दोन ध्रुवांवर दोघे आपण ( कविता)

एक मुलगा आणि मुलगी यांच्यातील मैत्रीचे नाते पवित्र असते. पण समाज त्याबद्दल जर शंका घेत असेल तर हे दोघे कसे व्यक्त होतील हे मी या काव्यरचनेतून सादर केले आहे.

मुलगा आणि मुलीचे नाते मैत्रीचे असले तरीही ही मैत्री पवित्र असू शकते.पण इतर लोक त्याबद्दल शंका घेत असतील तर हे दोघे कसे व्यक्त होतील हे मी येथे मांडले आहे.

सर्वप्रथम मुलगी मुलाला म्हणते,


का झालो विलग आपण

होतो आपण एकमेकांचे मित्र,

 दोन ध्रुवांवर दोघे आपण

नव्हते का नाते आपले पवित्र?


समाज म्हंटला भिन्न तुम्ही

जात,संस्कार आहेत वेगळे,

दोन ध्रुवांवर दोघे आपण

नाही होऊ शकलो आपण व्यक्त||


सांग विसरू शकतोस का मला

एवढी मैत्री कच्ची होती का आपली?

दोन ध्रुवांवर दोघे आपण

कधीच भेट होणार नाही का रे आपली?


जपले आहे तुला हृदयात

आहे अनमोल आठवणींचा ठेवा,

दोन ध्रुवांवर दोघे आपण

असू दे  सदैव माझ्याबद्दल हेवा||


आयुष्य सरत जाईल पुढे

कोण जाणे पुढे काय घडेल?

दोन ध्रुवांवर दोघे आपण

 एकाच वाटेवर आपले पाऊल पुन्हा पडेल?


आता मुलगा मुलीला म्हणतो,


हो ग वेडाबाई भेट होईल आपली 

 एवढं टेन्शन का घेतेस होईल नीट सगळं,

लग्न ठरलय तुझ आहे ही आनंदाची गोष्ट

म्हणून तर दोघे आपण बोललो नाही मोकळं ||


करून घे जरा सवय माझ्याशिवाय राहायची 

अग साथीदार मिळालाय तुला एकदम मस्त,

बघ नवीन सुखी संसाराची मधुर स्वप्ने 

नको राहूस आता माझ्या विचारांमध्ये व्यस्त ||


वेंधळी जराशी तू ,सावरत जा आता नीट 

नसेल मी तुझ्यासवे आता २४ तास,

काळजी घे नव्या घराची आणि तुझी 

दरवळू दे तुझ्यातील संस्कार आणि सद्गुणांचा सुवास ||


अग मित्र होतो आपण दोघे 

खरच होती  मैत्री पवित्र आपली,

 उदास होऊ नको लोकांचा विचार करून 

नकारात्मकतेने ही दुनिया आहे व्यापलेली ||


आलो जरी दोन ध्रुवांवर दोघे आपण

 मनाने कायम एकमेकांशी जुळलेले राहू,

नसला वेळ एकमेकांसाठी तरीही

सदैव अंतर्मनात एकमेकांना पाहू ||

प्रिय वाचक हो माझा हा कविता लेखनाचा वेगळा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा.

धन्यवाद.


©® सौ. प्रियंका शिंदे बोरुडे 

फेरी : कविता 

कविता विषय: दोन ध्रुवांवर दोघे आपण 

राज्यस्तरीय करंडक स्पर्धा

जिल्हा : नाशिक