©®शितल ठोंबरे (हळवा कोपरा )
वचन.... भाग 2
मागील भागात आपण पाहिले...
त्या रात्री सायलीने स्वतः लाच एक वचन दिलं.जोपर्यंत दोन्ही भावंड स्वतः च्या पायावर उभी राहत नाहीत. त्यांचं आयुष्य मार्गी लागत नाही तोपर्यंत ती स्वतः च्या सुखाचा मुळीच विचार करणार नाही. माझ्या कर्तव्यात मी कुठे ही तसूभर देखील कमी पडणार नाही. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझे आई बाबा माझं कुटुंब याला मी कधीच अंतर देणार नाही.
त्या रात्री सायलीने स्वतः लाच एक वचन दिलं.जोपर्यंत दोन्ही भावंड स्वतः च्या पायावर उभी राहत नाहीत. त्यांचं आयुष्य मार्गी लागत नाही तोपर्यंत ती स्वतः च्या सुखाचा मुळीच विचार करणार नाही. माझ्या कर्तव्यात मी कुठे ही तसूभर देखील कमी पडणार नाही. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझे आई बाबा माझं कुटुंब याला मी कधीच अंतर देणार नाही.
आता पुढे..
दुसऱ्या दिवसापासून सायलीने क्लर्क म्हणून ऑफिस जॉईन केलं. दुसरीकडे कलिनाला जाऊन डिस्टन्स मध्ये तिने. F. Y. B.COM ला प्रवेश घेतला.सायलीने कधी विचारही केला नव्हता वयाच्या अठराव्या वर्षीचं तिला अशी तारेवरची कसरत करत आयुष्य जगावं लागेल.
सायली ऑफिसमध्ये छान रूळली. अजय आणि इतर सर्वच सहकार्यांनी तिला वेळोवेळी सांभाळून घेतलं. सायली एकीकडे नोकरी सांभाळून आपला अभ्यास तर करतच होती पण आपले लहान भाऊ राजेश आणि सूरजच्या अभ्यासावरही तिचं तितकंच लक्ष होतं.
आपली प्रत्येक जबाबदारी सायली अगदी लीलया पार पाडत होती.
मालतीनेही आपलं शिवणकाम पुन्हा सुरू केलं. सायलीला तेवढाच हातभार लागेल या विचाराने.
सगळं पुन्हा सुरळीत सुरू झालं.
सुदेशही बसल्या बसल्या मालतीला तिच्या कामात मदत करी. सगळं घर पुन्हा पूर्वपदावर येऊ लागलं.
मालती आणि सुदेश याबाबत नेहमीच सायलीच कौतुक करीत. सायलीने पुढाकार घेतला म्हणूनच हे घर पुन्हा नव्याने उभं राहू शकलं.
गेल्या तीन वर्षात सायलीने आपल्या कामामुळे ऑफिसमध्येही आपली छाप पाडली होती.सायलीचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. आणि ऑफिसमध्ये तिला सिनियर क्लर्क म्हणून बढती मिळाली. पगारही चांगला मिळू लागला.
सूरजची इच्छा होती CA करण्याची त्याप्रमाणे त्याने कॉमर्स ला प्रवेश घेतला आणि कॉलेज करता करता
C. A च्या अभ्यासाला सुरुवात केली.
C. A च्या अभ्यासाला सुरुवात केली.
राजेशने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. त्याचं स्वप्नं होतं डॉक्टर बनण्याचं.
सायलीने दोघानाही स्वप्नं पाहण्याचं स्वातंत्र्य दिलं आणि त्यांची स्वप्नं पूर्ण करण्याचं वचन स्वतःला दिलं.
नोकरीत मिळालेली बढती, वाढलेला पगार आणि सूरज व राजेशचं स्वप्नं यामुळे सायलीने आपलं शिक्षण थांबवण्याचा निर्णय घेतला. सायलीचे कष्ट तिचा त्याग यामुळे सूरज आणि राजेशचं स्वप्नं सत्यात उतरताना दिसतं होतं.
त्याचवेळी सायलीच्या आयुष्यात एक अनपेक्षित वळण आलं. ज्याची कल्पना सायलीने स्वप्नातही केली नव्हती.
सायलीचे बॉस अजयची बदली झाली आणि त्याच्या जागी समरने बॉस म्हणून ऑफिस जॉईन केलं.
सायलीचे बॉस अजयची बदली झाली आणि त्याच्या जागी समरने बॉस म्हणून ऑफिस जॉईन केलं.
आज समरचा ऑफिसचा पहिलाच दिवस होता. ऑफिसमधल्या सर्वांनीच नव्या बॉस च्या स्वागताची तयारी सायलीवर टाकली. इच्छा नसतानाही सायली नाही म्हणू शकली नाही.सायलीने सुंदरसा लाल चुटुक गुलाबाच्या फुलांचा बुके आणला. खरं तर लाल गुलाब सायलीच्या आवडीचा.
समर येताच सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत केलं. ब्ल्यू शर्ट ब्लॅक पॅन्ट, स्ट्रेट हेअर आणि डोळ्यांना काळा गॉगल पाहता क्षणीच कुणीही प्रेमात पडावं असं त्याचं व्यक्तिमत्व.
सायलीने पुढे जाऊन समर ला बुके दिला आणि त्याला वेलकम केलं. आपल्या डोळ्यांवरचा गॉगल काढत समरने सायलीकडे एक नजर पाहिलं.
"थँक्यू.... तुम्ही मिस सायली am i right "सायलीच्या नजरेत पहात समर हसून म्हणाला.
त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. आणि चेहऱ्यावर किलर स्माईल.
"येस्स सर!!पण तुम्हाला माझं नाव कसं माहीत?"सायलीने आश्चर्याने विचारलं.
"इथे येण्यापूर्वी या ऑफिस चा आणि इथे काम करणाऱ्या सगळ्यांचाचं होमवर्क करून आलो आहे मी " आपली तिचं किलर स्माईल देतं समर म्हणाला.
"बरं मी काय म्हणतोय आज माझा ऑफिसचा पहिलाच दिवस आहे कामं काय रोजच होतील आज माझ्याकडून सगळ्यांना ऑफिस कँटीन मध्ये गरमागरम कॉफी आणि सामोसा ट्रीट. तेवढचं मला तुम्हां सर्वांची छान ओळख करून घेता येईल." समर म्हणाला
कँटीन वाल्या पोऱ्याला बोलावून समरने सर्वांसाठी गरमागरम कॉफी आणि समोश्याची ऑर्डर दिली.
ऑफिसमधले सगळेच कर्मचारी एकमेकांच्या तोंडाकडे पहात राहिले. नव्याने येणारा बॉस म्हणजे एखादा खडूस नाहीतर कडक शिस्तीचा बॉस असेल अशीच सगळ्यांची कल्पना होती पण हा नवीन बॉस म्हणजे वेगळंच समीकरण दिसतंय हे एव्हाना सगळ्यांच्या लक्षात आलं होतं.
ट्रीट झाल्यानंतर समरने सगळ्यांना आपापल्या कामाला लावले. समरच्या वातावरण हलकंफुलकं ठेवण्याच्या या स्वभावाने ऑफिसमधील सगळेच त्याच्यावर खुश झाले.
सहा महिने झाले समरला ऑफिस जॉईन करून पण सायली कामाव्यतिरिक्त समरच्या समोर किंवा त्याच्या केबिनमध्ये जातं नसे. तेच ऑफिसमधील इतर मुली समरने आपल्याला एक नजर पहावं म्हणून सतत त्याच्या अवतिभवती जाण्याचा त्याचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करीत असतं.
सायली जरी दिसायला सामान्य असली तरी तिच्या शांत सालस स्वभावामुळे ती इतरांपेक्षा वेगळी भासत असे. तिचं हेच वेगळंपण समरच्या नजरेत भरू लागलं होतं. कॉलेज पासूनच त्याच्यात गुंतणाऱ्या अनेक मुली त्याला भेटल्या पण त्याने एखादी मध्ये गुंतावं अशी मुलगी त्याला आजवर भेटली नव्हती. पण सायलीला पहिल्यावर आपली प्रतीक्षा आता संपली असंच समरला वाटू लागला.
पेहली नजर का पेहला प्यार अशीच काहीशी अवस्था समरची झाली होती.पण या सगळ्या पासून सायली पूर्ण अनभिज्ञ होती.
सायलीची कलीग श्वेताच्या नजरेतून मात्र हे काही सुटलं नाही. तिने आज लंच ब्रेक मध्ये सायलीशी बोलायचं ठरवलं.
"सायली एक विचारू "
"विचारू काय म्हणतेस गं इतकी फॉर्मल केव्हापासून वागायला लागलीस माझ्याशी. "सायली श्वेताला चिडवत म्हणाली.
"समर सर कसे वाटतात तुला " श्वेताने बिचकतच प्रश्न विचारला.
"कसे वाटतात म्हणजे? हा काय प्रश्न झाला का श्वेता ". सायलीने आश्चर्याने विचारलं.
सांग ना तुलाही आवडतात का समर सर "
"तुलाही आवडतात म्हणजे मी नाही समजले काय बोलायचंय ते स्पष्ट बोल ना श्वेता " सायली काहीच न समजल्याने प्रश्नार्थक चेहऱ्याने श्वेता कडे पहात म्हणाली.
"राहू दे हा सायली इतकं अगदीच काहीच माहीत नसल्या सारखी नको वागू मीच काय पण ऑफिसमधल्या बाकीच्या लोकांनाही हळूहळू जाणवू लागलंय आणि तू म्हणतेस की तुला काहीच माहीत नाही. हे म्हणजे असं झालं वेड पांघरून पेडगाव ला जाणं. "श्वेता चिडून म्हणाली.
"श्वेता अगं खरंच मला तू काय बोलते आहॆस आणि कश्याबद्दल बोलते आहॆस काहीच कल्पना नाही. आणि ऑफिस मधल्या लोकांचं काय?त्यांना काय जाणवलयं " सायली काकुळतीला येऊन म्हणाली.
"म्हणजे तुला काहीच माहीत नाही " श्वेता आश्चर्य वाटून म्हणाली
"अगं बाई काय माहीत नाही आहे मला केव्हापासून तेच तेच बोलते आहॆस पण मूळ विषय सांगतंच नाही आहॆस. आणि समर सरांबद्दल काय म्हणालीस तू मघाशी मला " सायली आता काळजीच्या सुरात बोलू लागली.
"मला आणि ऑफिस मध्ये सर्वांनाच असं वाटतंय की समर सरांना तू आवडते आहॆस. " श्वेता एका दमात बोलून गेली.
हे ऐकताच सायली तर जागची उडालीच.
"काय? वेडबीड लागलंय का तुला "
सायली इतक्या जोरात म्हणाली की आजूबाजूच्या टेबल वरील मंडळी श्वेता आणि सायली कडे पाहू लागले.
"अगं काय करतेस सायली. हळू बोल. सगळ्यांना ऐकवणार आहॆस का? "
आपला आवाज शक्य तितका कमी करत सायली बोलू लागली " डोकं फिरलंय का तुझं म्हणे समर सरांना मी आवडते. बॉस आहेत ते आपले आणि मुळात कुठे ते आणि कुठे मी "
तू ही इथेच आहॆस आणि समर सर ही इथेच आहेत ते बघ समोर.इकडेच येताना दिसतायत.
सायलीने खुणेनेच श्वेताला शांत बसायला सांगितले.
समर,सायली आणि श्वेताच्या टेबल जवळ आला.
"Hi girls! If you dont mind may I join you ". आपली तिचं किलर स्माईल देतं त्याने दोघींना विचारले.
"या ना सर यात विचारायचं काय? तुम्ही आम्हांला जॉईन केलंत तर आम्हालाही आवडेल. सायली कडे चोरट्या नजरेने पहात श्वेता म्हणाली.
खुर्चीवर बसत समरने कँटीनच्या पोऱ्याला बोलावले आणि त्याला चीज सँडविचची ऑर्डर दिली. तुम्ही दोघी काय घेणार?
"No thanks sir आमचा टिफिन आहे. तुम्ही मागवा तुम्हाला काय हवंय ते"श्वेता म्हणाली
श्वेता आणि सायली मध्ये समर बद्दल चाललेला संवाद आणि अचानक समरच्या तिथे येण्याने सायलीला फारच अवघडल्यासारखं वाटू लागला.कधी एकदा टिफिन संपवते आणि इथून निघते असं सायलीला झालं होतं.
इतका वेळ झाला आपण इथे येऊन पण सायली ना आपल्या कडे पाहते आहे ना काही रिप्लाय देतेय म्हणून मुद्दाम त्याने सायलीलाचं प्रश्न विचारला.
"मिस सायली मी इथे बसलेलं तुम्हांला आवडलेलं दिसत नाही. माफ करा मी तुम्हां मैत्रिणींना डिस्टर्ब केलेलं दिसतंय. बहुतेक खूपच महत्वाच्या विषयावर तुम्ही बोलत होतात आणि माझ्या मुळे तुमचं बोलणं अर्धवट राहिलं. काही हरकत नाही मी दुसऱ्या टेबलवर बसतो. समर उठून दुसरीकडे जाणार तोच सायलीने त्याला टोकलं
"नाही सर बसा ना तुम्ही आम्ही अगदीच जनरल गप्पा मारत होतात." सायली समर कडे पहात म्हणाली.
"तुम्ही म्हणताय म्हणून मी बसतो. Actually आज ऑफिसला निघायला उशीर झाला त्या घाई गडबडीत डबा घ्यायचा विसरलो. माझ्या केबिन मध्ये पण मी लंच मागवू शकलो असतो पण मग असं मोकळ्या वातावरणात आपल्या कर्मचाऱ्यां सोबत लंच करण्याची मजा काही वेगळीच नाही का? " समर हसत म्हणाला
"सर तुम्ही कॉफी घेणारं. लंच नंतर गरमागरम कॉफी पिण्याची लज्जतंच काही और आणि सायलीला तर लंच नंतर कॉफी लागतेच. त्याशिवाय मॅडमला काम करायला एनर्जी येतं नाही. " सायली कडे पाहून डोळे मिचकावत श्वेता म्हणाली.
"असं आहे होय. तरी मी म्हणतो मिस सायली इतक्या एनर्जी ने कश्या बरं दिवस भर कामं करतात. पण ही तर जादू आपल्या ऑफिस कँटीन च्या कॉफी ची आहे " एवढं बोलून समर जोरजोरात हसू लागला.
या क्षणी मात्र सायली आपलं हसू रोखू शकली नाही.
"असं काही नाही सर ही श्वेता काहीही बडबडत असते. तुम्ही तिच्या कडे नका लक्ष देऊ. खरं तर इथली कॉफी खूप छान असते. कॉफी घेतल्यावर फ्रेश ही वाटतं आणि काम करायला उत्साहही येतो."
"चला म्हणजे मला ही कामाचा उत्साह वाढवायला रोज लंच नंतर कॉफी घ्यायला हवी "
"तुम्हांला कॉफीची गरज काय आहे सर तुम्ही नेहमीच अगदी उत्साहात आणि फ्रेश मूडने काम करत असता. "
"अरे वा मिस सायली बरंच माहीत आहे तुम्हांला माझ्याबद्दल " समर सायलीची फिरकी घेत म्हणाला.
तसं काही नाही सर. बोलण्याच्या ओघात आपण जास्तच बोलून गेलो हे लक्षात येताच सायली श्वेताला म्हणाली "निघुयात का आपण बराच वेळ झालाय. लंच ब्रेक ही संपत आलाय आणि काम ही भरपूर आहे."
"बाय सर निघतो आम्ही " म्हणतं दोघींनी समरचा निरोप घेतला.
गेली कित्येक दिवस समर सायलीशी बोलण्याचा प्रयत्न करीत होता. पण सायली कामाव्यतिरिक्त ना त्याच्याशी बोलत होती ना त्याच्या समोर जातं होती. म्हणून आज मुद्दाम समर टिफिन विसरला. त्याला माहित होतं लंच ब्रेक मध्ये सायली कँटीन मध्ये असते. त्या वेळी तरी कामाव्यतिरिक्त सायली आपल्याशी बोलेल या आशेने समरने सगळा प्लॅन आखला. आणि काही अंशी समरचा प्लॅन सक्सेसही झाला. हळूहळू एक एक पायरी चढायची आणि सायलीच्या मनाचा ठाव घ्यायचा असं समरने मनोमन ठरवलं.
समर आपलं प्रेम मिळवण्यात यशस्वी होईल का? सायलीच्या मनात समर बद्दल नक्की काय भावना असतील? या नवीन वळणावर सायली आपल्या वचनला विसरणार तर नाही ना? खूपच प्रश्न आहेत ना पण या सगळ्याचं प्रश्नांची उत्तरे घेऊन लवकरच येईन तुमच्या भेटीला. तोपर्यंत सायोनारा ?
©®शितल ठोंबरे (हळवा कोपरा )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा