीतरी..."मी समिधाला धीर दिला....

पण तेवढ्यात समिधाला काही अंतरावर हालचाल जाणवली, आणि तिथे कोणीतरी आहे याची तिला खात्री होती.....

तिने नजर रोखुन पाहिलं तर तिला कोणीतरी मुलगी तिथे आहे याची खात्री पटली... तिने लगेच माझा हात घट्ट धरला आणि दबक्या आवाजात मला म्हणाली, तिथे कोणतरी मुलगी आहे वाटतं !..."

मी थोडं निरखून पाहण्याचा प्रयत्न केला... street लाईटच्या अंधुक प्रकाशात ती पाठमोरी उभी दिसत होती.....

फिकट गुलाबी रंगाचा ड्रेस घातलेली, लांबसडक केसांची वेणी घातलेली, अशी ती लांबून भासत होती....

मी तिच्याजवळ जाऊन बघतो तिला आपली काही मदत हवी असेल तर?..." असं म्हणून मी पाऊल पुढे टाकणार तितक्यात समिधाने मला अडवलं....

"वेड लागलंय का आदित्य तुला??? एवढ्या शांत ठिकाणी रात्रीची कोणीही मुलगी दिसली तर लोकं थांबत नाहीत......
तू गाडी सुरू कर चल..."समिधा माझ्यावर फारच चिडली होती हे पाहून मी गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करत होतो....

पण गाडी काही सुरू होईना... आणि मला त्या मुलीला काही मदत हवी आहे का हे विचारल्याशिवाय राहवेना!...

मी समिधाचं काहीही न ऐकता रस्त्याच्या पलीकडे गेलो... आणि ती मुलगी जिथे उभी होती त्या दिशेने चालू लागलो..... समिधाला फक्त 2मिनटं थांब लगेच येतो असा इशारा करूनच मी पुढे गेलो.....

ती बरीच लांब होती..... तिच्यापर्यंत पोहोचेपर्यंत माझ्या मनात खूप प्रश्न निर्माण होतं होते...

कोण असेल ती?,
एवढ्या रात्री जंगलाजवळच्या रस्त्याला हीच काय काम असावं?,
जर ही मुलगी एखाद्या चोरांच्या टोळीला सामील असेल तर??
नाही, दिसतांना फार साधी दिसतेय...
तिला खरंच मदत हवी असेल....
पण दिसतं तसं नसतं आदित्य, जमाना बदलला आहे.. आपण जरा संभाळूनच बोलूयात तिच्याशी...." मी स्वतःशीच बोलत बोलत त्या मुलीपेक्षा थोड्याच अंतरावर येऊन पोहोचलो....

मी तिला शुक शुक करून हाका मारली..... ती मागे वळून पाहणार तोच मागून भर वेगात एक ट्रक आला आणि त्याने आम्हा दोघांना धडक दिली..... मी तिला झाडीत पडतांना पाहिलं व माझी शुद्ध हरपली....

समिधाने हा सर्व प्रकार प्रत्येक्षात पाहिला होता... ती धीट नसल्याने ती फार घाबरली, आणि तिचा जागीच थरकाप उडाला....

ती स्वतःला सावरत कशीबशी माझ्याजवळ आली... तिने मला उठवण्याचा प्रयत्न केला..."आदित्य उठ ना...! डोळे उघडं ना आदित्य...!"
मी शुद्ध हरपली आहे हे पाहून तिने लगेचच तिच्या फोन वरून रियाला कॉल लावला.....

"हॅ.... हॅ.... हॅलो रिया!, तुम्ही जिथे कुठे असाल तिथून परत या plzz.... आदित्यचा accident झालाय आम्ही ज्या रस्त्याने निघालो होतो तिथून थोडं पुढे, तुम्ही सगळे लवकर या......" ती जवळजवळ रडतच बोलत होती.....
हे पाहून रिया आणि सिध्दार्थने लगेच गाडी मागे वळवली.....
रियाने लगेचच नेहालासुद्धा फोन करून परत बोलावून घेतलं....

पुढच्या पाच मिनिटांत सगळे हजर झाले... नेहाने माझ्या चेहेऱ्यावर पाणी शिंपडले... मी अंधारात पडलो असल्याने सिध्दार्थने मोबाईलची टॉर्च ऑन केली...

तेव्हा माझ्या डोक्याला लागलेल्या मारातून होणारा रक्तस्त्राव सगळ्यांनी पाहिला व लगेचच सिद्धार्थ आणि सुयशने मिळून मला सिद्धार्थ च्या गाडीवरून जवळच्याच \"सिटी हॉस्पिटल\" मध्ये दाखल केलं....

नेहा आणि रिया समिधाला सावरत होत्या....
कसं झालं समिधा हे सगळं?
तू सुद्धा होतीस ना गाडीवर आदित्य बरोबर, तुला काही लागलं नाही ना??
गाडी सरळ उभी कशी??
तुमचा accident झाला ना?? अग समिधा बोल ना काहीतरी.... समिधा मात्र काहीच बोलत नव्हती......

"डॉक्टरांनी मला तडक icu मध्ये नेण्याची ऑर्डर दिली......थोड्या वेळात डॉक्टर बाहेर आले, आणि o निगेटिव्ह ब्लड गृप असलेले ब्लड पहाटेपर्यंत आणा...... नाहीतर पेशंटच्या जीवाला धोका आहे......"असं सांगितलं...

हे ऐकल्यावर सगळ्यांनीच धावपळ करत पहाटेपर्यंत ब्लड बँक आणि इतर कोणी ओळखीचे लोकं यांच्याकडून ब्लड ची व्यवस्था केली....

माझ्यासाठी या सगळ्यांनी किती मेहनत केली असेल हे त्यांचं त्यांना माहिती....

या सगळ्याची रात्रीच नेहाने बाबांना फोन कल्पना दिल्याने बाबा रात्रीच हॉस्पिटलमध्ये पोहोचले........"नेहा आदि कसा आहे?? कसं झालं हे सगळं?? त्याला फार लागलं नाही ना??डॉक्टर कुठे आहेत??"बाबा नेहाला विचारत होते....

तेवढ्यात डॉक्टर icu मधून बाहेर आले....
"डॉक्टर कसा आहे माझा मुलगा??मी जाऊन भेटू का त्याला??" बाबा डॉक्टरांना विचारत होते....

"तुम्ही जरा शांत व्हा...आदित्य अजूनही शुद्धीवर आला नसल्याने आम्ही आता काहीच सांगू शकत नाही..."डॉक्टर म्हणाले....

"काही टेंशन घ्यायचं कारण नाही ना??"बाबांनी डॉक्टरांना विचारलं...

"आता मी काहीच सांगू शकत नाही...जर पुढच्या 24 तासात आदित्य शुद्धीवर आला नाही तर मात्र condition critical होऊ शकते..." डॉक्टर म्हणाले...

तेवढ्यात समोरून इन्स्पेक्टर रमाकांत मोहिते येताना दिसले, त्यांच्याबरोबर एक कॉन्स्टेबल सुद्धा होता...त्यांनी डॉक्टरांना इथे कोणती accident केस आली आहे का?? आम्हाला इथून फोन आला होता.....

"अरे सचिन तू इथे कसा काय??,
वहिनी आणि आदित्य बरे आहे ना??" इन्स्पेक्टर रमाकांत मोहिते हे बाबांचे मित्र असल्याने त्यांनी बाबांना विचारले.....

"अरे रमाकांत, आदित्यचा accident झालाय..!"बाबांनी मोहिते काकांना सांगितलं....

ओSSS ... म्हणजे आदित्यच्या accident केसचा आम्हाला इथून फोन आला होता तर..!

"इन्स्पेक्टर साहेब अजून पेशंट शुद्धीवर आला नाहीये....शुद्धीवर आला की आम्ही कळवतो..."एवढं बोलून डॉक्टर तिथून निघून गेले....

"तू नको काळजी करुस सचिन, मी स्वतः या केस मध्ये लक्ष घालतो....कळेल लवकरच..." बाबांना धीर देऊन मोहिते काका तिथून निघून गेले.....


*******************************************आदित्यच्या जुन्या आठवणीतील एक आठवण म्हणजे त्याचा अपघात....

हा त्याचा अपघात जर त्या मुलीमुळे झाला असेल तर....कोण होती ती???

ह्या मुलीचा आदित्यच्या स्वप्नाशी काही संबंध तर नसेल ना..!

पाहूया पुढच्या भागात....

क्रमशः..

(कथा लिहिण्याची पहिलीच वेळ असल्याने कथेतील कड्या जोडायला थोडा वेळ लागतोय...भाग post करायला उशीर झाल्यामुळे क्षमस्व....)
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Reshma Sonawane

Housewife

Listening and reading