लोक काय बोलतील ?

Girl left her home . Because her relationship with her husband has spoiled.

      ऋतुजा डोळे पुसत बॅग घेऊन घराबाहेर पडते. सुरज हे सगळं बघत असतो पण तो तिला आडवत नाही. घराबाहेर पडल्यावर ऋतुजा बस स्टॉप वर थांबलेली असते, ती विचार करत असते की आता नक्की जाऊ तरी कुठे जाऊ ? माहेरी गेलं तर उगाच सगळ्यांना कळेल आणि लोक चर्चा करायला लागतील. ती फोन काढते आणि तिची मैत्रीण पूजा ला फोन करते

पूजा - " हॅलो ऋत्या बोल ना ? " 

ऋतुजा डोळे पुसते आणि स्वतःला सावरत पूजाला हॅलो बोलते

पूजा - " ऋत्या काय झाले तु का रडत आहेस ?" 

ऋतुजा - " मी तुझ्याकडे तुझ्या रूम वर येऊ का? " 

पूजा - " अगं विचारतेस काय ये . की मी तुला घ्यायला? " 

ऋतुजा - " नको . मी येते पंधरा मिनिटात पोहोचेल तुझ्या रूमवर. "
असं म्हणून पूजा फोन ठेवते आणि रिक्षा मध्ये बसते. पूजाचा घराबाहेर पोहोचते आणि घराची बेल वाजवते. पूजा दरवाजा उघडते .ऋतुजा तिच्या गळ्यामध्ये पडून मोठ्याने रडू लागते. पूजा तिला घरामध्ये घेऊन आणि दरवाजा बंद करते. 

पूजा - " ऋतुजा काय झाला आहे ?तू का रडत आहेस? आणि ही बॅग कसली आहे? "

ऋतुजा ला काय बोलावं कळतच नाही ते अजूनच मोठ्याने रडायला लागते. पूजा तिला पाणी देते आणि शांत व्हायला सांगते. थोड्या वेळाने ऋतुजा शांत होते आणि ती बोलू लागते 

ऋतुजा - " नाही सहन होते ग मला आता मी काय करू ? काय करू आणि कुठे जाऊ हेच कळत नव्हतं म्हणून तुझ्याकडे आले आहे "

पूजा - " अगं पण झालं काय आहे ते तरी सांग " 

ऋतुजा - " नाही पटत ग माझं सुरज सोबत एक दिवस ही नीट जात नाही. रोज कशावरून न काशावरून आमचं भांडण होतं. सुरज ला माझं जराही काही पडलेलं नाही. त्याला फरकच पडत नाही. नको झालेय मला त्या घरामध्ये. म्हणून आज बॅग घेऊन तुझ्याकडे आली आहे." 

पूजा - " नक्की काय झालं आहे मला सांगशील का ? " 

ऋतुजा - " खूप संशय घेतो सुरज माझ्यावर. रोज माझा फोन चेक करतो. ऑफिसमध्ये ही येऊन माझी चौकशी करत असतो. मैत्रिणी सोबत बोलायचं नाही बाहेर जायचं नाही.  दोन वर्ष कशी काढली आहेत हे माझं मला माहिती" 

पूजा - " अगं मग तू हे आई बाबांना का नाही सांगितलं ? " 

ऋतुजा - " त्यांना सांगून उगाच मला त्यांना टेन्शन द्यायचं नव्हतं. आणि नातेवाइकांमध्ये कळालं तर उगाच चर्चा होईल आणि लोक म्हणतील एवढ्या थाटामध्ये लग्न लावून दिलं आणि बघा संसार सोडून माहेरी येऊन बसली आहे. " 

पूजा - " लोक काय म्हणतील याचा तू कशाला विचार करत आहेस. आई-बाबांना नीट शांतपणे समजावून सांग. " 

ऋतुजा - " नाही नाही नको तु प्लीज हे कोणालाही सांगू नको. हे सगळं बाहेर कळालं तर उगाच माझी बदनामी होईल आणि लोक नको ते बोलतील. " 

पूजा - " लोक काय म्हणतील याचा तू कशाला विचार करत आहे. तू ज्या लोकांबद्दल बोलत आहे ते लोक आता आले आहेत का तुझा त्रास कमी करायला किंवा तुला समजून घ्यायला. लोकांना काय विषय हवा असतो चर्चा करायला . " 

ऋतुजा - " माझी हिम्मत होत नाही आई-बाबांना हे सगळं सांगण्याची. " 

पूजा - " मग काय हा त्रास सहन करणार आहेस का ? " 

ऋतुजा - " काय करू. मला काही सुचत नाहीये. तू आत्ता जे काही बोलली ते मला पटत आहे. लोक काय बोलतील म्हणून इतके दिवस गप्प होते आणि सगळं सहन करत होते पण आता माझ्या लक्षात आले की ज्या लोकांचा मी विचार करत होते ते लोक माझा त्रास कमी करायला येणार नाहीये " 

पूजा - " आजच तू घरी जाऊन आई-बाबांसोबत बोलणार आहेस. " 

ऋतुजा - " हो. आजच मी घरी सगळे बोलून काय ते एकदाच मिटवणार आहे. " 
 ऋतुजाचा निर्णय ऐकून उचला थोडे बरे वाटते. ती त्या दोघींसाठी कॉफी बनवते. कॉफी घेऊन ऋतुजा घरी जायला निघाली. 

ऋतुजा ला अचानक बॅग घेऊन घरी आलेला पाहून आई बाबांना प्रश्न पडतो. 

आई - " काय झालं ऋतुजा तू असा अचानक बॅग घेऊन आली आहेस आणि तुझे डोळे हि लाल झाले आहेत. तू रडली आहेस का ? " 

ऋतुजा तिच्याबद्दल आणि सुरज बद्दल आई बाबांना सगळं सांगते. 

ऋतुजा - " दोन वर्ष सगळं सहन करत होती पण आता सहन होत नाहीये. लोक काय म्हणतील याचा विचार करून सगळं सहन करत होते. पण माझ्या लक्षात आले की ज्या लोकांचा विचार करून मी हे सगळं सहन करत आहे ते लोक माझा त्रास कमी करायला येणार नाहीयेत.  " 
ऋतुजाचा हे सगळं बोलणं ऐकून आई-बाबांना धक्काच बसला होता. त्यांना काय बोलावं तेच कळत नव्हतं. ऋतुजा त्यांना सगळं समजावून सांगते. 

बाबा - " तुझा जो काही निर्णय असेल मी आणि तुझी आई तुझ्या सोबतच आहे. पुढे काय करायचं ठरवलं आहे तू. ?" 

ऋतुजा - " काय करायचं ते अजून ठरवलं नाही पण लोक काय म्हणतील म्हणून मी अजुन त्रास सहन नाही करणारे. "

ऋतुजा सारखी असे कितीतरी लोक असतात की जे लोक काय म्हणतील म्हणून त्रास सहन करत असतात. लोकांना फक्त विषय हवा असतो चर्चा करायला. त्यापैकी कोणीही तुम्हाला कसलीही मदत करणार नाहीये. Be strong. Take a move.