Jan 27, 2021
माहितीपूर्ण

मार्ग श्रीमंतीचा भाग १

Read Later
मार्ग श्रीमंतीचा भाग १

मार्ग श्रीमंतीचा भाग १

सध्याच्या काळात लवकर श्रीमंत होणे कोणालाही आवडणारच. प्रत्येक व्यक्ती ची श्रीमंतीची व्याख्या असते. श्रीमंत म्हणले की डोळयासमोर येते ते घर ,गाडी ,बंगला, दागदागिने आणि भरपूर पैसा. हयाकडे कुठलाही मध्यमवर्गीय किंवा गरीब व्यक्ती आकर्षित होतो.  पण श्रीमंत होणे सोपे नाही म्हणून तो विचार सोडून देतो. 

आता श्रीमंत व्यक्ती बदल बोलायचे तर त्या काही गर्भश्रीमंत नसतात त्यासाठी त्यांनी पैसा, उत्पन्न व खर्च हयाचे योग्य नियोजन केलेले असते. 

असच काही लवकर श्रीमंत होण्यासाठी चे मार्ग सांगण्याचा प्रयत्न करत आहे. 

आज जगात जेवढे श्रीमंत लोक आहेत ते मेहनत, नियोजन व विवेक बुध्दी चा वापर करून इथे पोहोचले आहेत. जगात प्रत्येक व्यक्ती पैसा कमविण्यासाठी दरदिवशी धडपडत असतो त्याकरिता तो वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग अवलंबवत असतो. 

मी बरेच लोक पाहते ते उच्चशिक्षित चांगल्या पदावर कार्यरत असुनही त्यांना पैशाची कमतरता भासत असते. त्यांचा एकतर उत्पन्न कमी व खर्च जास्त असतात अन्यथा पैसा भरपूर प्रमाणात आहे म्हणून ते खरेदी करण्यासाठी वापरत असतील. पण महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा होतो.  हया साठी वेळीच नियोजन केले तर ही उणीव दूर होईल. 

श्रीमंत लोक नेहमी उत्पन्नाचे वेगवेगळे मार्ग शोधत असतात. ते पैशाला कामासाठी वापरतात या उलट गरीब मध्यमवर्गीय माणसे पैसा कमविण्यासाठी धडपड करतात. 

हाच आहे श्रीमंतीचा पहिला मार्ग---- श्रीमंत लोक नेहमी पैसा ला स्वतः साठी कामाला लावतात. 

पैसा काय काम करतो तर तो उत्पन्न निर्माण करतो ते विविध व्यवसाय काही भागीदारीत तर काही स्वतंत्र सुरू करतात आणि सरकारी करापासून मुक्त होतात. 

पण सामान्य माणूस कष्ट करून पैसा कमावतो व कर भरत बसतो. त्यातच त्याची काही कमाई जाते व उर्वरित दैनंदिन जीवनात खर्च होते. त्यातुनही काही शिल्लक असले तर ते लग्न कार्य व इतर बाबींवर खर्च होते. 

तर मग कसा वाटला श्रीमंतीचा पहिला मार्ग...... 
लवकरच भेटुया श्रीमंतीचा दुसरा मार्ग घेऊन............. ????????

Circle Image

[email protected]

Engineer, blogger, traveller,lover

On a bath to become business women