वयाला मिठी मारावी

Vyala Mithi
मधुरीमा...आई आता तू हा डाय नको लावत जाऊस

आई... का बरं ग

मधु..आता नाही सूट होत तुला डाय


आई...बरं बाई आता दिसू दे मग तुझी आई म्हतारी

मधु... नाही दिसणार तू म्हतारी..हे पांढरे केस ही सुंदरतेचे लक्षण समजतात आजकाल

आई.. मी माझी जशी रहाते तशीच राहणार आहे...वय होत आहे आणि हे म्हतारपण लपवण कठीण जात आहे..स्वतःला कायम update का काय म्हणतात ते ठेवायलाच पाहिजे..

मधु...आई तुला एक भ्रम होऊन बसला आहे, केस पांढरे होने म्हणजे म्हतारपण, चेहऱ्यावर सुरकुत्या येणे म्हणजे झाले मी म्हतारी, गुढगे दुखत असतील तरी आपली तू त्या जिम मध्ये जाते,का तर आजकाल ती ही फॅशन आहे,हिल्स घालते काय.. हे सगळे जिकत simple आणि नैसर्गिक असेल तितके माणूस सुंदर आणि सोबर दिसतो...


आई...मधु आज काय तुला मी म्हतारी झाले आहे आणि ते मला कळत नाही हे समजवण्याचा अट्टहास करते का..घालते मी हिल्स, जाते गूढघे दुःख असून ही त्या मैत्रिणींसोबत.. करते नको तो मेकप.. करते केस डाय हे सगळे सगळ्यांना जमते तर मला का नको...मी बसू कुढत म्हतारी होत असताना मला म्हतारी होऊ देत...मला बाई नैसर्गिक सौंदर्य नकोच मुळी... थोडी लिपस्टिक ,थोडे रुज, थोडे फौंडेशन लावले म्हणजे जरा तरी वय लपते..


मधु...तरी मुलं तुला मावशी म्हणताच, काही तर आता आजी म्हणतात त्यांना ही कळते मेकप खाली एक वयस्कर आंटी आहे तू ..मग का हा अट्टहास तू आधी जशी छान रहायची तशी निखळ बिना मेकप ची छान रहा आई...तिला माहीत नसेल पण नैसर्गिक सुंदरतेची खरंच स्तुती केली जाते...माझी टीचर आहे पण तीचे सगळे केस पांढरे झाले आहेत, पण तिने कधीच खरे सौंदर्य लपवले नाही..म्हणते हा ही स्वीकार करावा, येणाऱ्या वयात ही जसे आणि जितके सौंदर्य असते तितके खोट्या रंग रंगोटीत दिसून येत नाही...मी ही तेव्हापासून त्यांच्या विचाराशी सहमत झाले..

आई...तू आता राहूदे , आता तर माझी ही इच्छा नाही होत हे सगळे केमिकल तोंडाला लावण्याची, ना डाय लावण्याची, गुढगे दुखत आहे तरी तो सगळ्यांना मी कशी फिट आहे हे दाखवण्याचा नादात ते खूप दुखत आहेत हे मी कधी बोलले नाही ,पण आज विषयाने विषय निघालाच आहे ,आणि तू ही वय न लपवण्याच्या मताशी सहमत आहेस तर...मी उद्यापासून जशी आधी रहायचे ,आणि तुझ्या बाबांना तशीच मी आवडायचे तशी राहण्यास सुरुवात करेन..

मधु...अगदीच तसं नाही ग...तुला कधी वाटलेच छान कोणाचा कार्यक्रम आहे, तुमचे गेट टुगेदर आहे तेव्हा तूला वाटेल तशी मेकप करशील, पण रोज हे शक्यतो टाळायला हवे...

आई...करते वाटलं तर तुला घेऊन जा हे मेकप किट, इतके घेतलेच आहे खूप महागडे तर वाया जायला नको म्हणून तू वापर ग.. खूप पैसे घालवले आहे मी यासाठी..

मधु.. तू पण ना आई, फक्त वाया जाऊ नाही म्हणून म्हणतेस घेऊन जा, नको बाई मला मी जशी आहे तशीच खूप आवडते, अगदी खरी खुरी natural ब्युटी...

आई...असू दे बाजूच्या छवी काकुला देईल मी..तिला हेरॉईन दिसायची खूप आवडतं आहे, 45 पार केले तरी 20शीची वाटते...सगळी ह्या मेकपच्या प्रॉडक्ट ची कमाल आहे...


मधु...आई त्या काकूंना मी त्या दिवशी बिना मेकप चे पाहिले तर त्या तुझ्या पेक्षा ही म्हताऱ्या दिसत होत्या ,त्या मानाने तू त्यांच्या पेक्षा ही अजून तरुण आणि देखणी दिसते बर का...

आई...झाले मी मान्य केले ना आता मग का उगाच मस्का मारते...तू आहे हो केली आम्ही 40शी पार, सांगेन मी माझे वय स्वीकारले आहे..आता मला मेकपची गरज नाही..

मधु...ये बात यंग लेडी..

आई...पाडलेच तू मला माझ्या वाढ्यात वयाच्या..आता त्याला लपवण्यासाठी काही उपाय करणार नाही..

मधु...लहानांकडून कडून ही शिकण्यासारखे असते ना आई..

आई...अग कधी कधी मुलीच आईच्या guide होतात, जे आईला समजत नाही ते त्यांच्याकडूनच समजते..हे माझ्या तुझ्या बाबतीत नाही हे सगळ्या आयांच्या बाबती असते..मुलीच डोळे उघड्यात आईचे..आणि हित ही सांगतात आईचे..हो ना..


©®अनुराधा आंधळे पालवे