मुलींच्या जन्माचेही स्वागत.

She Is Very Important In Life...


राज्यस्तरीय करंडक कविता स्पर्धा
कवितेचा विषय-:माझा शिल्पकार
उपविषय-: मुलींच्या जन्माचेही स्वागत.
टीम सोलापूर

—-----------------------------------------------------

हो आहे मीच माझी शिल्पकार
नको कोणाचाही मला आधार
द्यायचाय मलाच माझ्या जीवनाला आकार
आधी स्वतःच्या मनाचा मी ही करेन आता विचार।।1।।

चूल आणि मूल यासोबतच मी स्वतः आर्थिकदृष्ट्या असेन सक्षम..
मग हवे ते मिळवेन स्वकर्तृत्वावर
माझ्या मुलीचेही करेन मुलांप्रमाणेच संगोपन
पाय मात्र असतील नेहमी जमिनीवर ।।2।।

मी ही कणखर आहे म्हणूनच माझ्यात आहे मातृत्व पेलण्याची ताकद..
माझ्याशिवाय शिवबा आणि संभाजी घडणे केवळ अशक्यच..
माझ्याशिवाय घरालाही नाही घरपण..
माझं महत्त्व अबाधित होत आणि राहिल कालपण, आजपण आणि उद्यापण ।।3।।

पणतीही दिव्यापेक्षा नसेल कुठेच कमी
म्हणूनच नका मला गर्भातच मारू
माझ्यामुळेच दोन्ही घरी प्रकाशाची हमी
मुलींच्या जन्माचेही स्वागत आपण करू ।।4।।
सौ. प्राजक्ता पाटील