ती वाट...

A Poem On Death

कसा सांगावा प्रवास त्या वाटेवरला....
कुठे चिता जळत असते....
कुठे चिता मातीत लुप्त असते....
आक्रोश तो असह्य
वेदना त्या जडावलेल्या...
डोळ्यातील समुद्र दाटलेला......
कंठ मात्र साकळलेला..........
हृदयावर जणू तीव्र जखमा...
वेदनांचा पाऊस.....
अविस्मरणीय नाही पण.......
अंतःकरणात निरंतर आठवणींच्या अश्रुंची तरंगिणी
वाहत राहते........
क्षणात आयुष्य शांत नी स्तब्ध करते....
ती वाट स्मशानातली...!!

कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे