A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/home/irablogging/public_html/system/cache/irablog_session965315ee058a371fc510a3de59fe87e8120ae848c3875ee3cd62c4248fdaf441236e37b7): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /home/irablogging/public_html/system/cache)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

we have to overtake that depressed moment
Oct 23, 2020
स्पर्धा

नैराश्याचा तो एक क्षण जिंकता यायला हवा...

Read Later
नैराश्याचा तो एक क्षण जिंकता यायला हवा...

अस का होत? कालपर्यंत छोट्या-मोठ्या पडद्यावर झळकणारे कलाकार अचानक असा टोकाचा निर्णय घेतात.....सुशांतसिंह राजपूत, प्रत्युषा बॅनर्जी(बालीका वधू), सेजल शर्मा(दिल तो हॅप्पी है जी) यांनी आत्महत्या केली नी चाहत्यांपुढे परत एकदा न ऊलघडणार आत्महत्तेच कोड ऊभ राहिल. मी आत्महत्तेच मूळीच समर्थन करत नाही अथवा आत्महत्त्या करणार्‍याला चूकीच ठरवत नाही.....मुळातच गेलेल्या माणसाविषयी काही बोलण मला पटत नाही कारण गेलेली व्यक्ती जिवंत नसते स्वतला justify करण्यासाठी. मला बोलायच आहे ते गटबाजी, राजकारण आणि आजच्या पीढीवर ओढवलेल नैराश्य.....कारण हे सगळ्यांबाबतीत घडत असत; गटबाजी, नैराश्य, मानसिक ताण-तणाव, डिप्रेशन पण फक्त तो नैराश्याचा एक क्षण जिंंकता यायला हवा.

              माझा अनुभव सांगायचा म्हणजे मी ईंजिनिअरींग झाल्यावरती आय.टी. कंपनीत जाॅब न करता स्पर्धापरीक्षेंचा अभ्यास करायला सुरूवात केली. पुण्यात सदाशिव पेठेत राहत होते...वडील शेतकरी. तरीही मला अजून अभ्यास करायचा आहे ही कल्पना मी बोलून दाखवल्यावरती तयार झाले....खर्च करायला. पण मागे दुसरी बहीण तीचही ईंजिनिअरींग चालू होत....आणखी एक लहान बहीण तीचे एम.एस.सी. सर्वांत लहान भाऊ त्याच डी.फार्मसी....एकंदरीत सगळ्यांच्याच शिक्षणाच्या खर्चाचा बोझा होता वडीलांंवर.....तरीही त्यांनी डिग्री होऊनही मला दोन वर्षे पैसे पाठवले.....एवढ्या सर्वांना पैसे पाठवताना पप्पांची खूपच ओढाताण व्हायला लागली. म्हणून मग मी जाॅब करायचा ठरवल. असही दोन वर्षात मी खूप जिद्दीने आणि एकही क्षण वाया न घालवता अभ्यास केला होता एम.पी.एस.सी. चा....त्यातच मी पुर्व परीक्षाही पास झाले होते....आता नेमकी मुख्य परीक्षा...आणि सदाशिव पेठेत राहयच म्हणजे काॅटबेसीसवरही खुप रेन्ट द्यावा लागायचा...म्हणून मग मी पार्ट टाईम जाॅब करायच ठरवल...पण आय.टी. कंपनीत नाही तर एच.डी.एफ.सी. बॅंकेत....कारण मला अभ्यासासाठी वेळही हवा होता....आय.टी. कंपनीत जाॅब केल्यास तो नक्कीच मिळाला नसता म्हणून मी एका नामांकित बॅंकेत जाॅईन केलं...मला जाॅब करायचा होता तो फक्त माझा महीन्याभराचा खर्च निघावा यासाठी बस्सस....कारण तस नाही झाल तर मग मला एकतर घरी जाऊन अभ्यास करावा लागणार होता अथवा लग्न कराव लागणार होत. तर आता माझ शेड्युल खूप बिझी झाल होत...रोज पी.एम.टी. ने प्रवास...त्या प्रवासात मी माझ्या नोट्स वाचत बसायचे.....बर मला गटबाजी, नैराश्याचा अनुभव आला तो काम करत असताना....सुरूवातीला अस वाटल नवीन-नवीन जुळवून घ्यायला होईल आपल्याला ञास पण नाही ना....इथे आपल्या हेडची हांजी करणार्‍यालाच सूट मिळायची...अथवा त्यालाच टार्गेट पूर्ण केला म्हणून इंन्सेंन्टीव्ह दिला जायचा...माझ्या टीममधील एक मुलगी होती माझ्या अगोदर सहा महीने काम करत होती तिथे...तिने तर चांगलाच फायदा घेतला माझ्या प्रामाणिकपणाचा....टार्गेट मी पुर्ण करायचे आणि ही स्वतच्या नावाने टीम लीडरकडे सोपवायची नी त्यांची वाहवा मिळवायची. सुरूवातीला मलाही हे समजल नाही पण नंतर आजुबाजूला बर्‍याच टीममधे असे प्रकार दिसू लागल्यावर आणि माझ्यासारख्याच नवीन जाॅईन केलेल्या लोकांकडून समजले मला तिथले राजकारण.....मला या सर्व गोष्टींचा खूप ञास झाला त्यावेळी....ना घरी सांगू शकत होते ना आणखी कोणाला....कारण घरी सांगितल तर घरचे म्हणणार होते की ये सगळ सोडून घरी अभ्यास कर...आणि माझी एम.पी.एस.सी मुख्य परीक्षा तर खूप जवळ येत होती. स्पर्धापरीक्षेच्या वातावरणात अभ्यास करणं वेगळ नी घरी अभ्यास करणं  वेगळ....मनात असंख्य विचार चालू असायचे त्यावेळी. आॅफिसमधील या ताण-तणावाच्या वातावरणामुळे तिथेही जायची ईच्छा होत नसायची पण पर्याय नव्हता आणि घरी गेलेच तर लग्न...या सगळ्या विचारांमुळे माझ्या अभ्यासावर परीणाम नसता झाला तर नवलच.....माझी मुख्य परीक्षा माझ्या हातून गेली...तोपर्यंत इकडे घरच्यांनी मुलगा पसंत केला; माझी सहमती घेतली आणि मी घरी आले....खूप ऊदास, नाराज होऊन. कदाचित त्यावेळी मी ज्याठिकाणी मी काम करत होते, तिथे चांगली माणस असती, सकारात्मक वातावरण असत तर माझ्या मनावर किंबहूना अभ्यासावर त्याचा नकारात्मक प्रभाव पडला नसता नी मी मुख्य परीक्षेत यश मिळवू शकले असते...पण सगळ्याच गोष्टी जर तर वर येउन पोहचल्या....माझ लग्नही झाल. लाईफ पार्टनर चांगला भेटला त्यामुळे मी सगळ्या गोष्टी विसरू शकले. पण जाॅब सोडून घरी आल्यापासून ते लग्न होईपर्यंत जो कालावधी होता तो माझ्यासाठी खरच खूप नैराश्याचा, आत्मविश्वास हरवून बसलेला होता...हळुहळू मी यातून बाहेर पडलेही ते माझ्या घरच्यांमुळे, माझ्या लाईफ पार्टनरमुळे....पण अजूनही ते दिवस आठवले की अस वाटत मला आधार मिळाला घरच्यांचा, मी स्वत खूप स्र्टाॅंग राहिले वारंवार मनाला सांगितल आयुष्य खूप छान आहे; जे आपल नव्हतच ते आपल्याला नाही मिळालं. जे होत ते चांगल्यासाठीच होत...अस म्हणून मी यातून बाहेर पडू शकले....

                                  आज प्रत्येक क्षेञातच राजकारण, गटबाजी आहे मग याला सिनेसृष्टी तरी कशी अपवाद असेल......इथे प्रत्येकाला पुढे जायच असत....पण पुढ जाताना स्वतच्या टॅलेंटवर पुढे जाणारे कमी आणि पुढच्याला मागे खेचून मग स्वतला त्याजागी ठेवणारेच भरपुर असतात...मग त्यातून निर्माण होते स्पर्धा,अनिश्चितता, नैराश्य, एकाकीपण, ढासळणारे मनोबल आणि बरच काही.....बर हे सगळ त्याच व्यक्तीच्या जास्त वाट्याला येतं जो प्रामाणिक, कष्टाळू आहे.

                 ही गटबाजी थोड्याफार फरकाने सगळीकडेच आढळते. मग ते शाळा, काॅलेज, ईंटरव्यूव्ह, जाॅब, कंपन्या, सरकारी आॅफिस कुठेही जा गटबाजी चालूच असते....माञ सीनेसृष्टीत किंबहुना ती जास्त असावी...काम करणार्‍या ठिकाणी एखादी व्यक्ती हुशार असेल, सगळ्या कामात सरस असेल तर ती व्यक्ती पुढे जाणारच हे गटबाजी करणार्‍या लोकांच्या लगेच लक्षात येतच येत....कारण त्यांना समजतच की बाबा आपल्या रस्त्यात ही मोठी आडकाठी आहे....त्यामुळे अशी लोक लगेच त्या हुशार व्यक्तीला हरैक प्रकारे ञास देण्याचा प्रयत्न करतात....आणि हा प्रयत्न तोवर चालू असतो जोवर ती व्यक्ती शरणागती पत्करत नाही.....
                           ऊदाहरणार्द एखादी आय.टी. कंपनी असेल वा सरकारी आॅफिस असेल तर तिथेही काही ठराविक लोक असतात जे बरोबर पुढे जाणार्‍यावर काहीतरी कुरघोडी करतात....आणि त्यात ती व्यक्ती हुशार, प्रामाणिक, स्वाभिमानी असेल आणि बाॅसची हांजी करणारा नसेल तर मग बाॅसदेखील त्या गटबाजीत सामील होतो.....मग त्या व्यक्तीला एकट पाडल जात....एवढच काय तर काॅलेजमध्ये सुद्दा एखादा विद्यार्थी खुप अभ्यास करणारा, कोणामध्ये जास्त मिसळणारा नसेल तरी त्याला देखील वेड्यात काढून, मुद्दामहून त्याला वाळीत टाकून अप्रत्यक्षरीत्या त्याच मानसिक खच्चीकरण केल जात.....पण मी म्हणते लोकांनी कितीही काहीही करू देत स्वत खंबीर राहून अशा लोकांना हाणून पाडायला हव...पण आपण जर यांच्या गटबाजीला बळी पडलो तर मग त्यांच्या या असुरी गटबाजीचा विजय होतो आणि पुढच्या आणखी एका व्यक्तीचा बळी पाडण्यासाठी परत ते सज्ज होतात. सुशांतसिंह राजपूतच्या नैराश्याला कारणीभूत पण ही गटबाजी असावी.....कारण या क्षेञात जी काही वरिष्ठ मंडळी आहे ती बाॅलीवूडवर नियंञण ठेवते आहे स्वतला सेफ ठेवून. जर सुशांत सारखा अभिनयात एक्स्पर्ट कलाकार पुढे गेला तर आपणाला आपला गाशा गुंडाळावा लागणार हे त्यांना कळून चुकल होत....मग यावर ऊपाय म्हणून त्या दिग्गज  लोकांनी एकञ येऊन सुशांतचे प्रोजेक्ट नाकारले......त्याचा अलीकडचा 'ड्राईव्ह' मुव्ही थेअटर मध्ये प्रदर्शित न होता आॅनलाईन प्रदर्शीत होण्याइतपत त्याच्यावर परीस्थिती ओढवली.....त्याच्या हातून बरेचसे चांगले चिञपट गेले असही बोलल जातय...बर यात फक्त बाॅलीवूडवर अधिराज्य गाजवणारे लोकच सामील नव्हते तर बाकी लोकही असावेत कारण सुशांत गेल्यावर हळहळ व्यक्त करणार्‍या ह्या कलाकारांनी तो जिवंत असताना का बर सुशांतला मानसिक आधार दिला नसावा? कारण कुठेतरी ते कलाकार देखील सुशांतच्या चांगल्या अभिनयाबद्दल असुक्षित फील करत असावेत....कारण बर्‍याचदा या गटबाजीत सामील असणार्‍या काही लोकांना हेही माहीत असत की आपण करत आहोत ते चूकीच आहे पण ती लोक देखील स्वतच्या स्वार्थापुढे मूग गिळून गप्प बसतात. 
                    बर हे झाल गटबाजीमुळे पण फक्त ही एकच गोष्ट जबाबदार असते का? तर नाही. आजची बदलती जीवनशैली, दिखावा, प्रसिद्धी, हायफाय लाईफस्टाईल या गोष्टी देखील खुप महत्त्वाच्या आहेत डिप्रेशन येऊन चूकीच पाऊल ऊचलण्यासाठी.....आपणाला जेवढ यश जवळच, हवस वाटत तेव्हडच अपयशही पचवता यायला हव. मग ते कोणत्याही क्षेञात असो. कारण आत्तापर्यंत जी लोक यशाच्या शिखरावरती पोहचल्यात ती काही अशीच नाही....त्यामागे त्यांनी खूप अपयश पचवल आहे, खुप स्र्टगल केल आहे. त्या-त्यावेळी स्वतचे आर्थिक ऊत्पन्न लक्षात घेऊन खर्च केला आहे आणि त्यामुळेच त्यांनी तग धरून ठेवला आहे...पण आजच्या तरूण पिढीला...सगळच कस झटपट हवय. वाढत्या अपेक्षा आणि संपत चाललेला संयम यामुळे सहनशीलता संपुन नैराश्य पदरी पडतेय. 
                    सगळच कस हायफाय पाहीजे तेही कमी वेळेत. त्यातून सवय लागतेय दिखावा करण्याची. पण या नवीन पिढीला कोण समजावणार की सगळी सोंग आणता येतात पण पैशाच सोंग आणता येत नाही. काहीजणांवर तर या दिखावूपणाच एवढ भूत सवार असत की ते कर्ज काढून, हफ्ते भरून दिखावा करतात....बर हा दिखावा असतो तरी कसला भौतिक वस्तूंचा.....यातुन मनाला शांती भेटते का? नाही भेटतो तो फक्त असुरी आनंद, क्षणभंगूर मोठेपणा.

                 हा तुम्ही तुमचा आर्थिक ऊत्पन्न पाहून खर्च केलात, त्यातून थोड भविष्यासाठी ठेवलत तर काहीच हरकत नाही....पण आजची तरूणाई भविष्याबद्दल थोडीशी काल्पनीक विचार करत आहे....काहीजण तर आजचा दिवस पाहिला; ऊद्याच ऊद्या पाहू इथपर्यंत विचार करतेय....पण तसा विचार करण्यासाठी तुमच्या गरजा खुप कमी म्हणण्यापेक्षा मुलभूत अन्न, वस्ञ, निवारा एव्हढ्याच असाव्यात......पण जर का तुमची वृत्ती चंगळवादी, खर्चिक असेल आणि त्यात भविष्याचा थोडादेखील विचार नसेल तर मग आर्थिक प्राॅब्लेम येणारच.....कारण जोपर्यंत तुम्हाला काम मिळत असत तोवर ठीक पण ज्यावेळी तुमच काम बंद होत तेव्हा हा चंगळवाद, दिखावा, हायफाय लाईफस्टाईल सोडता येत नाही.....मग सुरू होते आर्थिक समस्या आणि त्यामुळे येणार नैराश्य, मानसिक ताणतणाव.आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळीच व्यक्त होणे......कारण कोणीही कितीही मोठी व्यक्ती, सेलिब्रिटी असो ती शेवटी एक माणूसच असते. पण या सोशलमिडीया, व्हाट्सअॅपच्या दुनियेत सगळच मागे पडलय.....संवाद संपत चालला आहे. पूर्वी भेटून, फोन करून बोलणारे मिञ-मैञीणी, नातेवाईक एका मॅसेजवरच सगळ सोडून देतायेत. एखादी व्यक्ती 'मला तुझ्याशी बोलायचं आहे' म्हटली तरी समोरची व्यक्ती 'बोलं ना' अस मॅसेजवरच म्हणून मोकळी होते ना की फोन करून आपण भेटून बोलूयात अथवा निदान फोनवरती तरी बोलायचा प्रयत्न करते....त्यामुळे आपसूकच दुख व्यक्त करणारी व्यक्ती आपल दुख मनातच दाबून ठेवते....बर एखाद्या हळव्या व्यक्तीने मॅसेजवर बोलून दाखवलच तरी 'डोन्ट वरी'  'इट्स ओके' 'होईल सगळ ठीक' अशी फाॅरमॅलीटीची वाक्य बोलून त्या व्यक्तीच दुख खूपच क्षुल्लक आहे अस दाखवतो....त्यामुळे दुख सांगणारा व्यक्ती त्याच दुख मनात ठूवतो पण परत त्या व्यक्तीला माञ सांगतच नाही.....आणि मग अचानक एकदिवस या दुखाचा स्फोट होतो.....भावनांचा ऊद्रेक होतो आणि काहीतरी अघटित घडत. त्यामुळे आपल्या जवळच्या व्यक्तीने अस टोकाच पाऊल ऊचलू नये म्हणून कधीतरी त्याला ऐकून घ्या, त्याला मानसिक आधार द्या. जवळच्या एखाद्या व्यक्तीचा खूप दिवस मॅसेज, फोन आला नसेल तर आवर्जून, वेळ काढून त्याची निदान दोन मिनीटे तरी चौकशी करा.
 आयुष्य जगत असताना एवढा सघर्ष करतो आपण मग थोडा वेळ स्वतसाठी पण देवूयात......मनाला थोड शांत, निर्विचार ठेवण्याचा प्रयत्न करूयात जेणेकरून कोणत्याही संकटाशी दोन हात करताना फक्त पैसाच महत्त्वाचा न राहता मानसिक स्थैर्यदेखील तितकच महत्त्वाच आहे याची जाणीव आपणाला होईल. एकदा का आपल मानसिक स्वास्थ्य मजबुत झाल की मग पैसा या गोष्टीचा आपण बाऊ करणार नाही आणि आर्थिक समस्या आली म्हणून चूकीच पाऊल ऊचलण्याची घटनाही घडणार नाही.....
             खुप सुंदर आहे हो हे आयुष्य. फक्त नैराश्याचा तो एक क्षण जिंकता यायला हवा......अस नाही की माणूस प्रयत्नच करत नाही या नैराश्यातून बाहेर पडण्याचा पण मनात कुठेतरी भिती असावी स्वतच्या समाजातील स्थानाबद्दल. कुठेतरी खोलवर मनाचा हळवा कोपरा असावा.....ज्यामुळे आत्महत्त्येसारखी गोष्ट घडतेय.

.....सुशांतसिंह राजपूतच्या या टोकाच्या निर्णयाने मन हेलावून टाकल आहे..अवघ्या चोथिसाव्या वर्षी जग सोडून गेल्यामुळे मनाची घालमेल झालेय...."तुम्हीच माझे गाॅडफादर आहात" अस चाहत्यांना म्हणणारा सुशांत , काही न सांगताच दुरदेशी निघून गेला....परत कधीही माघारी न येण्यासाठी....पण असे अनेक सुशांत प्रत्येक क्षेञात असतील.....यश मिळवत असतील, यश मिळवलही असेल किंवा यश मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतील त्यांनी पुढे जाऊन अस टोकाच पाऊल ऊचलू नये, वास्तवाच भान ठेवूनच कृती करावी. आपल्या पाठीमागे असणार्‍या आपल्या पालकांचा विचार करावा अशी आशा बाळगते.....
धन्यवाद !

©माधुरी सोनवलकर-पाटील