व्यथा तिची, कथा माझी

लग्न होऊन ती उदय बरोबर चाळीतल्या घरात आली होती वर्षभरात अंकिता चा जन्म झाला एक दिवस कुजबुज सुरू झाली येथे हायवे बनणार आहे तेव्हा त्यांची चाळ मोडून इथून हायवे चा पूल बनणार तेव्हा ही जागा रिकामी करायची ऑर्डर आहे असे ऐकायला येत होते. मालकांनी आम्ही प्रयत्न करतो असे खोटे आश्वासन दिले पण, अचानक एक दिवस बुलडोजर घेऊन कामगार आले आणि एकच गोंधळ उडाला कसेबसे सामान बाहेर काढून लोक बाहेरयेऊन बसली .

   


*जागतिक चिमणी दिवसा प्रित्यर्थ*


*व्यथा तिची, कथा माझी.*


सुमन ने नाश्ता टेबलावर ठेवून मुलांना आवाज दिला.

 कालच मुलांची परीक्षा संपली होती त्यामुळे सर्व घरच रिलॅक्स झालं होतं .मागचे दहा-बारा दिवस मुलांच्या अभ्यासा पुढे सुमनला काही सुचत नव्हतं घर काम पटापट आवरून ती मुलांना अभ्यासाला बसवी.

आता घराकडे लक्ष द्यायला हवे आहे ,उन्हाळा ही सुरू होतो आहे.

 गरम कपडे धुवायला काढून ते धुवून सुमन बाल्कनीत वाळत टाकायला गेली.

बाल्कनीत खाली खूप सा कचरा काड्या,पिस पडलेले होते तिने कपडे वाळत टाकून कचरा गोळा करून टाकला.

उद्यापासून एक एक खोली आवरायची असं ठरवून कामाला लागली.

दुपारी जरा झोपली तो चिवचिवाटाने तिला जाग आली.

"काय बाई कल -कल आहे म्हणत ती बाल्कनीत आली. खाली परत कचरा पडला होता सुमन ने वर पाहिलं बाल्कनीत एक विंड चाईम लावलेलं होतं त्यावर चिमणीने घरटे बांधले होते." आता इथे ही घरटं"बाई -बाई आणखीन कुठे जागा नाही का गं तुला मिळाली" सुमन चिमणी कडे पहात बडबडली.

अचानक चिमणी खिडकीत येऊन बसली .सुमन ला वाटले चिमणी तिच्याकडे पाहून बोलतिये.

"मग कुठे बांधू?? एक तरी झाड सोडल कांतुम्ही आमच्यासाठी?"

तुम्ही आमच्या जागेवर आपलं घर बांधलं मग आता आम्ही तुमच्या घरात घरट बांधतोय.

अचानक घर मोडण आणि आता कुठे जायचं हे माहित नसल्यावर काय स्थिती होते हे तुम्हा माणसांना कसे समजणार??

चिमणीचे बोलणे ऐकून सुमन च्या डोळ्यासमोर तिचे चाळीतले घर आले.

 लग्न होऊन ती उदय बरोबर चाळीतल्या घरात आली होती वर्षभरात अंकिता चा जन्म झाला एक दिवस कुजबुज सुरू झाली येथे हायवे बनणार आहे तेव्हा त्यांची चाळ मोडून इथून हायवे चा पूल बनणार तेव्हा ही जागा रिकामी करायची ऑर्डर आहे असे ऐकायला येत होते. मालकांनी आम्ही प्रयत्न करतो असे खोटे आश्वासन दिले पण, अचानक एक दिवस बुलडोजर घेऊन कामगार आले आणि एकच गोंधळ उडाला कसेबसे सामान बाहेर काढून लोक बाहेरयेऊन बसली .

उदय च्याएका मित्राने एका खोलीचे घर रिकामे असल्याचे सांगितले ,भाड जरा जास्त होतं पण मागचा पुढचा विचार न करता उदयने ते घर घेतले पैशांसाठी तिने सोन्याच्या बांगड्या ही विकल्या .

पुढे उज्वल झाला .नशीब पालटले उदयला बढती मिळाली आणि त्यांनी हा दोन बेडरूमचा फ्लॅट विकत घेतला फ्लॅट नवीनच बांधलेले होते.

रस्ता पक्का करण्यासाठी बरीच झाडे कापली गेली होती हे सर्व आठवून सुमनला तो दिवस आठवला आणि चिमणी ची व्यथा जाणवली.

मुलांचा रिझल्ट लागला दोघे छान पास झाली म्हणून दोन दिवसासाठी चौघे गावी देवदर्शनाला जाऊन परत आली .

  इकडे आता चिमणा चिमणीच्या घरट्यात चिवचिवाट वाढलेला होता. अंड्यांतून पिल्लं बाहेर आली होती. चिमणी चिमण पोरांसाठी किडे ,धान्य गोळा करून आणत होती.

 सुमन ही एका ताटलीत भात ,पोळीचा चुरा ठेवायची. हळूहळू बाळ मोठे होत गेली.

काही दिवसांनी चिमणबाळे फुर्र-- फुर्र उडू ही लागली आणि अचानक त्यांचं येणं बंद झालं .

चिमणी ही फारशीदिसत नव्हती.

आता सुमनला दुपार रिकामी रिकामी वाटू लागली.

चिमणी घर सोडून गेली वाटतं ती विचार करू लागली. अचानक तिला चिऊ चिऊ चा आवाज आला . वाटलं चिमणी तिला बाय-बाय करायला आली आहे.

"पुढच्या वर्षी इथेच घरटं बांधायला ये हं! सुमन चिमणीला म्हणाली "

"मी असेल कि नाही माहित नाही पण ही माझी बाळ त्यांच काय होणार??"

 सुमनला जाणवले चिमणीला काय सांगायचे आहे! तिने मनाशी ठरवले बाल्कनीत कुंडीत लावलेले वडाचे व आंब्याचे रोप समोरच्या पार्कमध्ये नेऊन लावूया चिमणीच्या पुढच्या पिढ्यांसाठी तरी घराची सोय होईल.

समाप्त

-----------------------------------------