व्यवहार आणि नातं

, रात्री सुनिता चे मिस्टर सुनील आले, सुनिता रागातच होती,तिने सर्व हकिकत नवर्या ला सांगितली , " पहा आई चा आपल्या वर विश्वास नाही,तुम्हाला पटतंय कां हे असे लेखी देणं?"

व्यवहार आणि नातं
\"अरे सुभाष आज सकाळी तुझ्या लाडक्या बहिणीचा म्हणजे सुनिता चा फोन आला होता.अरे वा-आज कशी काय आठवण आली?वहिनी म्हणाली.
"काय म्हणते आपली लाडोबा सगळे ठीक आहे ना?" सहजच केला कि---
ते माहीत नाही येणार आहे काही काम आहे तुझ्याकडे म्हणत होती."
अरे वा माझ्याकडे? भाऊजीं शी भांडून तर नाही ना येते.?"
आता काय लहान आहे का रे भांडून यायला ? झाली न दहा वर्ष लग्नाला.आईने लेकीची बाजू घेत म्हटलं."

संध्याकाळपर्यंत सुनिता माहेरी पोहोचली. तिला पाहून आई वहिनी दादा सगळेच खुश झाले. वहिनीने नणंदे साठी स्पेशल जेवण केले.
"आल्यासारख्या रहा आता-- वहिनी म्हणाली .
"नाही ग, दोन दिवसात लगेच जाईन."
काय ग तुम्ही मुली आल्या काय नी ---

"कां, एवढ्या तातडीने येणे- जाणे?" आई ने विचारले!

-- दादाशी बोलायचं आहे."

रात्री जेवण झाल्यावर सुभाष ने विचारले, तेव्हा सुनीता म्हणाली "थोडी मदत हवी होती पैशांची यांना बिझनेस करता." तशी थोडी व्यवस्था झाली आहे पण--

\" किती लागतिल?

पाच(लाख) मिळाले तर बरं होईल.. म्हणजे हे उद्या येतात आहे ते सांगतील सगळा प्लॅन.
"ठीक मी करतो व्यवस्था उद्यापर्यंत."

सुभाष ने पाच लाखाचा चेक तयार करून सुनिता च्या हातात दिला, तेव्हा आई व वहिनी तिचेच होत्या.

"मी काय म्हणते सुभाष आई म्हणाली, तुम्ही दोघे सख्खी भावंड आहात. एकमेकांना प्रसंगी मदत करणं हे तुमचं कर्तव्यच आहे त्यातूनच एकमेकांविषयीची काळजी, प्रेम जाणवत,पण नातं आणि व्यवहार या दोन्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात .
नात्यात व्यवहार नको आणि व्यवहारात नातं पाहू नये असं मला वाटतं."

"म्हणजे तुला काय म्हणायचं? सुभाष ने विचारले.?"

बहिणी ला वेळ प्रसंगी मदत करायलाच हवी पण --पैशांचा व्यवहार हा नेहमी लेखी हवा.


" तू तिला कर्ज म्हणून देतो आहेस की भेट?"

"नाही नाही, आई मला भेंट नको आहे आम्ही पैसे परत करू."

हो पण ते एका पेपरवर लिखित हवं किती पैसे दिले व केव्हा परत करणार.
"अगं आई ती माझी सख्खी छोटी बहिण आहे असं करण योग्य दिसेल?"

आई "ते सर्व का? माझ्यावर विश्वास नाही? मग मला नकोय तर."सुनिता रागावून म्हणाली.

"तसं नाही ग पोरी विश्वास आहे पण वेळ सांगुन येत नाही., मी अनुभवानी सांगते समजून घे.

खूप वर्षांपूर्वीची घटना आहे, माझ्या लहानपणीची. आमच्या शेजारी सुरेशदामले राहत होते.दामले काकांना एक मुलगा व एक मुलगी ,त्यांचे मोठे भाऊरमेश दुसऱ्या गावात रहात आईवडील कधी इथे तर कधी तिथे रहात. सुरेशकाकानौकरी मुळे इथे रहात त्यांच्याकडे गावात शेतीवाडी होती.ती मोठे भाऊ पहात.मोठ्या काकांना दोन मुली व बर्याच नंतर झालेला एक मुलगा होता.

सर्व छान चाललं होतं पण दोन वर्षे लगातार पाऊस पाणी कमी झालं त्यामुळे शेतीतून फारसं उत्पन्न नाही मिळालं त्यातून मोठ्या काकांच्या मुलीचे लग्न ठरलं होतं सगळीकडूनच कोंडी झाली त्यामुळे मग त्यांनी धाकट्या भाऊसुरेश कडे मदत मागितली . दामले काकांनी आपले कर्तव्य समजून भावाला मदत म्हणून एकरकमी पन्नास हजार रुपये दिले .
लग्न व्यवस्थित पार पडले त्यावेळी दामले काका नोकरीत होते मुलंही लहान होती त्यामुळे त्यांना त्या पैशांची तातडीने गरज नव्हती म्हणून त्यांनी भावाकडून पैसे केव्हा परत करशील अशी विचारपूस केली नाही. पुढे भावाचे आकस्मिक निधन झाले दामले काकांच्या मुलां याबाबतीत काहीच माहित नव्हतं.

बरीच वर्ष झाली , मुलं मोठी झाल्यावर इकडे मुलांच्या शिक्षणासाठी म्हणून दामले काकांना पैशांची अडचण आली तेव्हा ते आपल्या पुतण्या सोबत बोलले ,पण त्यांनी हात वर केले म्हणाला बाबांनी आम्हाला याबाबत काहीच सांगितले नाही शेती ही पैतृक असुनही काही लेखी पुरावाही नव्हता मग काय करणार

माझे बाबा वकील त्यांच्याजवळ दामले काका आले, बाबांनी विचारले काही लेखी पुरावा?"
दामले काकांजवळ तसं काहीच नव्हतं त्यामुळे पैसे तर गेलेच पण नात्यातही कटुता आली. काकूंनी खूप बडबड केली पण काय फायदा म्हणून मला वाटतं."

दुसऱ्या दिवशी सुनीता जरा गुमसुम च होती, रात्री सुनिता चे मिस्टर सुनील आले, सुनिता रागातच होती,तिने सर्व हकिकत नवर्या ला सांगितली , " पहा आई चा आपल्या वर विश्वास नाही,तुम्हाला पटतंय कां हे असे लेखी देणं?"

त्यावर हसुन हे बघ सुनीता ती तुझी आई आहे ती तुम्हा दोघा भाऊ बहिणींवर सारखेच प्रेम करते हो न? आणि म्हणूनच त्या असं म्हणाल्या. त्यात काही चूक नाही प्रेम आणि व्यवहार या दोन्ही गोष्टी व्यवस्थित पाळल्या तर पुढे संबंध चांगले टिकून राहतात मला सासूबाईंचं म्हणणं पटतय.
तुही जरा व्यावहारिक हो काही गोष्टी भावना पेक्षा व्यवहारीक असलेल्या चांगल्या.
सकाळी सुनील उठून बाहेर आले चहा पिता पिता ते म्हणाले आई तुमचं म्हणणं योग्य आहे, मला तुमचे म्हणणे पटते आहे,
मी लेखी करणारा वर सही करायला तयार आहे मग सुनील सुरेखा आणी दादा ह्यानी करारनाम्या वरसही करुन पैसे घेतले.
तेव्हा च आई ने घरांचे कागदपत्रे ही दाखवली .हे बघा सुनील राव व सुनीता घर मी दोघांच्या नावाने करती आहे ते मी गेल्यावर तुम्ही विकले तर अर्धा वाटा तुमचा.तरी या कागदपत्रांवर ही सही करा पण आधी हे पेपर नीट वाचुन विचार करून सही करा.पेपर नीट पाहून सुनिता ने सुनील च्या सम्मतिने सही केली.

दोघांच्या सहीने सुनीताला पैसे मिळाले नात्यातले प्रेम वाढले व मनातले किल्मिष ही दूर झाले...
------------------------------------------©® प्रतिभा परांजपे