व्याख्या स्वातंत्र्याची ओळख स्वतःची

Swatntry

विषय:- व्याख्या स्वातंत्र्याची......                   स्वातंत्र्य म्हणजे काय हो ???? आपल्या मनाप्रमाणे जगणे.....खरच प्रत्येक जण जगतो का हो??? स्वातंत्र्य म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी तून स्वतःला सिद्ध करता येते ते स्वातंत्र्य....प्रत्येकाला देवाने देणगी दिली आहे...कोणी लिखाणातून सिद्ध करतो....कोणी गाण्यातून... कोणी बोलण्यातून...कोणी चित्रातून... प्रत्येक जण आपली स्वातंत्र्याची व्याख्या त्याच्या त्याच्या पद्धतीने जगतो.... स्वातंत्र्य म्हणजे जिथे तुमच्यावर कोणाचेही बंधन नसेल .... तुम्ही स्वतःच्या भावना स्वतःचे विचार कोणाच्याही दडपणाखाली न येता समोरच्या व्यक्ती समोर मांडू शकता .... स्वतःला सिध्द करताना फक्त मी आनंदी आहे...ते काम करताना मला जो आनंद होतो तो शब्दात सांगता येत नाही....आवडीचे काम मनापासून करावेसे वाटते.... नवीन ऊर्जा संचारते.... खरचं असे स्वातंत्र्य मिळते जिथे फक्त आणि फक्त स्वतः ला झोकून देऊन ते काम मनापासून करावेसे वाटते ते स्वातंत्र्य... इच्छा तिथे मार्ग....या उक्तीप्रमाणे स्वतःला जी गोष्ट करण्यात आनंद वाटतो ते स्वातंत्र्य.....