योग्य वेळ आल्यावर बोलेल (भाग 3अंतिम )

सासू सुनेच्या नात्यातली घट्ट वीण

योग्य वेळ आल्यावर बोलेल (भाग ३)

भाग तिसरा पुढीलप्रमाणे

आई तुम्ही मला भूतकाळात शिरू नको असं म्हंटल आणि स्वतः मात्र 30वर्ष मागे जाऊन आलात. काय ठरलं होत आपल भूतकाळात शिरून स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही.


"हो ग...सॉरी बेटा चुकलंच माझं " असं म्हणतं वसुला सासूबाईने घट्ट मिठी मारली.

आई तुमच्या संसाराची वाट तुमच्या घरच्यांनी लावली हो पण मी तर लव्ह मॅरेज केल होत सुधांशुसोबत ??. तरी त्याने मला दगा दिला??.

लव्हमॅरेजमुळे माहेर आधीच सुटलेलं आणि वर्षभरात सुधांशुकडून मिळालेला हा धोका त्यामुळे मी तर कोलमडून जायला हवं होत.. तेंव्हा आईसारखी सासूबाई माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या. स्वतःच्या नवऱ्याने दिलेल्या दुःखावर चढलेली खपली मुलाने नखाने ओरबाडून काढली. ३०वर्षाआधी नवऱ्यामुळे दुखावलेली बायको आणि सुनेसोबत तेच घडतय हे बघून आता दुखावलेली आई, सारख्याच वेदनेने विव्हळत होती.

स्वतःच दुःख विसरून त्या मला, परक्याच्या मुलीला खंबीरपने आधार देत होत्या. इतकंच नाहीतर मुलाला, स्वतःच्या मालमत्तेतून त्यांनी बेदखल केल व सर्व जागी नॉमिनी म्हणून माझ नाव टाकल. इतकंच नाहीतर सुनेच्या म्हणजे माझ्या सेफ्टीसाठी त्या माझ्या नावाने घर करणार होत्या पण मी त्यांना तस करू दिल नाही.

माझ आणि सुधांशुच लव्ह मॅरेज होत. घरच्यांच्या विरोधात जाऊन मी सुधांशुसोबत लग्न केलं, सुधांशू मात्र नालायक निघाला. वर्षभराच्या आतच त्यांनी मला दगा दिला आणि त्याच्या ऑफिसातील कलिगसोबत लिव्ह इन मध्ये राहू लागला.

 मला सोडण्याच कारण काय तर मी आधी सारखी सुंदर दिसत नाही, मी नीटनेटकी रहात नाही, टिपिकल घरगुती बायानसारखी राहते, गबाळी दिसते.

आधी हाच सुधांशू माझी प्रशंसा करता करता थकत नव्हता आणि आता मात्र इतकं घालून-पाडून बोलून माझं मन दुखवत होता. त्याच्यासाठी मी माहेर कायमचं सोडलं होतं पण त्याची त्याला काहीच कदर नव्हती.

कसलाही विचार न करता तो चक्क मला सोडून दुसऱ्याच कुणासोबत तरी राहत होता.

हेच होत का याच प्रेम ?. की मीच याच्याकडून असणाऱ्या आकर्षणाला प्रेम समजून माझ्या आई -वडिलांना दूर केल? आईंसोबत म्हणजेच सासूबाईंसोबत देखील हेच घडलं होतं त्यामुळे "आपल्या सुनेला असं वाऱ्यावर न सोडता तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहायचा" हे आईनी ठरवलं होतं आणि त्याच गोष्टीसाठी रमा काकू त्यांना टोमणे मारत होत्या.

"रक्ताच्या मुलाला घराबाहेर काढलं आणि परक्याची लेक घरामध्ये ठेवून घेतली. शेवटी स्वतःचे रक्त ते स्वतःच रक्त असतं परक्याची लेक कुठवर साथ देणार आहे तरी तुम्ही तुमच्या मुलाला इस्टेटीमधून बेदखल करून दुसऱ्याच्या मुलीला मालकीण बनवलं" असं रमाकाकू आईंना टोमणे मारत होत्या.

 त्यादिवशी शर्मिष्ठाच्या डोहाळे जेवणाच्या दिवशी हाच विषय निघाला आणि बायांना विषयच मिळाला चघळायला "

"आता सुधांशू आणि वसूला एकत्र असते तर कदाचित तुमच्या सुनेचा देखील डोहाळे जेवणाचा कार्यक्रम असता पण एखाद्याच्या नशिबामध्ये असं सुख नसतं. "... इति -कॉलनीतल्याच सविताकाकू

"बघा ना रेवतीताई (वसूच्या सासूबाई ) तुम्हाला ना नवऱ्याच सुख आणि ना मुलाचं सुख. सुनेचं सुख तेव्हड आहे पण त्याचा काय उपयोग, मुलगा नाही तर नातवाच देखील सुख तुमच्या नशिबात नाही " इतकं बोलून सुनंदाकाकू रमाकांकूच्या कानात खुसपूसल्या तेही आईंना ऐकूजाईल असच.. "किती पाप केले असेल या बाईने मागच्या जन्मात ज्यामुळे हे भोग या जन्मात भोगावे लागत आहे हिला " आणि ??फिदिफिदी हसल्या सर्व जणी.

 "एखादी व्यक्ती असतेच फुटक्या नशिबाची त्याला कितीही ठिगड लावा तरी ते  नशीब फुटकं ते फुटकच"... रमाकाकू

" पण मी म्हणते अशा बायांनी यावच कशाला डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात. हिच्या येण्याने उगाच नाट लागायची शर्मिष्ठा च्या डोहाळे जेवणाला. कसं कळत नाही बायांना काय माहिती."..... सुनंदाकाकू

"आपल्या घरी एवढा एवढा अंधार असल्यावर कशाला उगाच दुसऱ्याच्या घरी जाऊन शुभेच्छा द्यायच्या. अशा बायांच्या शुभेच्छा ही कधी कधी अशुभ लागतात आणि काहीतरी वाईट साईट होऊन बसतं.".. सविताकाकु 

 असे एक ना अनेक टोमणे रमाकाकू आणि इतर बायांनी आईंना मारले. किती वाईट वाटलं असेल आईंना. ?

 याला काहीच उत्तर न देता आई घरी आल्या होत्या. आणि हे सगळं सेजलने मला सांगितलं तेंव्हा माझा पारा चढला होता त्यामुळे मी रमाकाकूला जाब विचारायला चालली होती.

 संयमी आईनी मला थांबवलं आणि म्हणाल्या की "योग्य वेळ आली की मी नक्की बोलेन त्या रमेला आणि सुनंदा, सविताला देखील. ती योग्य वेळ तेंव्हा येईल जेव्हा मी तुझं लग्न योग्य जोडीदाराशी लावून देईल आणि तुझा सुखी संसार माझ्या या डोळ्याने बघेन. तुझी मुलं झाली ना की मग मी त्यांना माझ्या अंगाखांद्यावर खेळवेळ तेव्हा मी रमेला आणि कॉलनीतील इतर बायांना नक्कीच उत्तर देईल. प्रत्येक गोष्ट बोलण्याची एक योग्य वेळे असते. त्यांच्या टोमन्यांनी मला काही एक फरक पडणार नाही कारण मी माझ्या निर्णयावर ठाम आहे.

 सुधांशु माझ्या रक्तामासाचा गोळा असल्यामुळे काय झालं चूक त्याची होती आणि त्याने एका स्त्रीला दुखावलं. त्याला दाखवून द्यायला हवं होत की मी खूप कष्ट करून सगळ कमावलेल आहे त्यामुळे त्याच्यासारख्या नालायकाला माझी रक्ताची कमाई देण्यात मला काहीच स्वारस्य नाही. तू तुझ्या आई वडिलांना सोडून त्याच्यासाठी आलीस,त्याच्या प्रेमासाठी आलीस मात्र त्याला तुझ्या प्रेमाची काहीही काळजी नाही.

मी सासु असून देखील तू माझ्याशी आईप्रमाणे वागतेस, माझ सर्व काही करतेस मग मी तुला जन्म दिला नाही म्हणून काय झाले. तू माझ्या मुलीसारखीच आहेस. लोकांना काय बोलायचं ते बोलू दे. आपल्याला माहिती आहे ना आपल्यातल नातं, बस झालं तर मग. आपल्यातला माय लेकीच नातं असच चिरंतन टिकून राहो हेच देवाजवळ मागेल." असं म्हणून आईनी मला मिठीत घेतलं.

खरच रागाच्या भरात बोलून भांडण केल्यापेक्षा योग्य वेळेची वाट बघण्यात जास्त शहाणपणा आहे. आईंकडून बरेच काही शिकण्यासारखं आहे. मी मुलगी म्हणून त्यांच्याप्रति असलेलं कर्तव्य पूर्ण करेल.

समाप्त.....

 अशा प्रसंगी शांत राहणं खूप कठीण आहे पण संयम ठेऊन वेळ आल्यावर बोलण कधीही चांगल. कशी वाटली कथा नक्की सांगा, आवडल्यास like करा. शेअर करायची असेल तर नावासहित करा. ©जयश्री कन्हेरे -सातपुते

#जलद लेखन कथामालिका


🎭 Series Post

View all