काय असते सुखाची परिभाषा

सुखाची परिभाषा


कवितेचे नाव : काय असते सुखाची परिभाषा

कवितेचा विषय : सुखाची परिभाषा

राज्यस्तरीय कविता स्पर्धा फेरी -२


सांगा ओ काय असते
सुखाची परिभाषा
तू माझी मी तुझा
हीच नात्यातली आशा


हेकेखोरपणे वागून
अति ताणलं तर तुटतं
आणि थोडं सैल सोडलं
तर तुटण्यापासून वाचतं

वेळीच ओळखता आलं पाहीजे
आपलं कोण, परकं कोण
नाहीतर सोडवत बसावा लागतो
गुंतलेल्या नात्यांचा त्रिकोण

अवास्तव अपेक्षांच्या ओझ्याने
नात्यांचा जीव गुदमरतो
दुसऱ्याच्या अपेक्षा पूर्ण करताना
माणूस स्वतः मात्र हरतो

अहंकार आपला नका हो कुरवाळू
त्या अहंनेच होतो नात्यांचा वांदा
नको दुरावा मनात आपल्या
किंमत करावी नात्यांची सदा

हे तुझं, हे माझं असे नव्हे तर
नात्यात असावं आपलं हीच आशा
कमी अपेक्षा अन् तडजोडीची तयारी
हीच खरी सुखाची परिभाषा


✍? माधवी पंकज हांडे

जिल्हा : ठाणे