Aug 18, 2022
सामाजिक

माझ्या दुखाचे कारण काय?

Read Later
माझ्या दुखाचे कारण काय?

आत्मसंशोधनपर लेख : 

 

माझ्या दुखाचे कारण काय?

 

     दुखाचे कारण काय? हा प्रश्न जेव्हा गौतम बुदधांना पडला होता.तेव्हा ते खुप व्याकुळ झाले होते.माणुस हा एवढा दुखी का आहे? याचे कारण त्यांना शोधायचे होते.तेव्हा ते हया प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी घर,परिवार, ऐश्वर्य,धन संपत्ती हया सगळयांचा त्याग करुन जंगलात हया प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी निघाले होते.अणि आज तोच सिदधार्थ जो दुखाचे कारण शोधण्यासाठी निघाला होता.तो आज सगळीकडे बुदध म्हणुन ओळखला जातो.म्हणुनच असे म्हटले जाते की सिदधार्थ बुदध झाला.पण आता काळ बदलला आहे वेळही बदलली आहे.त्यामुळे दुखाचे कारण काय? हे शोधण्यासाठी आपल्याला दुर जंगलात किंवा इतर कुठेही जाण्याची आवश्यकता नाही.कारण जर आपण आपल्या दैनंदिन जीवनात घडणार्या घटना प्रसंगांकडे बारकाईने पाहिले तर आपल्याला आपल्या दुखाचे मुळ कारण काय हे लगेच सहजपणे समजुन जाईल.

       खुप दिवसांपुर्वी मी माझ्या स्वताला एक प्रश्न विचारला की माझ्या आयुष्यात जे दुख आहे त्या दुखाचे कारण तरी नेमके काय आहे?मग मी लागलो कामाला अणि माझ्या दैनंदिन जीवनातील घडणार्या प्रत्येक घटना प्रसंगाकडे,चांगल्या वाईट गोष्टींकडे मी बारकाईने पाहु लागलो.अणि मला माझे उत्तर हे मिळालेच. खुप संशोधन,निरीक्षण केल्यानंतर माझ्या निर्दशनास हे आले की माझ्या दुखाचे कारण दुसरे कोणीही नसुन मी स्वता आहे.अणि ते कसे हे तुम्हाला पुढील उदाहरणांदवारे सविस्तर समजेल.

 

माझ्या आयुष्यातील दुखाचे कारण :

 

* अपेक्षा : काही महिन्यांपुर्वीची गोष्ट आहे.मी एका साहित्यिकांच्या ग्रुपवर अँड झालो.त्या ग्रुपवर सर्व जण वाचन,लेखन करायचे.मग त्यांचे बघुन मलाही हुरूप आला की मी पण काहीतरी लिहावे.मग त्या ग्रुपवर मी पण रोज लिहायला लागलो.पण माझ्या लिहिलेल्या लेखांवर कोणीच सुरूवातीला प्रतिक्रिया देत नव्हते.कारण मी त्या ग्रुपवर नवा होतो.त्यामुळे अनोळखी असल्यामुळे कोणीच माझ्या लिहिलेल्या लेखांवर प्रतिक्रिया दयायचे नाही.

     त्यामुळे मी खुपच हताश,निराश झालो की माझे लेख कोणालाच आवडती नाही.माझ्या मनात हा पण विचार यायला लागला की मी एक चांगला लेखक नाही.त्यामुळे लोक माझ्या लिहिलेल्या लेखांवर प्रतिक्रियाच देत नाही.अणि ते वाचत पण नाही.मग हया सगळयातुन माझ्या दुखाचे पहिले कारण मला भेटले ते म्हणजे अपेक्षा.मी लोकांपासुन अपेक्षा करुन होतो की त्यांनी माझे लेख वाचावेत,त्यावर चांगल्या प्रतिक्रिया दयाव्यात अणि तसे न घडल्यामुळे मी दुखी झालो होतो.हयातुन मला हे कळले की मी दुसरयांकडुन ज्या अवाजवी,अवाढव्य अपेक्षा ठेवतो तेच माझ्या दुखाचे मुळ कारण आहे.

     कारण मी जेव्हा एखादयाला व्हाँटस अँपवर संदेश पाठवतो तेव्हा त्या व्यक्तीने माझा संदेश वाचुनही मला प्रतिसाद न दिल्यामुळे मी दुखी होतो की लोक मला दुर्लक्षित करतात.माझ्याशी बोलत नाहीत.त़्याला कारण माझ्या अपेक्षाच आहे.ज्या मी त्यांच्याकडुन बाळगुन आहे. मग मी एकदाचे ठरवले कोणतीही अपेक्षा न करता जगायचे,अणि आता लिहित राहायचे.कोणी माझे लेख वाचो किंवा नाही वाचो,त्यावर प्रतिक्रिया देवो किंवा नाही देवो.मी लिहित राहणार लोकांनी माझे लेख वाचावेत किंवा त्यावर प्रतिक्रिया दयाव्यात हयासाठी नाही तर मला लिहुन जो आनंद प्राप्त होतो तो आनंद प्राप्त करण्यासाठी.स्वताला व्यक्त करण्यासाठी.

    अणि मग मी रोज सातत्याने लिहु लागलो.अणि तब्बल एक महिन्यांनंतर मी लिहिलेल्या लेखांवर त्या ग्रुपवर प्रतिक्रिया येणे सुरू झाले.सर्व वडिलधार्या माणसांनी माझे 

तोंडभरुन कौतुक केले.अणि हयामुळेच माझ्यामध्ये अजुन जास्त लिहिण्याचा हुरूप निर्माण झाला.अशा पदधतीने निरपेक्ष भावनेने लेखन करत गेल्यामुळे उशिरा का होईना मला माझे फळ मिळाले.अणि आज त्याच ग्रुपवर मला सगळे एक युवा,होतकरु,शिकाऊ लेखक म्हणुन ओळखतात.

   याच्यातुन मला एक गोष्ट शिकायला मिळाली की ज्यांचे कर्म चांगले असतात त्यांच्यासोबत कधीच काही वाईट घडत नाही.देव त्यांच्या पाठिशी नेहमी असतोच फक्त आपण धीर सोडायचा नाही.जिदद ठेवायची.भलेही आपल्याला आपल्या कर्माचे फळ उशिरा भेटते पण भेटते हे़ नक्कीच.

        सांगण्याचे तात्पर्य असे आहे की इतरांना आपल्या दुखासाठी आपण दोषी ठरवत बसण्यापेक्षा आपण शोधायला हवे की आपण असे काय केले ज्यामुळे आपल्यावर आज ते दुख ओढावले आहे.कारण लोक आपल्याला दुख तेव्हाच देतात.जेव्हा ते दुख त्यांना आपल्याला देण्याचा आपण अधिकार,संधी देत असतो.अणि जर तो अधिकार किंवा संधीच आपण दिली नाही तर मग त्यांची तरी काय हिंमत आपल्याला दुख देण्याची.म्हणुन हे शोधणे फार गरजेचे आहे.त्याशिवाय आपल्याला आपल्या दुखाचे मुळ कारण हे कधी कळणारच नाही.अणि ते दुखही समुळ नष्ट होणार नाही.कारण जोपर्यत आपल्याला कारण कळत नाही तोपर्यत त्याच्यावर उपाय तरी आपल्याला कसा मिळणार?.म्हणुन आपण आपल्या दुखाचे कारण हे शोधलेच पाहिजे.अणि ते दुसरीकडे कुठेच नसते आपल्याच आजुबाजुला ते कारण असते.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

विकास सोनवणे

मी एक मराठी साहित्याचा विदयार्थी आहे.मला वाचणाची अणि लेखणाची फार आवड आहे.