लोक काय म्हणतील ??

प्रेरणादायक कथा


आजची सकाळ तिच्या साठी वेगळीच होती. तिने आज पासून पुन्हा हॉटेल चालू करायचा निर्णय घेतला होता अन् या निर्णयामुळे तिला तिच्या मधला आत्मविश्वास पुन्हा जागृत झाल्या सारखा वाटत होता.
खर तर ती एका यशस्वी बिझनेसमनची बायको होती पण स्वतःची ओळख खर तर शून्य अशीच होती.कुठेही गेलं तर सरनाईक साहेबांची बायको म्हणून तिला ओळखायचे.तिला हे सगळ कधी कधी असह्य व्हायचं त्यातूनच एकदा कुठल्या तरी अनाथाश्रमात कार्यक्रमाला गेल्या नंतर तिला तिची जुनी मैत्रीण आश्लेषा गाठ पडली तिचा जवळ मन मोकळं करताना तिला तिच्यातली ती नव्याने सापडली.
अन् तिने पुन्हा आपले जुने हॉटेल चालू करायचा निर्णय घेतला .जे ती लग्नाअगोदर चालवत होती.
विरेन आज खूप गडबडीत दिसत होता. त्याला आज अन्नपूर्णा हॉटेलच्या उद्घाटन कार्यक्रमा साठी बोलवण्यात आल होत.त्याला अजून त्या हॉटेल मालकाची ओळख नव्हती पण त्यानं ते आमंत्रण स्वीकारलं होत. राजनंदिनी सुध्दा त्याला काय हव नको ते पाहत स्वतःच आवरत होती .पण वीरेन ने तिची अजिबात दखल घेतली नाही .
तो नाश्ता करून निघून गेल्यानंतर राजनंदिनिने फोन करून कार्यक्रमाच्या पुढच्या तयारीची सूचना केली आणि गाडी घेऊन बाहेर पडली .
तिने आज साधीच पण उठून दिसेल अशी साडी घालून त्यावर हलका मेकअप केलेला होता.खर तेज त्या मेकअप च नसून तिच्या मध्ये जो आत्मविश्वास आला होता त्याच होत.
शहरातल्या मेन चौकात आल्यावर तिने गाडी उजवीकडे वळवली आणि आपली जुनी अन्नपूर्णा आज नव्या दिमाखात उभी असलेली तिला जाणवलं आणि तीच मन अभिमानानं भरून आले.थोड्याच वेळात शहरातले मोठे उद्योगपती वीरेन सरनाईक यांचे आगमन झालं आणि त्यांचा हस्ते फित कापून हॉटेलचे उद्घाटन पार पडले. सगळे नाश्ता करत असताना वीरेंन यांनी हॉटेलच्या मालकाची ओळख करून घ्यावी या उद्देशाने तिथल्या सेक्रेटरी ला बोलवून आपली आणि हॉटेल मालकाची ओळख करून दे म्हणून सांगतली.
आपल्या समोर आपलीच पत्नी या हॉटेलची मालकीण म्हणून उभी आहे याचा वर त्याचा विश्वास बसेना क्षणभर तो स्तब्ध झाला .पण तो क्षण उलटून गेल्यावर त्याने स्वतःच्या पत्नीच्या निर्णायाचे खूप मनापासून कौतुक केले.लोक काय म्हणतील याचा पेक्षा आपल्याला काय हवं हे जास्त महत्त्वाचं.