A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/home/irablogging/public_html/system/cache/irablog_session95e0c9a7221186b77463e80f2dcf0afe9ed13ed46d6ee132e96fbcf4e1ff85f9c1b08db9): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /home/irablogging/public_html/system/cache)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

Water Bottle
Oct 31, 2020
प्रेरणादायक

वॉटर बॉटल (Water Bottle)

Read Later
वॉटर बॉटल (Water Bottle)

अगदी शाळेत असल्यापासूनचं मिताला नवीन वस्तूंचे फार आकर्षण होते. ती लहान असताना दरवर्षी तिला शाळा सुरू झाल्यावर नवीन स्कूल बॅग, नवीन वॉटर बॉटल, नवीन टिफिन लागत असे. जर तिला हे सर्व नाही घेऊन दिले तर ती तिच्या बाबावर नाराज होत असे. आईविना पोर ती. त्यामुळे तिचा बाबा तिचे सगळे हट्ट पुरवत असे. हो, मिताची आई ती ५ वर्षांची असताना कॅन्सर या आजाराने हे जग सोडून गेली.

तिच्या बाबाला सगळ्या नातेवाईकांनी समजविले की, “तू दुसरे लग्न कर. मिता अजून खूप लहान आहे आणि तिला आईची गरज आहे.” पण मिताच्या बाबाला हे मान्य नव्हते. त्यामुळे त्या दिवसापासून तोच मिताची आई आणि बाबा दोन्ही झाला होता. एकटी मुलगी असल्यामुळे मिता थोडी लाडावलेली होती. पण तरीही तिच्या बाबाने तिला योग्य ते संस्कार देण्याचा प्रयत्न केला होता.

आज तिच्या कॉलेजचा पहिला दिवस होता. त्यामुळे नेहमीप्रमाणे मिताच्या बाबाने तिला नवीन वॉटर बॉटल आणि टिफिन घेऊन दिला. मिता हे पाहून खूप खुश झाली. तिला वॉटर बॉटल खूपच आवडली. काही दिवसातच ती तिची फेवरेट बॉटल बनली.

एके दिवशी काय झाले तर, कॉलेज मधून घरी येताना एक गोष्ट घडली. मिता ट्रेनची वाट बघत थांबली असताना तिला एक १०-११ वर्षांची मुलगी प्लॅटफॉर्मवर बसलेली आढळली. मळकट व फाटलेले फ्रॉक, तसेच कित्येक दिवस आंघोळ केली नसेल तसा चेहरा, विस्कटलेले पण त्यातही जमेल तशी वेणी घातलेले केस. एकदंरीत तिचा पेहराव असा होता. तिच्या हातात कसलीतरी पिशवी होती. तेवढ्यात ट्रेन आली. मिता ट्रेनमध्ये चढली. त्याबरोबर ती मुलगी देखील त्याच ट्रेनमध्ये चढली. दुपारची वेळ असल्यामुळे ट्रेनमध्ये गर्दी कमी होती. ती मुलगी क्लिप विक्रेती होती. ती ओरडून तिचे क्लिपस् विकण्याचे काम करत होती. एका बाईने तिच्या कडून काही क्लिप्स घेतले. ती मुलगी त्या बाईकडून पैसे घेत असताना तिची नजर मितावर गेली. मिता तिच्या नवीन वॉटर बॉटलमधून पाणी पित होती. कदाचित त्या मुलीच्या घशालासुद्धा कोरड पडली होती. तिने लागलीच मिताकडे पाणी मागितले. मिताच्या वॉटर बॉटलमध्ये अजूनही बर्‍यापैकी पाणी शिल्लक होते. मिताला काय करू हे सुचत नव्हतं. पण तिला त्या लहान मुलीची दया पण आली. मग तिने अजून काही विचार न करता त्या मुलीला पाणी पिण्यासाठी तिची नवीन वॉटर बॉटल दिली.

ती मुलगी बाटलीला तोंड न लावता पाणी पिण्याचा प्रयत्न करत होती, पण तिला ते काही केल्या जमत नव्हते. मग मिताने तिला तोंड लावून पाणी पिण्यास सांगितले आणि ही बॉटल तुलाच ठेव म्हणजे हवे तेव्हा तुला ह्या बॉटलमध्ये पाणी भरून पिता येईल हे देखील ती म्हणाली. ती मुलगी काहीतरी मोठं मिळाले ह्या आनंदाने खूप खुश झाली. मिताला थोडे वाईट नक्की वाटले पण तरीही कोणालातरी मदत केल्याचे समाधान आज तिच्या चेहऱ्यावर होते.

तिने घरी आल्यावर तिच्या बाबाला आज घडलेली सगळी हकीकत सांगितली. तिच्या बाबाला मिताचा खूप अभिमान वाटला. तसेच आईविना मुलगी वाढवून पण तिच्यावर योग्य संस्कार झाले ह्याचेही कौतुक वाटले.

दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे मिता कॉलेजला गेली. तर त्या दिवशी येताना ती सेम मुलगी तिच्या ट्रेन मध्ये होती. त्या मुलीने मिताकडे बघून स्माईल केले आणि तिच्या हातात पेपरमध्ये गुंडाळलेले एक पाकीट दिले व ती मुलगी म्हणाली, “ताई, तुम्ही कोणताही विचार न करता मला पाणी देवून माझी तहान भागविलीत आणि ही इतकी महाग पाण्याची बाटली ही दिलीत. पण मी ही बाटली फुकट कशी घेऊ. म्हणून तुम्हाला माझ्याकडून एक छोटीशी भेट. प्लीज नाही म्हणू नका” असे म्हणून ती मुलगी दुसऱ्या स्टेशनला उतरून गेली.

मिताने ते पाकीट उघडून पहिले तर त्यामध्ये वेगवेगळ्या रंगाचे ४ क्लिपस् होते. मिता मंद हसली आणि याच विचारात ती घरी आली आणि पाहते तर काय तिच्या बाबाने अगदी सेम तशीच वॉटर बॉटल मितासाठी आणली होती.

(हा ब्लॉग कसं वाटला हे नक्की कळवा. तसेच आवडल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा. धन्यवाद )

@preetisawantdalvi   

Circle Image

Preeti Dalvi

Writer, Author, Blogger

मला वाचनाची खूप आवड आहे। वाचता वाचता मी कधी लिहायला लागले माझे मलाच कळले नाही। मी आतापर्यंत अनेक कथा लिहिल्या आहेत। त्या कथांमध्ये "गुंतता हृदय हे। " ह्या कथेचे दोन्ही पर्व खूप यशस्वी झाले। ईरा वेबसाईटने माझ्या सारख्या अनेक लेखकांना लिहिण्यासाठी आणि त्यांचे लिखाण वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा प्लॅटफॉर्म मिळवून दिल्याबद्दल ईरा टीमचे खूप खूप धन्यवाद। ईरा वेबसाईटने लेखकांना मानधन देऊन त्यांचा सन्मान वाढविला आणि इथेच माझ्या सारख्या अन्य लेखकांच्या लिखाणाचे चीज झाले। खूप खूप आभार ईरा टीम आणि त्याचा पिलर संजना मॅम।।