Login

जिथे Hope आहे तिथे scope आहे.

जिथे Hope आहे तिथे scope आहे.

लोक काय म्हणतील त्याचा विचार करु नका
आपल्या आवडीच्या कामाविषयी आपल्या मनात Hope जर असेल तर त्याला scope ही आपोआप निर्माण होतो.


    खुप जणांना असे वाटते की आपल्याला आयुष्यात मोठे काही करण्यासाठी आपण जे शिक्षण घेतो तसेच शिक्षणासाठी जे काही क्षेत्र निवडतो त्याला आँलरेडी स्कोप असायला हवा पण असे काही गरजेचे नाही.तुमच्यात त्या स्कोप नसलेल्या क्षेत्रातही काहीतरी मोठे करुन दाखवण्याची जिदद अणि चिकाटी जर असेल तर तुमच्या जिदद चिकाटीमुळे स्कोप नसलेल्या क्षेत्रालाही आशा नावाचा किरण निर्माण होतो.त्यात स्वताला तुम्ही उत्तम प्रकारे घडवू शकतात.
    आज जागोजागी लोकांचा असा दृष्टिकोण झाला आहे की आर्टस मध्ये शिक्षण घेऊन काहीच फायदा नाही कारण त्या क्षेत्राला पाहिजे तेवढा स्कोप म्हणजे वाव नाही त्यात पाहिजे तेवढया रोजगाराच्या संधी नाहीत.इंजिनिअरला अणि डाँक्टरला खुप चांगला पगार मिळतो त्यांचे आयुष्य खुप मजेशीर असते.अणि आर्टस मध्ये शिक्षण घेतलेला व्यक्ती हा फक्त शिक्षक बनु शकतो किंवा स्पर्धा परिक्षा देऊन अधिकारी बनु शकतो.अणि तो अधिकारी किंवा शिक्षक नाही बनला तर त्याने घेतलेले त्याचे शिक्षण वाया गेले.त्याने चुकीचे क्षेत्र निवडले असे लोक म्हणतात.
   मागील काही दिवसांत माझ्या सोबतही असाच एक प्रसंग घडला.माझ्या भावाच्या लग्नासाठी माझे सर्व मामा-मामी सर्व नातेवाईक माझ्या घरी लग्नाच्या एक दिवस आधी मुक्कामासाठी आले होते.माझ्या एका नातलगानी मला विचारले तु काय करतो?मी सांगितले मी महाराजा सयाजीराव गायकवाड महाविदयालयात एम ए मराठीच्या दितीय वर्षात शिकत आहे.त्यावर त्या म्हणाल्या तुझा स्पेशल विषय कोणता आहे?मी सांगितले मराठी.त्यावर त्या म्हणाल्या मराठीला एवढा काही स्कोप नाही.त्यामुळ तु बघ तुला पुढे भविष्यात काय करायचे आहे?मग मी म्हणालो मला मराठी साहित्याची आवड आहे म्हणुन मी मराठी विषय स्पेशल घेतला आहे.पण तेव्हापासुन माझ्या नातलगांनी जी चावचाव सुरु केली त्यामुळे माझ्या घरच्यांचाही विचार बदलायला लागला.त्यामुळ माझे घरचेही मला बोलायला लागले की तु आता काम बघ एम ए करुन काही फायदा नाही.त्यामुळ आता तु कामधंदयाची सोय बघ.म्हणजे माझे जे कुटुंबीय मला माझ्या शिक्षणासाठी पुर्णपणे पाठिंबा देत होते तेच कुटुंबीय.एक दोन दिवसासाठी पाहुणे म्हणुन आलेल्या माझ्या नातलगांच्या सांगण्यावरुन माझ्या विरुदध जाऊन माझे शिक्षण बंद करण्यामागे तयार झाले आहे.
   त्यातही माझा दोन नंबरचा मोठा भाऊ त्याला एकेदिवशी त्याचे मित्र बोलले की आर्टसला एवढा स्कोप नाही.म्हणुन तो एवढा बदलला की तो मला एकेदिवशी मी माझ्या आईकडे वाचनालय लावण्यासाठी पैसे मागितले तर तो मला तोंडावर बोलला की तुला वाचनालय लावायचे आहे ना शिक्षण करायचे आहे ना तुझे तुझे काम कर अणि शिक्षण कर. म्हणजे आपल्या मुलाविषयी,भावाच्या शिक्षणाविषयी निर्णय घेण्यासाठी माझे कुटुंबीय लोकांच्या सल्ल्यांवर आधारीत आहेत.आपल्या मुलाला,भावाला काय करायचे आहे काय व्हायचे आहे?हे त्यांच्यासाठी महत्वाचे नसुन लोक काय म्हणतात हे त्यांच्यासाठी जास्त महत्वाचे आहे.
    असे आहे आत्ताचे पालक मग ते माझे असो किंवा इतर कोणाचेही असो ज्यांना आपल्या मुलांच्या स्वप्रांपेक्षा ईच्छा अपेक्षांपेक्षा लोक आपल्याविषयी काय म्हणतील याची जास्त चिंता आहे.लोक म्हटले तर मुलाला खुप शिकवायचे लोक नाही म्हटले तर आपल्या मुलाचे शिक्षणच बंद करुन टाकायचे.लोकांनी आपल्या मुलाला इंजिनिअर डाँक्टर बनवले तर आपणही आपल्या मुलाला तेच बनवायला हवे अशी मानसिकता पालकवर्गाची अजुनही आहे अणि याचाच त्रास आम्हाला विदयार्थ्यांना सहन करावा लागतो.आपल्या पालकांच्या ईच्छा अपेक्षेपोटी आम्हाला आमच्या आवडीच्या क्षेत्राचा त्याग करुन पालक सांगतात त्या क्षेत्रात जावे लागते ते ही का तर आमच्या पालकांना तसे करायला लोक सांगतात म्हणुन.
       थोडक्यात सांगायचे म्हटले तर मनात काहीतरी करुन दाखवण्याची ईच्छा जर असली तर स्कोप नसलेल्या क्षेत्रातही तुम्ही स्वताचे खुप मोठे काही निर्माण करु शकतात.फक्त आशेचा किरण सोडु नका.अणि पालकांनीही इतरांचे ऐकुण आपल्या पाल्यांना त्यांच्या मनाविरुदध जाऊन कोणतेही काम करायला भाग पाडु नका.कारण उदया तुमच्या अपेक्षा ईच्छा पुर्ण करताना जर तुमच्या पाल्याने चुकीचे क्षेत्र निवडले तर आयुष्यभर तो ही सुखात राहणार नाही अणि तुम्हालाही सुखात ठेवु शकणार नाही.लोक काय म्हणतील याचा विचार करुन आपल्या पाल्यांच्या स्वप्रांचा बळी देऊ नका.अणि लोक असे आहेत ते तुम्हाला पायीसुदधा चालु देणार नाही अणि घोडयावरही चालु देणार नाही.म्हणुन माझ्या पालकांनी लोकांचा विचार करुन माझ्यासोबत जे काही वागले तसे तुम्ही तुमच्या पाल्यासोबत अजिबात वागु नका.कारण अशाच दबावात नैराश्यता आल्यामुळे विदयार्थी आत्महत्येचा निर्णय घेतात. 
     शेवटी आपल्या आवडीच्या कामाविषयी तसेच आपल्या आवडीच्या क्षेत्रात काहीतरी करुन दाखवण्याची आपल्या मनात जर Hope असेल तर आपल्या मेहनतीच्या अणि जिदद,चिकाटीच्या बळावर आपण त्या क्षेत्राला काहीही scope नसताना त्यात scope ही निर्माण करु शकतो.फक्त आपल्या आवडीच्या क्षेत्रात झोकुन देऊन कष्ट घेण्याची तयारी आपण ठेवायला हवी.अणि जन्मताच कोणत्याच गोष्टीला scope नसतो मग ते शिक्षण असो किंवा इतर कोणतीही गोष्ट असो त्याला scope आपल्याला निर्माण करावा लागत असतो.