White कलर.....

White Definition

पांढरा रंग म्हंटल कि आधी डोळ्यासमोर येतात ते आकाशातील ढग, बर्फच्छाधित डोंगर, डॉक्टरांचा एप्रन, शाळेतील खडू, आणि सरस्वती ची प्रसन्न मूर्ती. 

निरागसपणा म्हणजेच पांढरा रंग, डोळ्यांना सुखावणारा, सर्वच बाबतीत सावधानता बाळगणारा रंग म्हणजे पांढरा रंग, निर्दोषपणा आणि परिपूर्णतेचा पांढरा रंग एक यशस्वी सुरवात दर्शवितो. बहुतेकदा पांढरा रंग कमी वजन, कमी चरबीयुक्त अन्न आणि दुग्धजन्य उत्पादनांशी संबंधित असतो.

शुद्ध, स्वच्छ आणि निष्पाप अर्थाने white as snow, पांढऱ्या दातांना pearly white, चांगल्या किंवा निवडक पक्‍क्‍या गोष्टींची यादी म्हणजे white list असे पांढऱ्या रंगाच्या संदर्भात आणखी काही शब्दप्रयोग सापडतील. यासाठी पांढरा रंग लोकप्रिय आहे. पांढरा रंग आवडणाऱ्या खूप कमी व्यक्‍ती आढळतात.

आयुष्यातील एखाद्या टप्प्यावर पांढरा रंग आपल्या आवडीचा होऊ शकतो. हा रंग ज्यांना प्रिय असतो, ते लोक शांत सरळ आणि स्पष्टमतवादी असतात. स्वतःच्या विचार-आचारांवर ते नियंत्रण ठेवू शकतात. नाटकीपणा त्यांना बिलकुल जमत नाही. पांढऱ्या रंगावर ज्यांचे प्रेम आहे, अशा व्यक्तींना घर, कार्यालय, आजूबाजूचा परिसर, स्वतःची गाडीही एकदम टापटीप हवी असते. ते आखीव-रेखीव पद्धतीत जगणारे, नियमांचे तंतोतंत पालन करणारे, पैशांच्या बाबतीत आणि एकूणच सर्व बाबतीत सावधगिरी बाळगणारे असतात.

पांढरा रंग हा आयुष्यात संयम दाखवतो आणि हिंसेला परावृत्त करतो............. सौ. सोनल गुरुनाथ शिंदे... (देवरुख - रत्नागिरी )