मागील भागात आपण पाहिले, पायऱ्यांवर काळा रंग पसरलेला असतो. लगेच तिला नवऱ्याच्या ऑफिसमधून फोन येतो आणि समजते की, तिच्या नवऱ्याचा पाय मुरगळला आहे.
नेहा स्तब्ध होते.
“राज, लवकर चल बाबांचा पाय मुरगळला आहे.” कपाळावर आलेला घाम पुसत नेहा बोलते.”
राज लगेच गाडी बुक करतो आणि दोघेही गाडीत बसतात.
नेहाचे अश्रु थांबता थांबत नाही.
“राज, लवकर चल बाबांचा पाय मुरगळला आहे.” कपाळावर आलेला घाम पुसत नेहा बोलते.”
राज लगेच गाडी बुक करतो आणि दोघेही गाडीत बसतात.
नेहाचे अश्रु थांबता थांबत नाही.
“आई, रडू नकोस गं, बाबांचा फक्त पाय मुरगळला आहे. इतकं काही काळजी करण्याचे कारण नाही.” राज नेहाचे अश्रु पुसत म्हणाला.
“राज, मला आता पक्की खात्री पटली आहे की, जे पण होत आहे ते त्या बाईमुळे.” नेहा.
“आई, कालच मी तुला समजावले ना? तुझ्या डोक्यात पुन्हा तेच सुरू झाले. अपघात होत राहतात, त्याचा संबंध असा कोणत्याही गोष्टीशी लावणे अयोग्य आहे आई.” राज नाराजीच्या सुरात म्हणाला.
“तुला नाही कळणार राज, मी सुद्धा ह्या गोष्टी मानत नाही; पण हे असे सतत होत असेल तर विश्वास बसतो.” नेहा.
नेहाला आता काहीही बोललेलं पटणार नाही, हे राजने ओळखले. तो शांत बसला .
दोघे ऑफिसला पोहोचले.
नरेश खुर्चीवर बसला होता.
दोघे ऑफिसला पोहोचले.
नरेश खुर्चीवर बसला होता.
“जास्त लागलं का हो.” नेहा काळजीच्या स्वरात म्हणाली.
“खूपच लागलं बघ, खूप दुखतंय.” नरेश चेहरा पाडून बोलला.
“खूपच लागलं बघ, खूप दुखतंय.” नरेश चेहरा पाडून बोलला.
नेहाचा चेहरा उतरला.
नरेश जोरजोरात हसू लागला, माझी अलका कुबल मला जास्त काही लागलं नाही.फक्त पाय मुरगळला आहे. मला घरी यायला जमणार नाही, म्हणून मी घरी फोन करायला लावला. नको टेंशन घेऊस, मी एकदम ठणठणीत आहे.”
नरेश जोरजोरात हसू लागला, माझी अलका कुबल मला जास्त काही लागलं नाही.फक्त पाय मुरगळला आहे. मला घरी यायला जमणार नाही, म्हणून मी घरी फोन करायला लावला. नको टेंशन घेऊस, मी एकदम ठणठणीत आहे.”
“तुम्ही पण ना.. खरंच.. मी किती घाबरले.” नेहा.
“पाहिलंस का आई? बाबा एकदम ओके मदी हाय.” राज.
हे ऐकताच नेहा आणि नरेश दोघे खळखळून हसू लागले.
तिघेही घरी आले.
राजला नेहाची खूप काळजी वाटत होती; कारण तिच्या डोक्यात यशची आई जाता जात नव्हती.
दुसऱ्या दिवशी लता काकू आल्या.
“नेहा, काय गं आहेस का घरात?” लता काकू.
“हो काकू आहे, या बसा.” नेहा सोफ्यावरून उठत म्हणाली.
“मी ऐकलं राजचा अपघात झाला आणि नरेशचा पाय मुरगळला.” लता काकू सोफ्यावर बसतच म्हणाल्या.
“नेहा, काय गं आहेस का घरात?” लता काकू.
“हो काकू आहे, या बसा.” नेहा सोफ्यावरून उठत म्हणाली.
“मी ऐकलं राजचा अपघात झाला आणि नरेशचा पाय मुरगळला.” लता काकू सोफ्यावर बसतच म्हणाल्या.
“हो काकू, राज आता बरा आहे आणि ह्यांचा पाय दुखतो आहे.” नेहा.
“काय गं बाई! दोघांच्या पाठी काय अवदसा लागली आहे काय माहीत. तू एक काम कर दोघांची नजर काढत जा. कोण कसं असतं आपल्याला काय माहीत. तुम्ही आताची पिढी ह्या सर्व गोष्टी मानत नाही; पण अश्या अनेक गोष्टी घडतात बरं का?”
नेहा आधीच हा सर्व विचार करत होती, त्यात आता काकूही बोलल्या. आता तर ती लक्ष देऊन ऐकू लागली.
“तुला सांगते नेहा, माझ्या आबांकडे म्हणजे माझ्या आजोबाकडे एक गाय होती.
खूप दूध द्यायची, एक दिवस आजोबांच्या ओळखीचा माणूस आला, आजोबा दूध काढत होते. गायीने खूप दूध दिले होते. ते पाहून तो माणूस म्हणाला,
खूप दूध द्यायची, एक दिवस आजोबांच्या ओळखीचा माणूस आला, आजोबा दूध काढत होते. गायीने खूप दूध दिले होते. ते पाहून तो माणूस म्हणाला,
“ भरपूर दूध देते तुमची गाय.”
हे असे म्हणायला आणि गाईच्या थनातून रक्ताची चिळकांडी उडाली.
मी हा प्रकार स्वतःच्या डोळ्याने पाहिला, म्हणून सांगते.
लता काकू भानावर आल्या.
“माफ कर पोरी, बोलण्याच्या ओघात मी बोलून गेले. तुला उगाच टेंशन येईल.”
“माफ कर पोरी, बोलण्याच्या ओघात मी बोलून गेले. तुला उगाच टेंशन येईल.”
“काकू, नाही नाही असं काही नाही. तुम्ही तर तुमचे अनुभव सांगत आहात. काही हरकत नाही.” नेहा.
लता काकू आणि नेहा दोघींनी इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या.
बराच वेळ झाला. लता काकू निघून गेल्या.
बराच वेळ झाला. लता काकू निघून गेल्या.
लता काकू निघून गेल्या तरी, नेहाच्या डोक्यात लता काकूंनी सांगितलेला प्रसंग घोळत होता.
ती विचार करू लागली,
‘किती भयानक आहे सर्व, लोकांच्या नजरा किती वाईट असतात. आपलं जपून राहिलेलं बरं.’
‘किती भयानक आहे सर्व, लोकांच्या नजरा किती वाईट असतात. आपलं जपून राहिलेलं बरं.’
नेहाच्या विचारांचे चक्र आता जोरदार फिरू लागले होते.
अश्विनी ओगले.
कसा वाटला भाग नक्की कळवा. लाईक करायला विसरू नका. मला फॉलो करायला विसरू नका.
कसा वाटला भाग नक्की कळवा. लाईक करायला विसरू नका. मला फॉलो करायला विसरू नका.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा