मुलाचे वडील जेव्हा प्रेग्नन्ट होतात.....

Parenthood Responsibility Equality Feminist


मुलाचे वडील जेव्हा प्रेग्नन्ट होतात.. 


अभिषेक आणि अनुजा- लग्न होऊन जवळपास २ वर्ष झाली होती. त्या दोघांचा  संसार अगदी सुखाने चालला होता. दोघेही जॉब ला असल्यामुळे संपूर्ण आठवडा काम आणि रविवार च्या दिवशी ते दोघे जण अगदी मनसोक्त जीवनाचा आनंद घेत. अभिषेक ला ट्रेकिंग, स्कुबा , स्काय डायविंग ह्या सगळ्यांची प्रचंड आवड होती, तो रविवारी  अनुजा ला घेऊन कुठे ना कुठे घेऊन जात असे. 

सोमवार चा दिवस होता. अनुजा ऑफिस ला पोहचली आणि अनुजा ला जरा थकवा जाणवत होता. तिला वाटलं काल ट्रेकिंग केल्यामुळे आणि झोप नीट न झाल्यामुळे असेल. पण दुपारपर्यंत तिला खूपच थकवा जाणवायला लागला.. तिने आपल्या ऑफिस मधल्या मैत्रिणी ला विचारला आणि त्या दोघी दवाखान्यात गेल्या. 

डॉक्टरांनी सांगितलं, सगळं नॉर्मल आहे.. काही ब्लड टेस्ट देते त्या करून घ्या.. उद्या पर्यंत रिपोर्ट्स येऊन जातील. अनुजा परस्पर घरी जाते आणि आराम करते. 

पुढच्या दिवशी ऑफिस ला पोहोचल्यावर तिला एक कॉल येतो.

"हॅलो, मिसेस अनुजा बोलताय का"?

"हो, मीच बोलतेय "

अग मी डॉक्टर पाटील, काल  तुम्ही  आलेल्या ना ?

हो.. हो.. मीच ती 

" तुम्ही प्रेगनन्सी  टेस्ट केलीत का तुमची"?

" काय??? मी??? अम्म्म्म नई केलीये अजून"

अच्छा.. काळजी करू नारा मिसेस अनुजा,, तुमच्या ब्लड रिपोर्ट्स वरून शंका  आहे किती तुम्ही प्रेग्नन्ट आहेत... 


अग बाई .!!! ओह्ह. ओके .....  थँक उ डॉक्टर. 

अनुजा लगेच मैत्रिणीला फोन करून मेडिकल मधून प्रेग्नन्सी  टेस्ट कीट आणायला सांगते..


मातृत्वाच्या प्रेमाची तिला चाहूल लागते. ती आरशात बघते पण तिला आता अनुजा नाही तर एक आई झालेली अनुजा दिसते. भगवंताने दिलेल्या अद्भुत देणगी चा तिला उलगडा होणार असतो.आपल्या  मनाची झालेली ही अवस्था - आनंद, उत्साह, थोडी भीती ह्या सगळ्या भावना तिला अभिषेक ला सांगायच्या असतात. पण तिने ठरवलं होतं कन्फर्म झालं की मगच पहिले अभिषेक ला सांगणार.. 

प्रेगन्सी टेस्ट कीट तिच्या हातात असतं , उशीर असतो फक्त कीट कडे बघायचा, मनात धक-धक, आनंद आणि  लाखो भावना अनावर  झालेल्या... ती डोळे बंद  करते . दीर्घ श्वास घेते .. आणि बघते ........ 

रिपोर्ट पॉसिटीव्ह...... 
ओह्ह माय  गॉड ...... तिचा आनंदाला आता अंत  नसतो... सगळं जग जणू  

रिपोर्ट पॉसिटीव्ह...... 
ओह्ह माय  गॉड ...... तिचा आनंदाला आता अंत  नसतो... कधीच न अनुभवलेली ती मातृत्वाच्या जाणिवेची तिला ओढ लागते. 
संध्याकाळी ती घरी गेल्यानंतर कधी अभिषेक येतोय आणि कधी मी त्याला सांगेन असं वाटत असतांना... दरवाजाची बेल वाजते... 

ती पळत पळत दरवाजा उघडते आणि समोर असलेल्या अभिषेक ला घट्ट मिठी मारते. 

"आता ह्यापुढे ऑफिस वरून वेळेवर घरी यायचा हं "

"अगं  हो हो ... काय झालं तुला "?

" अभिषेख , वी आर प्रेग्नन्ट "

" व्हॉट?????"" खरंच ???

अभिषेख तिला पुन्हा घट्ट मिठी मारतो... ते दोघे जण नाचत नाचत घरात येतात. ... आणि दोघ्यांच्याही आई -वडिलांना सांगतात. 

५ महिने असेच बाळाच्या चाहुलीने जातात. 

अनुजा ला महिन्यातून ३ वेळा तरी चेक-उप साठी दवाखान्यात जावा लागायचं. अनुजा इंडिपेंडंट असल्या मुले कधी कधी अभिषेख नसला तरी सुद्धा ती एकटी जाऊन यायची.. पण मात्र कधी कधी अभिषेक ने कधीतरी यावा आणि बाळाची वाढ, बाळाचे हृदयाचे ठोके ऐकावे असं वाटायचं.. 
पण बाळ आलं की  मुलाच्या ओढीने बरोबर येईल अभिषेक. 

म्हणता  म्हणता... ९ महिने झाले.. आणि त्यांचा  आयुष्यात एक मुलगा जन्माला आला. 
अभिषेक ला तर इतका आनंद झाक की संपूर्ण ऑफिस ला त्याने पेढे वाटले.. अनुजा  ३ महिने माहेरी राहणार हे ठरलेलं ... अभिषेक मूल  झाल्यावर सुद्धा एखाद्या बापा प्रमाणे वागत नव्हता..... 

३ महिन्या नंतर  अनुजा परत अभिषेक च्या घरी आली. आणि त्यां तिघांचा गोड संसार सुरु झाला.. 
पहिल्याच दिवशी रात्री झोपायच्या आधी अभिषेक अनुजा ला म्हणाला 

"अनुजा.. आता कुठे घराला घरपण आल्या सारखा वाटतंय ... 

जवळपास रात्री १ वाजेच्या आसपास बाळाने जोरात रडायला सुरवात केली.. अभिषेक जागा झाला.. त्याला सुचतच नव्हतं आता काय करायचं.. त्याने बाळाला उचलण्यचा  प्रयत्न केला. पण अनुजा ने सांगितलं होतं अजून मान पकडत नाही , तुम्ही उचलायचा प्रयत्न करू नका.. 

अभिषेक ला अनुजा ला उठवण्या शिवाय काही पर्याय नव्हता ... 

" अनुजा...ए अनुजा.... उठ बघ आपला "शिव" रडतोय... 
अनुजा... 

अनुजा ने डोळे उघडले तर शिव जोरात रडत होता.. अनुजा उठली आणि तिने बाळाला उचलून घेतलं. तरीही शिव मात्र रडत च होता... 

नंतर तिने बाल्कनी मध्ये नेऊन फिरवला तरी सुद्धा तो रडत च होता.. 

" अनुजा,, हे असं किती वेळ ? माझा ऑफिस आहे उद्या,, माझी झोप नाही होणार. 

अनुजा ला मात्र खुप संताप आला.. 

शिव मात्र काही रडायचं थाम्बत नव्हता.. अनुजा पुन्हा बेड जवळ गेली आणि तिने डायपर चेक केला.. डायपर खराब झाला होत.. 
आणि म्हणूनच  शिव रडत होता.. 


" अभिषेक " जरा उठून डायपर ची बॅग देता का ?

अभिषेक अर्ध्या झोपेतच उठून बॅग घेऊन येतो..  आणि पुन्हा बेड वर येऊन लोळतो. 

"अरे अभिषेक ह्याचा डायपर घे बरं "

"इईई ... शी...... किती वास येतोय त्याचा ...." तू कसाकाय हातात घेतलाय ते.... 


अनुजा संतापात म्हणा ली तुम्ही झोप हॉल मध्ये जाऊन बघते मी माझा.... 


क्रमश