जेव्हा Ex Girlfriend घरी येते

अशोक त्याच्या घरी येतो. तो त्याच्याच मूडमध्ये आहे. जेव्हा तो हॉलमध्ये येतो तेव्हा तो चकीत होतो कारण समोर सोफ्यावर त्याची Ex Girlfriend पूजा बसलेली आहे.

अशोक त्याच्या स्कुटीवर बाहेरून घरी येतो. दरवाजाची बेल वाजवतो आई दरवाजा उघडते त्याला आई विचारते आज खूप लेट झाला रे यायला. अशोक बोलतो, थोडं काम होतं म्हणून उशीर झाला. तेवढ्यात त्याची नजर हॉलमध्ये सोफ्यावर बसलेल्या पूजा वर जाते. (पूजा ही त्याची एक्स गर्लफ्रेंड आता तिचं लग्न झालेल आहे तिने मस्त साडी घातलेली आहे आणि खूप छान दिसत आहे) ती त्याला बघते आणि हाय करते. तिला बघताच अशोक शॉक होतो. तेवढ्यात त्याची आई बोलते, अरे ते आत्ताच आली आहे. तुझीच वाट पाहत होती, तुझ्याकडून हरवली होती ना चैन, ती द्यायला आलीय. आई तिच्या हातातील चैन अशोकला दाखवते. अशोक डोळे विस्फारून चैनकडे बघतो आणि एक लूक पूजाकडे देतो. पूजा त्याला स्माईल देते तो खूप रागावतो आणि त्याला काहीतरी आठवतं त्याची आई मात्र बडबड करत असते अरे बरं झालं ती सापडली बिचार्‍याने आपल्याला आणून दिली अशोकला आठवतं कि सहा महिन्यांपूर्वी त्याने पूजा साठी आपल्या गळ्यातील चैन तोडून अंगठी दिलेली होती. तो फ्लॅशबॅक मधून बाहेर येतो आणि तिच्याकडे पाहू लागतो तसाच पुढे जातो पूजा जागेवर उठते आणि त्याच्याकडे प्रेमाने पाहू लागते. ती आता खूपच सुंदर दिसत आहे तो रागारागात आपल्या रूम मध्ये जातो. रूम मध्ये सर्व कपाट चाळतो आणि काही वस्तू बाहेर काढतो पुस्तक वगैरे सगळं सामान घेऊन येतो आणि पूजा समोर ठेवतो. आईला बोलतो, हे सर्व तिला हवय तिने मला मेसेज केला होता. पूजा हे सर्व पाहून चकित होते कारण या सर्व वस्तू तिने त्याला गिफ्ट दिलेले असतात.
ती फक्त पाहत राहते. तेवढ्यात दरवाज्यात श्वेता येते. तिला पाहून अशोक पुढे होऊन बोलतो आई तुला बोललो होतो ना श्वेता येणार आहे ती ही आहे. मग पूजा थोडी नर्वस होते आणि त्याच्याकडे पाहू लागते त्यानंतर ती स्वतःशीच हसते. पूजा पटकन ते सामान उचलते आणि निघू लागते श्वेता मात्र फक्त पाहत असते. पुजा जेव्हा दरवाज्यात श्‍वेता जवळ येते तेव्हा तिला बोलते कि, काळजी घे अशोक खूप विसरभोळा आहे आणि निघून जाते श्वेता रागात त्याच्याकडे बघते आणि त्याला मारण्यासाठी धावते. शाम भोसले