Login

वचन....भाग 3

एका मुलीच्या वचनाची कथा

©® शितल ठोंबरे (हळवा कोपरा )

वचन.... भाग 3


मागील भागात आपण पाहिले...

गेली कित्येक दिवस समर सायलीशी बोलण्याचा प्रयत्न करीत होता. पण सायली कामाव्यतिरिक्त ना त्याच्याशी बोलत होती ना त्याच्या समोर जातं होती. म्हणून आज मुद्दाम समर टिफिन विसरला. त्याला माहित होतं लंच ब्रेक मध्ये सायली कँटीन मध्ये असते. त्या वेळी तरी कामाव्यतिरिक्त सायली आपल्याशी बोलेल या आशेने समरने सगळा प्लॅन आखला. आणि काही अंशी समरचा प्लॅन सक्सेसही झाला. हळूहळू एक एक पायरी चढायची आणि सायलीच्या मनाचा ठाव घ्यायचा असं समरने मनोमन ठरवलं.

आता पुढे...

घरी आल्यावर मालतीने सायलीला गरमागरम चहा दिला.स्वतः ही घेतला.सायली ऑफिस मधून घरी आल्यावर दोघी मायलेकींचा हा दिनक्रम असायचा. चहा घेत मस्त दिवसभराच्या गप्पा मारायच्या. दोघींचा हा स्पेशल टी टाइम होता . खरं तर सायलीच जास्त गप्पा मारायची आणि तिच्या त्या गप्पा मालती अगदी समरसून ऐकायची.

सायली मालती पासून काहीच लपवत नसे. कारण ती एकमेव मैत्रीण होती तिच्या आयुष्यात. सुदेशच्या अपघातानंतर घर सावरता सावरता मैत्रिणींचे हात हातातून कधीच निसटून गेले होते.

पण आज मालतीला सायली थोडी वेगळीच भासली शांत आपल्यातच हरवल्यासारखी. मालतीच्या बोलण्याकडेही तिचं फारसं लक्ष नव्हतं.

मालतीच्या लक्षात आलं आज नक्कीच काहीतरी बिनसलं आहे.

"सायू बाळ काय झालं तुला बरं वाटतं नाही आहे का? "

"नाही गं आई मी ठीक आहे "

"मग आज अशी गप्प गप्प का आहॆस? ऑफिस मध्ये काही झालं का? की तुझे ते सर काय नाव त्यांचं.... हा आठवलं... समर सर ते काही बोलले का कामाबाबतीत "

आईच्या तोंडून समरचं नाव ऐकताच सायली चपापली.

"समर सर काहीही काय आई त्यांचा काय संबंध बरं इथे. त्यांच्या शिवाय बोलायला दुसरा विषय नाही का?" सायली चिडून म्हणाली.

"सायू बाळ काय झालं इतकं चिडायला? बरं तू म्हणतेस तर मी नाही काढत कोणाचा विषय मग तर झालं. आणि तुला वाटेल तेव्हा तुझ्या मनात काय चाललंय ते तू मला सांगू शकतेस. मी वाट पाहीन "

बरं चल जेवणं तयार आहे मी ताटं घेते तू सगळ्यांना जेवायला बोलावं.

सायलीच्या घरी एक अलिखित नियम होता. दिवसभर तिन्ही भावंड बाहेर असल्याने रात्रीचं जेवण मात्र सगळे एकत्र बसून गप्पा मारत करीत.

जेवण झाल्यावर सगळे झोपी गेले. पण सायलीला झोप लागतं नव्हती. तीला श्वेता आणि तिच्या मध्ये झालेलं अर्धवट संभाषण त्रास देतं होते. समर सर आले नसते तर आपण श्वेताशी सविस्तर बोलू शकलो असतो. आता सायलीला समर सरांचाच राग येतं होता.

"मी म्हणते कशाला यायचं असं दोन व्यक्ती बोलत असताना मध्येच ." सायली स्वतः शीच बोलत होती.

उद्या काही करून श्वेताला एकटीला गाठून तिच्याशी बोलायला हवं. तिचा आणि ऑफिसमधल्या सगळ्यांचाच काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. श्वेताशी बोलून सगळ्या गोष्टी आधी क्लिअर करायला हव्यात.विचार करतच सायली झोपी गेली.

रात्री उशीरा झोपल्याने सायलीला सकाळी जाग आलीच नाही. मालतीने सायली जवळ जाऊन पाहिलं. सायली गाढ झोपी गेली होती. तिच्या डोक्यावरून हात फिरवत मालतीने सायलीला उठवलं.

"सायू बाळ आज ऑफिसला  जायचं नाही वाटतं."

आईच्या आवाजाने सायली जागी झाली घड्याळात पाहिले तर सात वाजले होते. आठ वाजता तीला घर सोडायचं होतं.

"सॉरी आई अलार्म कधी झाला काही कळलंच नाही. खूपच उशीर झाला. चल मी तुला किचन मध्ये मदत करते आणि मग माझं आवरते "

"त्याची काही गरज नाही बाळा टिफिन तयार आहे. तू मस्त फ्रेश हो आणि तयार होऊनच ये मी गरम गरम चहा आणते तुझ्यासाठी "

"काय हे आई तू लवकर उठलेलीस मग मला का नाही उठवलं बरं ".

मला माहीत आहे रात्री तू उशीरा पर्यन्त जागी होतीस. सकाळी मी उठले तुला पाहिलं तू शांत झोपलेली म्हणून मीच तुझी झोपमोड होऊ नये म्हणून अलार्म बंद केला. बरं आता अशीच माझ्याशी गप्पा मारत बसणार आहॆस की ऑफिसला जाणार आहॆस " मालती हसत म्हणाली

"हो चल पटकन आवरते आई मी,नाहीतर खरंच मला उशीर होईल "म्हणत सायली फ्रेश व्हायला गेली

सायलीने चहा घेतला टिफिन बॅगमध्ये भरला. चपला पायात सरकवल्या आणि निघणार तोच तीला आठवण झाली.

"आई आज यायला थोडा उशीर होईल गं. चहासाठी वाट पाहू नकोसं "

"का गं कुठे बाहेर जाणार आहॆस "?

"नाही गं आई आज ऑफिस मध्ये मिटिंग लावली आहे ती पण ऑफिस सुटल्यावर त्यामुळे. चल पळते आता मी नाहीतर उशीर होईल " असं म्हणतं सायली पळतच घराबाहेर गेली.

"सावकाश जा गं सायू बाळ झाला उशीर तर होऊ दे एवढ्या तेवढ्याश्या उशिराने काही होतं नाही बघ "

पण हे ऐकायला सायली होती कुठे? ती केव्हाचीच गेलेली.

"ही मुलगी पण ना. नेहमी वेळेवर पोहचण्यासाठी धडपडत असते. कामाच्या बाबतीत जराही हलगर्जी पणा करत नाही."मालती स्वतः शीच पुटपुटली.

एव्हाना सुदेश या दोघींच्या आवाजाने जागा झाला होता.

"गेली का सायली ऑफिसला "

"हो आताच गेली. चला तुम्ही पण फ्रेश व्हा चहा आणते तुमच्यासाठी."

मालतीने सुदेशला बाथरूम पर्यंत पोहचवलं. राजेश आणि सूरज ला उठवून दोघांनाही फ्रेश व्हायला पाठवलं.

चौघानी मिळून गरमागरम चहा पोह्याचा नाश्ता केला. सूरज आणि राजेश कॉलेज गेले आता घरी फक्त मालती आणि सुदेश राहिले. मालती आपल्या रोजच्या कामाला लागली तर सुदेश टीव्ही वर बातम्या पाहू लागला.

---------------------------------------------------------------------

सायली ऑफिस मध्ये पोहचली. पण श्वेता अजून ऑफिस मध्ये आली नव्हती.

"हिला पण आजच उशीरा यायचं होतं " सायली स्वतः शीच पुटपुटली आणि आपल्या कामाला लागली.

श्वेता ऑफिस मध्ये आली तिला पाहताच सायलीला हायसं वाटलं. कधी एकदा श्वेताशी बोलतेय असं तिला झालेलं.

सायली उठून श्वेताच्या टेबलवर जाणार तोच समर सरांनी फाईल घेऊन केबिन मध्ये बोलावल्याचा निरोप घेऊन प्यून आला.

सायलीचा नाईलाज झाला. श्वेताशी बोलण्याआधीच तिला समर सरांसमोर जायला फारच अवघडल्या सारखं वाटतं होतं. मनाचा हिय्या करून सायली फाईल घेऊन समरच्या केबिन मध्ये शिरली.

"May i come in sir "

"Yess मिस सायली come in "

सायली आत गेली.

"सर तुम्ही मागवलेली फाईल. मी सगळे डिटेल्स चेक केलेत. सगळं ओके आहे तुम्हीही एकदा पाहून घ्या." सायली म्हणाली.

समर सायली कडे पाहतच राहिला.
गुलाबी रंगाचा चुडीदार कुर्ता, केसांची लांबलचक वेणी, चेहऱ्यावर कसलाही आर्टिफिशल मेकअप नाही. साधेपणातही इतकी सुंदरता असू शकते हे समर पहिल्यांदाच पहात होता.

"हॅलो सर तुम्ही ही फाईल मागवलेली." समर समोर फाईल नाचवत सायली म्हणाली.

"Ohh!!!!sorry " स्वतःला सावरत समर म्हणाला.

सायलीच्या हातून फाईल घेऊन त्याने सायलीला बसायला सांगितले.

"सर तुम्ही फाईल चेक करा. तुमची हरकत नसेल तर तोपर्यंत मी बाहेर माझं काम करते. काही वाटलंच तर मला बोलावून घ्या. पण मला वाटतं नाही माझी काही गरज पडेल. कारण फाईल मी दोनदा व्यवस्थित चेक केली आहे . "

समर सोबत एकत्र केबिन मध्ये बसणं सायलीला खूपच ऑकवर्ड वाटतं होतं.ते टाळण्यासाठी ती बाहेर जाऊ पहात होती.

"मिस सायली तुम्ही फाईल चेक केली म्हणजे सगळं ओकेचं असणारं. तुमचं कामाचं परफेक्शन माहीत आहे मला.
पण आपण बसून कॉफी तर घेऊ शकतो त्यासाठी मला तुमची नक्कीच गरज लागेल.i mean कॉफी पिण्यासाठी मला तुमची कंपनी हवी आहे. तुमची काही हरकत नसेल तर " समर म्हणाला

"No thanks सर मला कॉफी नको आहे."

"any problem मिस सायली .मला उगाच असं वाटतंय की हे खरंच आहे . तुम्ही मला टाळत आहात का? "समर सायलीकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहू लागला.

"नाही सर असं काही नाही." सायलीकडे समरला द्यायला काहीच स्पष्टीकरण नव्हते.

मिस सायली तुम्ही बसा.मी मस्त दोन कॉफी मागवतो आपल्यासाठी .

समर सायली सोबत वेळ घालवण्यासाठी बहाणा शोधत होता तर सायली समरला टाळण्यासाठी.

--------------------------------------------------------------------

संध्याकाळी 6वाजता समरने सगळ्यांना कॉन्फरन्स हॉल मध्ये मिटिंग साठी बोलावले.

सगळे आल्यावर समरने बोलायला सुरुवात केली.

"Hello everyone!! मला माहीत आहे तुम्हां सगळ्यांनाचं  प्रश्न पडलाय की आजच्या मीटिंग चा नेमका अजेंडा काय आहे.आजची आपली मीटिंग एका खास कारणास्तव ठेवली आहे. पुढच्या आठवड्यात आपल्या ऑफिस ला 50 years पूर्ण होतील.त्यानिमित्ताने ऑफिस मध्ये छोटंसं function ठेवायचा विचार आहे. हेड ऑफिसमधून काही मंडळी आपल्या ब्रँच ला भेट द्यायला येणार आहेत. त्यामुळे सगळी तयारी स्पेशल असली पाहिजे. आपल्या ऑफिसचा गोल्डन ज्यूबली कार्यक्रम यशस्वी करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. आशा करतो की तुम्ही सर्वजन मला सहकार्य कराल."

सगळ्यांनीच टाळ्या वाजवून समर सरांना आपले समर्थन दर्शवले.

समर सायली कडे पहात म्हणाला " मिस सायली तुमच्या वर मी खास जबाबदारी टाकत आहे. कार्यक्रमाची तयारी कशी सुरू आहे. काय हवं काय नको हे सगळं तुम्ही पाहायचं आणि त्याचे प्रत्येक अपडेट माझ्या पर्यंत पोहचवायचे. कराल ना तुम्ही हे काम "

सायलीने समर कडे पाहिलं पण ती त्याला ना होकार देऊ शकली ना नकार.

समरने सगळ्या स्टाफ मेंबरला त्यांची कामे वाटून दिली.

श्वेता सायली ला चिडवत म्हणाली " पाहिलंस समर सर तुझी सोबत मिळावी, तुझा सहवास लाभावा म्हणून कसे बहाने बनवतायत. "

सायलीने हळूच श्वेताला चिमटा काढला " गप्प बस उगाच काहीही बोलत असतेस. तुझ्या मुळे आधीच मला समर सरांसमोर जायला ऑकवर्ड फील होतंय.तू भेट मला एकटी मग बघते तुला "

श्वेता सायलीला चिडवत म्हणाली " आता आमची कसली भेट होतेय. आता तुझी भेट होणार ती समर सरांसोबत daily update साठी "

सगळा स्टाफ कॉन्फरन्स हॉल मधून बाहेर पडला पण सायली तिथेच घुटमळत होती. समरच्या ते लक्षात आलं. सायली जवळ जात समर म्हणाला " काही बोलायचंय का तुम्हाला मिस सायली. "

"सर actually मला इतकंच सांगायचंय की तुम्ही दिलेली जबाबदारी मी नाही सांभाळू शकणार. तुम्ही ते काम इतर कोणाला तरी द्या प्लिज. आपल्या ऑफिस मध्ये इतर सिनियर लोकं आहेत तुम्ही ही जबाबदारी त्यांना द्या "

"मिस सायली मला माहित आहे आपल्या ऑफिसमध्ये बरेच सिनियर लोकं आहेत. आणि मी त्यांना त्यांच्या सिनियारिटी प्रमाणे कामं पण दिली आहेत. पण तुम्हांला दिलेली जबाबदारी मला नाही वाटतं इतर कोणी व्यवस्थित पार पाडू शकेल आणि तुमची इच्छा नसली तरी तुम्हांला हे कामं करावंच लागेल because its my order."

सायली पुढे काही बोलूच शकली नाही. "ओके सर"
म्हणतं ती कॉन्फरन्स हॉल मधून बाहेर पडली.

सायलीला खूपच टेन्शन आलं होतं. समरला वारंवार सामोरं जाणं. कानावर पडलेलं अर्धवट सत्य. त्याने तर तिची झोपच उडाली होती. ती स्वतः लाच समजविण्याचा प्रयत्न करीत होती की समर सरांच्या मनात तिच्या बद्दल नक्कीच काही नसेल. पण दुसऱ्याच क्षणी मनात विचार येई जर श्वेता म्हणतेय तसं काही असलं तर म्हणजे मी समर सरांना आवडतं असेन तर. नाही नाही हे शक्यच नाही. सायली स्वतःच्याच विचारांच्या गुंत्यात अडकत चालली होती.

समर आणि सायलीच्या नात्यात प्रेमाचं वळण येईल का? समर आपलं प्रेम व्यक्त करू शकेल का? सायलीच्या मनात समर बद्दल नक्की काय भावना असतील बरं? हे सगळे प्रश्न तुम्हांला पडलेत तसे मलाही पडलेत. म्हणूनच लवकरच येतेय सगळ्यांना प्रश्नांची उत्तरे घेऊन तोपर्यंत सायोनारा ?