व्यथा न वाळलेल्या कपड्यांची.. भाग २
समरने बोलायला सुरुवात केली..
" आई, दहा मिनिटे दे आम्हाला.. आम्ही आत्ता घर स्वच्छ करतो.. काय रे?"
" हो.." साहिलने पटापट भांडी उचलली.. सुजितने कपड्यांचा ढिग उचलायचा प्रयत्न केला.. तोवर समरने मॉप आणला.. आणि पाच मिनिटात फरशी लख्ख पुसली.. आतमध्ये साहिल आणि सुजितने भांडी घासायला सुरुवात केली..
" ती भांडी जरा स्वच्छ घासा रे.. सगळी तेलकट आहेत.." काकूंनी आवाज दिला..
" हो काकू.. काल साबण न लावता फक्त विसळून ठेवली होती ना.." साहिलने बोलता बोलता जीभ चावली.. काकूंनी कपाळावर हात मारून घेतला.. मगाशी अस्वच्छ दिसणारे घर आता ओके वाटत होते. काकूंचा चेहरा नॉर्मलला आल्यावर तिन्ही मुले काकूंजवळ येऊन बसली. साहिल आणि सुजितने समरला खुणावले.. समरने आईला मस्का मारत बोलायला सुरुवात केली..
" आई, आज काय करून खायला घालणार आम्हाला.."
" मी? या इथे स्वयंपाक करू? आपण जरा हे घर आवरू आणि मग बघू.. अशा पसार्यात मला काही सुधरत नाही.. आणि काय रे इतके दिवस इथे राहताय कोणी घरकामाच्या मावशी नाही का शोधता आल्या.."
" आई आम्ही सकाळी लवकर जातो. यायची वेळ नक्की नसते. कोण येणार कामाला? मग आम्हीच कसेतरी आवरत असतो.."
" मग कपडे?"
" काकू. आमची वॉशिंग मशिन बंद पडली आहे.. आणि सध्या पावसाळा चालू आहे तर तो धोबी आठवड्यातून एकदाच येतो.. त्यामुळे कपडे असे पडले आहेत.." सुजितने स्पष्टीकरण दिले..
" अच्छा.. असे आहे तर.. एक काम करा.. उद्या रविवारची सुट्टी आहेच.. परवा जमत असेल तर सुट्टी काढा. तुमचे घर लावून देते.."
" पण आई ते लग्न?"
" आधी लगीन कोंढाण्याचे.. समजलास रायबा?"
" नाही माते.."
" आधी हे घर लावीन.. मगच लग्नाला जाईन.."
" मग काकू.. आजचा मेनू काय?"
" शेजवान ट्रिपल राईस, स्प्रिंगरोल, व्हेज मंचुरियन विथ ग्रेव्ही.."
" वॉव.. तुम्ही करणार हे सगळे?" मुलांच्या तोंडाला पाणी सुटले..
" नाही.. तुम्ही हॉटेलमधून मागवा.. मी आज प्रवासाने दमले आहे.. उद्यापासून बघू काय ते.." असे म्हणत काकू बाल्कनीत जाऊन उभ्या राहिल्या.. तिथे उभ्या राहून त्या कामाला कशी सुरुवात करायची याची आखणी करत होत्या.. मुलांसोबत गप्पा मारत, त्यांचे अनुभव ऐकत, हास्य विनोद करत वेळ कसा गेला त्यांना कळलेच नाही.. रात्री झोपायच्या आधी त्यांनी न चुकता साबण पावडर आहे का? आणि गिझर चालू आहे का हे पाहिले..
सकाळी मुले उठली ती थंडीने काकडतच.. कोणाच्याही अंगावर पांघरुण नव्हते..
" अरे रात्री तर होते.. आता कुठे गेले?" साहिल डोके खाजवत म्हणाला..
" स ची बाराखडी.. पांघरुणे धुवायला गेली आहेत." काकूंचा आवाज आला.
" स ची बाराखडी? हे काय नवीन?"
" म्हणजे बघ. समर, साहिल, सुजित.. सगळी स वरून सुरू होणारी नावे.. म्हणून म्हटले.. चला उठा लवकर.. चहा करून ठेवला आहे.. आणि आज पाऊस नाहीये तर पटकन सगळे कपडे धुवून टाकू."
" पण काकू, मला नाही येत."
" मी शिकवते. उठल्या उठल्या गरम पाण्यात भिजवले आहेत. काय रे तुम्ही मुले. चड्ड्या पण धुता येत नाहीत तुम्हाला? ते ही धोब्याकडेच देता का धुवायला?" मुले लाजली..
" तसे नाही आई. अग मागच्या आठवड्यात एवढा पाऊस पडत होता कि कपडे सुकवायचे कुठे हा प्रश्न पडला होता. मग आम्ही कपडे धुतलेच नाहीत. म्हणून ते कपडे इथे होते."
" तोंड नका चालवू जास्त. मी शिकवते कसे धुवायचे. चहा पिऊन या पटकन."
" काकू.. काय चहा झाला आहे ओ. तुमच्यामुळे खूप दिवसांनी आईच्या हातचा चहा मिळाला.." साहिल आणि सुजित म्हणत होते.
" कौतुक खूप झाले. चला आवरा पटकन.." तिन्ही मुलांनी काकूंच्या मार्गदर्शनाखाली कपडे धुवायला सुरुवात केली. ते दोन तीन बादली कपडे धुवून झाले..

कपडे धुवून तर झाले आहेत पण सुकतील का? बघू पुढील भागात . तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा