©® शितल ठोंबरे (हळवा कोपरा )
वचन.... भाग 6
मागील भागात आपण पाहिले......
"आता सायू काय लहान आहे का ती तिची काळजी घेऊ शकते. तसंही एकटी नाही ती सगळं ऑफिस आणि ते समर सर आहेत सोबत. असं तूच म्हणाली होतीस ना. मग कशाला उगाच काळजी करतेस "
"ते नाही गं. मी सायूच्या लग्नाबद्दल बोलतेय. मी तिला म्हटलं की सुलूला तुझ्यासाठी चांगला मुलगा शोधायला सांगितलं आहे तर काहीच उत्तर देईना. बरं तुला कोणी आवडतं का असं विचारलं तर त्याचही उत्तर नाही दिलं. मग तूच सांग काय समजायचं मी. पोरीच्या मनात काय आहे ते त्या देवालाच ठाऊक "
"ताई कशाला काळजी करतेस. हे बघ सायू आली ट्रिपवरून की मी स्वतःचं बोलते तिच्याशी. मग तर झालं. आता उगाच टेन्शन घेऊ नको आनंदी रहा "
आता पुढे.....
खरेदी करून, मंदिरात दर्शन घेऊन , बाहेर हॉटेल मध्येचं पेटपूजा करून सगळी मंडळी संध्याकाळी पाच वाजता रिसॉर्टवर पोहचली.
रिसॉर्टमध्ये रात्रीच्या पार्टीची तयारीच सुरू होती. सात वाजता तयारी करून सगळ्यांनी रिसॉर्टच्या लॉन मध्ये भेटायचं असं ठरवून सगळे आपापल्या रूम मध्ये रेस्ट करायला गेले.
समर रिसॉर्टच्या मॅनेजरला जाऊन भेटला. त्याचे आभार मानले की इतक्या शॉर्ट नोटीस वर त्यांनी रात्रीच्या पार्टीची अरेंजमेंट करायला होकार दिला.
हा सगळा समरचाच प्लॅन होता. रिसॉर्ट वर पार्टी ठेवण्याचा.सायलीला प्रपोज करण्यासाठी.आज समर खूप खुश होता.
" आज काही झालं तरी सायलीला प्रपोज करायचंच "समर मनातल्या मनात म्हणाला.
बरोबर सात वाजता सगळे लॉन मध्ये जमा झाले.सायलीने गडद निळसर रंगाचा चुडीदार कुर्ता घातला होता. त्या गडद रंगाने तिचा गोरा रंग चांगलाच खुलला होता.
चंद्राचा हलकासा प्रकाश आणि धीम्या लायटिंग ने लॉन खूपच सुंदर दिसत होता. पण एका कोपऱ्यात खूपच अंधार होता. त्यामुळे राहून राहून सगळ्यांचं लक्ष तिकडेच जात होत. एवढ्या छान सजावटीत हा अंधारा कोपरा का बरे ठेवला असेल?
ब्लॅक शर्ट ब्ल्यू जीन्स मध्ये किलर स्माईल देतं समरचं आगमन झालं.
पार्टीत असणाऱ्या कितीतरी मुली त्याच्या किलर स्माईलने घायाळ होताना दिसत होत्या.
पार्टी होस्ट करणारं एक सुंदर कपल होतं. त्यांनी अनाऊन्समेन्ट करायला सुरुवात केली.
हॅलो फ्रेंड्स आजची पार्टी मजेदार करण्यासाठी आम्ही तुमच्या साठी घेऊन आलॊ आहोत एक अनोखा गेम. या दोन बाउल मध्ये आम्ही सेम नंबर च्या प्रत्येकी एक एक चिट टाकल्या आहेत. गर्ल्स साठी नंबर 1 चा बाऊल आहे तर बॉईज साठी नंबर 2चा बाउल. प्रत्येकाने येऊन आपापल्या बाऊल मधून एक एक चिट उचलायची आहे. ज्यांचा नंबर सेम असेल ते आज या पार्टीचे डान्स पार्टनर असतील. So shall we start our exciting game.
डीजेच्या तालावर सगळेच आपापली चिट उचलत होते आणि पुन्हा जागेवर येतं होते . आपल्याला कोण पार्टनर भेटतंय याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती. आता फक्त समर आणि सायली चिट उचलायचे राहिले होते. श्वेताने अक्षरश : ढकलतच सायलीला चिट उचलायला लावले. पण तेवढ्यात लाईट गेले. आणि होस्ट करणाऱ्या त्या सुंदर कपल ने टेबलवरचे बाऊल आधीच तयारीत ठेवलेल्या टेबलखालच्या बाऊलशी एक्सचेंज केले. ज्यात सेम नंबरच्या चिट होत्या. हा ही समरच्याच प्लॅनिंगचा एक भाग होता.
काही क्षणातच लाईट आले. समर आणि सायलीने चिट उचलल्या. जो तो आपापला नंबर सांगून आपला पार्टनर कोण आहे हे पहात होता. सायली ने आपला नंबर पहिला. त्याचं नंबरची चिट समर हवेत उडवून आपली पार्टनर शोधत होता.
सायली पाहू तर तुझा लकी पार्टनर कोण आहे म्हणत श्वेताने सायलीची चिट पाहिली. समर आणि सायलीचा सेम नंबर पाहून ती सायलीला चिडवू लागली \"क्या बात हैं सायली रब ने बना दि जोडी \"
पण तिला काय माहीत ही जोडी जमवायला समरला काय काय उचापती कराव्या लागल्या आहेत.
प्रत्येकजण आपापल्या पार्टनर समोर उभे राहिले सायली आणि समर आता एकमेकांच्या समोर उभे होते. समरला सायलीच्या चेहऱ्यावरील प्रत्येक भाव टिपता येतं होता. सायली अगदी समोर असल्याने समरची नजर काही सायलीवरून हटत नव्हती.
म्युजिक सुरू झालं आणि प्रत्येकजण आपापल्या पार्टनर सोबत डान्स करू लागले.
"माफ करा सर पण मला डान्स नाही येतं प्लिज तुम्ही तुमच्या साठी दुसरी पार्टनर शोधता का? " सायली समरला उद्देशून म्हणाली.
"मिस सायली अहो मला तरी कुठे नाचता येतं. आणि तुम्हांला काय वाटतं इथे नाचणाऱ्या प्रत्येकाला नाचता येतंय. मुळीच नाही प्रत्येकजण फक्त गाणं फील करतोय. मग आपोआपचं शरीर त्या गाण्याला प्रतिसाद देतं. तुम्हांलाही तेच करायचंय " असं म्हणत समरने सायलीचा हात आपल्या हाती घेतला. तो पहिला स्पर्श समरच्या मनातील सायली बद्दलची प्रेमाची भावना अधिकच उत्कट करत होता.
म्युजिकच्या तालावर सगळे नाचण्यात व्यस्त होते आणि अचानक म्युजिक बंद झालं काही कळण्याच्या आत समर गुडघ्यावर होता. त्याच्या हातात सायलीला प्रपोज करण्यासाठी रिंग होती तर दुसरीकडे इतका वेळ अंधारात असणारा तो कोपरा उजळत होता. त्या कोपऱ्यात छोट्या छोटया दिव्यांनी I LOVE U SAYALI लिहिलं होतं. समरने बोटानेच सायलीला खुणावलं. सायली हे सगळं पाहून गोंधळली होती.
ऑफिस स्टाफला समरचं हे सरप्राईज भारी आवडलं.
"सायली हो म्हण, सायली हो म्हण " म्हणत सगळ्यांनीच गलका केला.
पण सायलीच्या चेहऱ्यावर ना आनंदाचे भाव होते ना आश्चर्याचे. समर सायलीकडे पहात तिच्या उत्तराची प्रतीक्षा करत होता. पण सायली स्तब्ध उभी होती. जणू इथे जे काही सुरू आहे त्याचा तिच्यावर काही परिणामच होतं नव्हता.
सायलीने समरच्या डोळयांत पाहिलं. "माफ करा सर पण हे शक्य नाही म्हणत " सायलीने समरच्या हातून आपला हात सोडवून घेतला आणि कोणाला काही कळण्याच्या आतच धावतच रूमच्या दिशेने गेली.
सायलीला असं निघून जाताना पाहून सगळयांनाच धक्का बसला. श्वेताही धावत सायलीच्या मागे गेली.
समर मात्र अजूनही त्याचं जागी गुडघ्यावर बसला होता. सायलीच असं जाणं त्याच्या मनाला चांगलंच लागलं. कदाचित मीच चुकीच्या वेळी चुकीच्या पद्धतीने तिला प्रपोज करत होतो की काय असं समरला वाटू लागलं.
रात्रभर ना समरला झोप लागली. ना सायलीला. सायलीच्या मनात अनेक विचाराचं काहूर माजलं होतं. दोन दिवसापूर्वी आईने काढलेला लग्नाचा विषय, आज समरने अचानक केलेलं प्रपोज आणि काही वर्षांपूर्वी सायलीने स्वतःला दिलेलं वचन.डोक्यात नुसता विचारांचा गोंधळ सुरू होता.
समरला समजत नव्हते त्याचे नक्की चुकले तरी काय? कदाचित मीच घाई केली. सायलीचं मन जाणून न घेता तिला असं सगळयांसमोर प्रपोज केलं. कदाचित माझ्या अश्या वागण्याने ती दुखावली गेली असेल.हे एकतर्फी प्रेम आहे ज्यात मी सायलीचा तिच्या भावनांचा जराही विचार नाही केला. समर रात्रभर स्वतःलाच दोष देतं होता. सायलीला भेटून तिच्याशी बोलायला हवं. तिची माफी मागायला हवी. समरने आपल्या मनाशीच ठरवलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच बस मुंबईच्या दिशेने निघाली. पण येताना जो आनंद,उत्साह सगळयांमध्ये भरला होता. तो कुठल्या कुठे पळाला होता. सगळ्यांचेच चेहरे उदास दिसत होता
सायली खिडकी बाहेर पहात शांत बसून होती. श्वेता सायलीचा हात आपल्या हाती घेऊन बसली होती.
समरला तर जणू काही आपलं सगळं आयुष्यचं आपण हरवून आल्यासारखं वाटत होतं. चेहऱ्यावर एक प्रकारची उदासीनता होती.
दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये सगळे आले. प्रत्येकजण आपापल्या कामाला लागले. पण हळूहळू कुजबुज सुरूच होती. अलिबाग मध्ये घडलेल्या प्रकरणाची. सायली अजूनही ऑफिसला आली नव्हती. समरने सायलीचा डेस्क पाहिला तो रिकामाच होता. सायली अजून कशी आली नाही याचा विचार करत असतानाच श्वेता समरजवळ सायलीचा निरोप घेऊन आली.
"सर सायलीची तब्येत ठीक नाही त्यामुळे आज ती ऑफिसला येऊ शकणार नाही. तिने हा निरोप तुम्हाला द्यायला सांगितला आहे "श्वेता समरला म्हणाली
ओके म्हणत समर आपल्या केबिन मध्ये गेला. सायलीला खरंच बरं वाटत नाही की काल जे काही घडलं त्यामुळे सायली ऑफिसला आली नाही. नक्की काय कारण असेल बरं. फोन करू का तिला किमान तब्येतीची चौकशी करण्यासाठी. नाही नको उगाच तिला ऑकवर्ड व्हायचं. समरने हात फोन जवळ नेलेला पुन्हा मागे घेतला.
दुसऱ्या दिवशीही सायली आली नाही आणि तिसऱ्या दिवशी समरला सायलीचा मेल आला तिने रिजाईन केलं होतं. सायलीच ते रेजिग्नेशन पाहून समरला धक्काच बसला.
सायली एवढी मोठी चूक केली का मी? निदान तुझ्या नकाराचं कारण तरी मला सांगायचं.तितका हक्क मला नक्कीच आहे. तू मला का नकार दिलास आणि आता हे ऑफिसही सोडून जाते आहॆस. का? या का चं उत्तर तुला द्यावंच लागेल.
-------------------------------------------------------------------
सायली ट्रिप वरून आल्यापासून शांतच होती. मालतिला समजेना सायलीला नक्की काय झालंय. लग्नाच्या विषयावरून सायली अजून नाराज तर नाही.
गेली चार दिवस सायलीआजाराचं कारण सांगून घरीच होती. ऑफिसला कारणावीन दांडी न मारणारी सायली चार दिवस झाले तरी ऑफिसला जायचं नाव घेत नाही पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं.
मालतिला धक्का तर तेव्हा बसला जेव्हा सायली वर्तमानपत्रात जॉब व्यकन्सी च्या जाहिराती पहात होती. बरं काही विचारावं तर बोलायला ही तयार नाही. मालती आणि सुदेश दोघांनाही सायलीची चिंता वाटू लागली. अलिबाग मध्ये नक्कीच काही तरी घडलंय ह्याचा अंदाज त्यांनी बांधला.
समरला सायलीचं असं अचानक ऑफिस सोडणं मुळीच पटलं नाही. किमान एकदा तरी सायलीशी बोलायला हवं. काही प्रॉब्लेम असेल तर त्यावर मिळून मार्ग काढता येईल. पण आपलं प्रेम असं इतक्या सहजपणे कसं जाऊ द्यायचं. सायलीने माझा माझ्या प्रेमाचा एकदा तरी विचार करावा. आणि हे सगळं होण्यासाठी मला सायलीला भेटलंच पाहिजे. समरने ठरवलं.
श्वेत्ताकडून सायलीचा पत्ता मिळवला आणि यातलं सायलीला काही सांगू नको म्हणून सांगितलं. उद्याच जाऊन सायलीला भेटतो.
दुसऱ्या दिवशी समर सायलीचा पत्ता शोधत सायलीच्या घरी पोहचला. दार ठोठावताच काही क्षणातच दार उघडलं. समोर सायलीचं उभी होती. समरला असं अचानक घरी पाहून सायलीला काहीच सुचेना. आत येऊ ना म्हणत सायली काही म्हणायच्या आतच समर घरात शिरला.चाळीतलं ते छोटंसं घर पण नीटनेटकं, स्वच्छ, सगळं सामान जागच्या जागी ठेवलेलं परफेक्ट.राजेश आणि सूरज कॉलेजला गेल्याने तेव्हा घरात फक्त सायली, मालती आणि सुदेशचं होते
"माफ करा मी असा अचानक इथे आलो "
तोच मालती बाहेर आली. कोण आहे गं सायू?
"आई हे माझे बॉस समर सर "
"अरे बसा ना तुम्ही सायली जा त्यांना पाणी तर घेऊन ये. तुम्ही बसा मी चहाच घेऊन येते " म्हणत मालती किचन मध्ये गेली. तिच्या पाठोपाठ सायली ही आत आली.
\"काय गं सायली तुझे हे सर असे अचानक इथे का
आलेत "
आलेत "
"आता ते मला कसं माहित असणारं आई" सायली म्हणाली.
मालती चहा घेऊन आली. समर चहा घेत मालतीला म्हणाला " माफ करा मी असं इथे अचानक आल्याबद्दल. पण माझं तितकंच महत्वाचं कामं होतं म्हणून मी आलो. मला तुमच्या सायलीशी खूप महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे "
मालतीला समजेना नक्की काय बोलायचं आहे समरला सायलीशी. तिने सायलीकडे पाहिलं सायली शांतच होती.
"मला तुमच्या सायलीशी एकट्याने बोलता येईल का? म्हणजे तुमची काही हरकत नसेल तर " समर मालतीला म्हणाला
मालती काही उत्तर देणार तोच सायली म्हणाली " सर तुम्ही काही बोलण्याआधी मला तुम्हां सर्वांशीच बोलायचं आहे. मला माहित होतं माझं रेजिग्नेशन पाहून तुम्ही मला भेटण्यासाठी नक्की याल. आज जे काही बोलायचंय, जे काही व्हायचंय ते सगळ्यांसमोरचं होऊ देतं. "
मालतीला उद्देशून सायली म्हणाली " आई बाबांनापण बाहेर घेऊन ये मला तुम्हां सर्वांशीच बोलायचं आहे. "
मालती सुदेशला घेऊन आली. समर सह त्या दोघांनाही उत्सुकता होती की नक्की सायली काय बोलणार आहे.
सायलीला समर आणि आपल्या आई बाबांना काय सांगायचं असेल बरं? जाणून घ्यायचंय ना मग लवकरच भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत सायोनारा ?
©® शितल ठोंबरे ( हळवा कोपरा )