Jan 23, 2022
वैचारिक

व्यायामाला पर्याय नाही

Read Later
व्यायामाला पर्याय नाही

व्यायाम करा व्यायाम करा कानी कपाळी ओरडत होता सारंग.... पण कोणीही घरात ऐकत नव्हतं त्याचं.... नाही सुप्रिया, ना आई बाबा... शेवटी व्हायचं तेच झालं.... आईला मधुमेह आणि रक्तदाब जडला तर सुप्रियाला मधुमेह.... वयानुसार हे होणारच अशी आईने आणि सुप्रियाने री ओढली त्यावर.... पण सारंग मात्र आता चिडला होता. त्याने आता फर्मानच काढलं होतं की उद्यापासून  घरात सगळ्यांनी निदान एक तास तरी व्यायाम करायचा. ज्याला जसा झेपेल तसा...
त्याने सगळ्यांना सांगितलं, जसं पेराल तसे उगवेल हा नियमच आहे नं मग तो आपल्या शरीराला पण लागू पडतो. 24तासांपैकी एक तास तरी शरीराला द्यायलाच हवा तरच शरीर आणि मन प्रसन्न राहील आणि शेवटपर्यंत कुरबुर न करता आपली साथ देईल.आणि तुम्ही स्त्रियांनी तर हे हटकून अगदी जिद्दीने करायलाच हवे.
सुप्रिया आणि आई दुसऱ्या दिवशीपासून सकाळी फिरायला जायला लागल्या. घरी आल्यावर प्राणायाम आणि थोडा व्यायाम करायला लागल्या. सुरुवातीचे काही दिवस दोघीनांही दमल्यासारखं झालं पण सारंगच्या धाकाने का होईना दोघी करत होत्या. पुढच्या काही दिवसात मात्र त्यांना बरे वाटू लागले, शरीरही जरा हलके झाले, सकाळच्या प्रसन्न वातावरणात केलेल्या व्यायामाने मनही एकदम ताजेतवाने झाले.सारंग ने आता त्यांना आहारातज्ञाकडे पाठवले. त्यांनी सांगितल्यानुसार सुप्रियाने आहारात योग्य तो बदल केला. आता हळू हळू सुप्रिया आणि आईची lifestyle च बदलली. दोघीही स्वतःकडे व्यवस्थित काळजी घेऊ लागल्या. औषधं, व्यायाम आणि आहार सांभाळून दैनंदिन व्यवहार नीट सांभाळून घेऊ लागल्या.
काही दिवसात परत त्या दोघींचीही रक्त तपासणी करण्यात आली... आईला वयानुसार रक्तात आलेली साखर आणि रक्तदाब आता आटोक्यात आला होता आणि सुप्रियाचा मधुमेह पण अगदी आटोक्यात आला होता. सुप्रिया आता अगदी निर्धास्त झाली होती.
पण तिला आणि आईला आता सारंगचे म्हणणे पटले होते. शरीराची काळजी घेणे अत्यावश्यक होते. म्हणून आता दोघीनींही ठरवले की व्यायाम आणि आहार याकडे लक्ष द्यायचंच..... आपल्या शरीराला आणि मनाकडे आपण जेवढं लक्ष देऊ तेवढी ते आपली साथ देतील...वयानुसार येणारी दुखणी आली तरी त्याचा आपल्याला फार त्रास होणार नाही. शरीराला जसे देऊ तसे शरीर परतफेड करेल त्याची, हे सारंगचे म्हणणे सगळ्यांनाच पटेल असे आहे.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Trupti Likhite

Homemaker

I hav two daughters. Now wanted to explore myself