योग्य वेळ आल्यावर बोलेल (भाग १)

Story About Daughter -in -law And Mother-In- Law Good Bonding Between Them.

वसू कुठे चाललीस इतक्या रागात?

आई आता येते शेजारच्या रमा काकू कडून.

वसू थांब जरा,काय झालं ते सांगशील का मला?

आई तुम्ही थांबा हो, तुम्हाला ना काहीच कळत नाही. काल बोलायचं होत ना त्या रमा काकूंना. मला सेजलने सांगितलं सगळं कालच्या कार्यक्रमात त्या रमाकाकू तुम्हाला किती घालूनपाडून बोलल्या त्या. आता त्याची खबर घेऊन येते मी .

वसू काही गरज नाही तिच्याकडे जायची. मुर्खाच्या तोंडी लागण्यात काहीच अर्थ नसतो बघ. मी देखील त्या रमेला उत्तर देऊ शकली असती पण ती वेळ योग्य नव्हती. मी योग्य वेळेची वाट पाहत आहे. त्या योग्य वेळी मी तिला सांगेल "माझी वसू माझी मुलगी आहे सून नाही." माझ्याही मनाला वेदना होतात ग अशा कुचक्या बोलण्याच्या पण बोलण्याची, प्रतिउत्तर देण्याची ती योग्य वेळ नव्हती.

.वसू शांत झाली उंबराठा ओलांडणारी पावले परत घरात वळली आणि तिने आईंना घट्ट मिठी मारली.

आई किती शांत आहात हो तुम्ही. कस काय इतकं सहन करू शकता? तुमच्या जागेवर कुणी दुसरी स्त्री असती तर ती त्याच वेळी रडली असती नाहीतर त्या रमाकाकूंच्या कानाखाली तरी लावली असती. अहो आई मलाच सहन नसतं झालं.या बायांना काय सुख मिळत हो आई अस दुसऱ्यांच्या  आयुष्यात ढवळा ढवळ केल्याने?

असते एखाद्याला सवय. "आपलं ठेवतात झाकून आणि दुसऱ्याचं बघतात वाकून "त्यांच्या तोंडी लागून आपण कशाला वाईट व्हायचं.

आई आपण का नाही वाईट वाटून घ्यायचं? आपल्याविषयीं चारचौघात त्या अस वाईट -साईट बोलल्यानंतरही आपण शांत कस राहायचं? मी जर काल त्या कार्यक्रमाला आले असते ना.....

वसुला मधेच थांबावंत सासूबाई बोलल्या... तू शर्मिष्ठाच्या डोहाळे जेवणाचा बँड वाजवला असतास, बरोबर ना. अग वसू आपण तेंव्हा दुसऱ्याच्या घरी होतो आणि महत्वाचं हे की  शर्मिष्ठाच्या आयुष्यातील तो महत्वाचा दिवस होता. ती रमा एक मूर्ख आहे तिच्यासोबत वाद घालून मी देखील मूर्ख व्हायचं का? तू तिथे असतीस तर नक्कीच रमेसोबत कडक्याच भांडण झालं असतं. आणि शर्मिष्ठाच्या डोहाळे जेवणाचा इतका महत्वाचा, गोड प्रसंग कडू झाला असता. शर्मिष्ठाच्या सासरच्यांनी काय म्हंटल असतं? कश्या विचित्र बाया आहेत यांच्या कॉलनीतल्या, यांना वेळ काळाच काही भान आहे की नाही? दुसऱ्यांच्या घरी येऊन, शुभ कार्यात विघ्न आणायला यांना काहीच कस नाही वाटत?.. आपल्यामुळे हे घडलं याच किती वाईट वाटलं असतं मला.

अहो आई, प्रत्येक वेळी आपणच विचार करायचा का या गोष्टीचा, ते अस काही बोलले असते तर काय फक्त आपल्यालाच बोलले असते का? रमा काकूंना पण बोलले असते ना?

हे बघ वसू इथे चुकतेस तू.... रमा जे काही बोलली ते हळुवार टोमणा मारत आणि आम्हा बायांच्या घोळक्यात. तिचं बोलण ऐकून तुझा पारा चढला असता आणि तू स्वतःवर कंट्रोल न करता तूझ्या आवाजाची पातळी वाढवली असतीस. या वेळी वाईट रमा नाही तू झाली असतीस.

मला न आई तुमच काही कळत नाही. काय बोलता तुम्ही आणि मुळात इतकं शांत का आहात तुम्ही हेच कळत नाही. डिवचलं रमा काकूंनी, टोमणे मारले त्यांनी. आपल्या जिव्हारी लागेल अस बोलल्या त्या आणि त्यांना प्रतिउत्तर देऊन वाईट आपणच कस झालो असतो?

मला सांग, तिथे उपस्थित बायांपैकी किती जणींनी तुझी बाजू खरी आहे अस समर्थन दिल असतं?मीच सांगते न.. एकही नाही. उलट तूझ्या किंवा माझ्या बोलण्यामुळे रमाने जे म्हंटल ते सिद्ध झाल्यासारखं झालं असतं. म्हणून म्हणते योग्य वेळ आली की बोलायचं तोपर्यंत कुणी कितीही कडू बोललं तरी ऐकून घ्यायचं. आणि शांत बसायचं.

अहो आई.....

क्रमशः...

वाचतांना कंटाळा तर आला नाही ना तुम्हाला? प्रश्न नक्कीच पडले असेल. विचारा की मग. मीच सांगते. वसू का इतकी संतापली? रमाकाकू शर्मिष्ठाच्या डोहाळे जेवणात अस काय बोलल्या? आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न वसू आणि तिच्या सासूबाई मधलं बॉण्डिंग इतकं चांगल कस? अस काय घडलं वसूच्या आयुष्यात ज्यामुळे वसू सून नाही लेक झाली? तर या सर्वांची उत्तरे लगेचच दुसऱ्या भागात. तो पर्यंत स्वस्थ रहा आणि वाचत रहा. आवडल्यास like करा, न आवडल्यास कमेंट करून तस सांगा. शेअर करतांना मात्र माझ्या नावासहितच करा ??©जयश्री कन्हेरे -सातपुते

"#जलद लेखन मालिका "

🎭 Series Post

View all