Mar 03, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

भ्रमिष्ट कोण? भाग अकरा

Read Later
भ्रमिष्ट कोण? भाग अकरा


भाग अकरा.

गेल्या भागात आपण पाहिले की, शेजारच्या बाईला अटॅक येतो. डॉक्टर उपचार करत असतात. डॉक्टर बाहेर आल्यावर नेहा लगबगीने जाते. आता पाहू पुढे.

“डॉक्टर, त्या कश्या आहेत?” नेहा.

“त्या आता स्टेबल आहेत, बरं झालं त्यांना वेळेवर आणले, म्हणून त्यांचा जीव वाचला.” असे म्हणून डॉक्टर निघून जातात.

ती स्टेबल आहे ऐकताच नेहाचा जीव भांड्यात पडतो. डोळ्यात अश्रु येतात.

“नरेश, आज माझ्या हातून मोठे पाप होता होता वाचले. जर आज तिला काही झाले असते तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते.” ती नरेशकडे पाहत म्हणाली.

“त्या आता बऱ्या आहेत, सो आता जास्त विचार करू नको. चल आपण भेटून येऊयात.” नरेश.

“नरेश, तिच्या समोर जायची हिम्मतच होत नाहीये. कोणत्या तोंडाने जाऊ?” नेहा चेहरा पाडतच म्हणाली.

“कम ऑन नेहा, किती स्वतःला दोषी समजत आहेस? पुरे आता. जे तू वागली मुद्दाम वागली नाहीस हे मला माहीत आहे. ती परिस्थिती तशी झाली, घटना घडल्या त्यामुळे तू अशी रिऍक्ट झाली. इट्स ओके. आता तू पाठचं सर्व घडलेलं डोक्यातून काढून टाक आणि एक नवीन सुरुवात कर.”

“जमेल मला?” नेहा.

“का नाही जमणार?” नरेश तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला.

“आपण तिला सकाळी जाऊन भेटूयात. आता तिला आराम करू दे.” नेहा.

नेहा आणि नरेश घरी जातात.
यश त्याच्या आईची आतुरतेने वाट पाहत होता.
नेहाला पाहिल्या पाहिल्या तो पळतच तिच्याकडे येतो आणि म्हणतो,

“माझी आई आता रडत तर नाहीये ना? तिला त्रास तर नाही होत ना?”

नेहा त्याला जवळ घेत म्हणाली,
“यश बाळा, तुझी आई अजिबात रडत नाही. तिला आता डॉक्टर काकांनी औषध दिले आहे आणि ती झोपली आहे.”

हे ऐकून त्या लहानग्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागतो.

यश तिला मिठी मारत म्हणाला,

“थॅंक यू काकी, तुम्ही माझ्या आईला हेल्प केली. थॅंक यू सो मच.
त्याच्या डोळ्यात आनंदाश्रु आले होते.

त्याने त्याच्या खिशातून चॉकलेट काढले आणि नेहाला दिले.
“काकी माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी हेच आहे.” यश.
नेहाला खूप गहिवरून आले होते.

ती त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली,
“बाळा, तू झोप आता.”

“मला आईशिवाय झोप येत नाही.” तो चेहरा पाडून म्हणाला.

“बरं, आई जोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत माझ्यासोबत झोपशील?” यशच्या गालावरून हात फिरवत नेहा म्हणाली.

“तुम्ही मला गोष्ट सांगणार का? आई मला रोज गोष्ट सांगते.” यश.

“हो चालेल, सांगते.” नेहा.

यश गोष्ट ऐकत ऐकत झोपून जातो.

यश झोपला हे पाहून राज येतो.
“कशी आहे तब्येत त्यांची?” राज.
“हो आता स्टेबल आहे. डॉक्टर म्हणाले आहे, थोडे दिवस ठेवतो आणि मग डिस्चार्ज देतो.” नेहा म्हणाली.

“बरं झालं वेळेवर उपचार भेटले.” राज.

“हो राज, डॉक्टरही तेच म्हणाले. त्यांना वेळेवर आणले म्हणून जीव वाचवता आला.” नेहा.


“बरं आई, तू पण झोप तुझीही खूप धावपळ झाली आहे. उदया बोलू आपण.” राज पलंगावरून उठत म्हणाला.

राज त्याच्या रूमध्ये जातो.

नेहा यशला घट्ट बिलगून झोपते.

अपराधीपणाच्या भावनेमुळे तिला कसंतरीच होते. ती खूप रडते, अश्रूमुळे तिची उशी भिजून जाते. तिला झोपच लागत नाही.

क्रमश:

अश्विनी ओगले.


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

अश्विनी पाखरे ओगले

Blogger

Love life Enjoying every second of life Now enjoying as a blogger ✍️ Love to share my experience through writing and touch the soul through writing from❤️ Finding me in new way..

//