Jan 27, 2021
माहितीपूर्ण

मार्ग श्रीमंतीचा भाग 2

Read Later
मार्ग श्रीमंतीचा भाग 2

मार्ग श्रीमंतीचा भाग २

 

आता सर्वांना पहिला मार्ग माहिती आहे की श्रीमंत व्यक्ती नेहमी पैसे कामाला लावतात. तर तुम्ही ही विचार करत असाल पैसे गुंतवूने म्हणजे मोठे धाडस.. 

 

हे धाडस करण्यासाठी दूसरा मार्ग समजला पाहिजे तो म्हणजे श्रीमंत लोक मुलांना खूप शिक्षण घेऊन नोकरी करत हे सांगत नाही. परंतु याउलट मध्यमवर्गीय कुटुंबात मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश दिला जातो खूप शिकवले जाते पण शेवटी नोकरी केली जाते..

 

श्रीमंत व्यक्ती देखील चांगले उच्च शिक्षण मुलांना देतात पण त्यासोबत त्यांना व्यवसायिक शिक्षण देखील दिले जाते. सध्या शाळेत फक्त सरकारी नोकर बनवले जातात कारण तिथे मुलांना उद्योजक व्हावे म्हणून तसा अभ्यासक्रम सुरू केलेला नाही. आणि फारसे मार्ग देखील नाही आहे जेणेकरून मुले ते शिक्षण घेतील. 

 

आपण जर नेहमी ची विचार करण्याची पद्धत बदलून वेगळे विचार केल्यास आपल्या घरातून बाहेर नक्कीच एखादा उद्योजक पडेल. 

 

श्रीमंत व्यक्ती मुलांना नेहमी आपल्या बिझनेस बाबतीत बोलत असतात. त्याने मुलांना लहानपणी च बिझनेस ची आवड निर्माण होते. 

 

ते नेहमी उच्च शिक्षित सहकारी सोबत घेऊन असतात. मोठे उद्योजकांन पेक्षा तिथे काम करणारे लोक जास्त शिकलेली जरी असली तरी त्याची विचार करण्याची पद्धत चूकीची असल्याने ते उद्योजक नाही होत परंतु ते त्याचे काम चांगले पूर्ण करतात त्यामुळे तर उद्योजक श्रीमंत होत असतात. त्याचा मोबदला दिला जातो पण ही नोकरी करणारी माणसे सुरक्षित उत्पन्नाचा विचार करून नोकरी स्वीकारतात. या उलट श्रीमंत माणूस नेहमी धाडस करून पहातो कधी यशस्वी तर कधी अपयशी होतो पण हार मानत नाही. 

 

 

आणि हो उद्योजक होणे सोपे नाही ..... 

आता उद्योजक होण्यासाठी आधी तुम्हाला अर्थ साक्षर असले पाहिजे ते काय ते पुढील भागात पाहूया.............

Circle Image

[email protected]

Engineer, blogger, traveller,lover

On a bath to become business women