वाघाची मावशी

Manjar mazya najretun .prtyekacha anubhw vegla asel .

शीर्षक वाचूनच अनेकांना लेख मांजरावर आहे हे कळलं असेल.मांजर हा जरी पाळीव प्राणी असला तरी ती तिचा स्वाभिमान कधीच सोडत नाही.कुत्रा जसा सहज तुम्ही आलात म्हनून सुद्धा आनंदाने उड्या मारेल मांजरीच तसं नाही.

ती आपल्याच तालात आणि तोऱ्यात असते.मला मांजर सर्वात जास्त फोटोजेनिक वाटते,जेवढ्या सहज आणि आकर्षक पोझ मांजर देतात तेवढी कोणालाही जमणार नाही.तिला तिचे लाड करून घ्याचे असले तर तुमच्या जवळ येणार अगदी मांडीवर येऊन बसणार पण तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही तिला जवळ घेऊ शकत नाही.प्रसंगी ती वाघासारखी आपली लपलेली नखे बाहेर काढणारच.

मांजर उन्हाला बसते तेव्हा तर ती एखाद्या सम्राज्ञी सारखी डौलात ऊन अंगावर घेत तेव्हा तिला कोणाचीच लुडबुड आवडत नाही.आळस देऊन अंग झटकताना सुद्धा ती अगदी आकर्षक पद्धतीने उठणार आणि सहज चालू लागते.स्वतःच्या खुशीत जगणारी मनी माऊ खूप वेळा खोड्या काढण्यात सुद्धा पटाईत असते,अनेकदा झाडावर किंवा उंचावर जाऊन अडकते तेव्हा तिचा चेहरा पाहून दगडालाही पाझर फुटेल.

मांजरीचा चेहरा तुम्ही सरावाने सहज वाचू शकता.रागीट, आनंदी,घाबरलेली प्रत्येक छटा तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते.वाघाची मावशी हे तिला मिळालेलं बिरूद ती अनेकदा सार्थ ठरवते .मला मांजर आवडते ती शुभ्र पांढऱ्या रंगाची आणि निळ्या घाऱ्या डोळ्यांची.प्राचीन काळपासून मांजर आणि जादू यांचं नातं असल्याने काळी मनी जरा भीतीदायकच वाटते मला.

माझा आळस आणि मूड अनेकदा मांजरीचा नुसता फोटो पाहून सुद्धा सुधारतो.इतकी हि वाघाची मावशी माझ्या मनात ठसली आहे.मासा खाताना तर मला ती समाधिस्थ योगी वाटते आणि दूध चोरून पिताना तिच्या चेहऱ्यावर असणाऱ्या मिष्किल्पना हा अनुभवण्याचा भाग आहे.अशी ही वाघाची मावशी अनेकदा अनेक रुपात सर्वत्र भेटणारी...