वृश्चिक

वृश्चिक नक्षत्र माहिती...
वृश्चिक ( Scorpius)
( The Scorpion)
हा मनमोहक तारकापुंज राशीचक्राचा भाग असून आठव्या क्रमांकाची राशी म्हणून प्रसिध्द आहे. यां तारकासमूहचा आकार विंचूच्या नांगी प्रमाणे दिसतो त्यामुळे त्याला वृश्चिक असे म्हणतात.
ऐका ग्रीक कथेनुसार ओरायन शिकाऱ्याला चावलेला हाच तो विंचू. त्याच्याच भीती मुळे आकाशात जेंव्हा वृश्चिकाचा उदय होतो तेंव्हा ओरयान चा अस्त होतो.
भारतीय पुराणांनुसार या तारकासमूहात अनुराधा, जेष्ठा,व मूळ या तीन नक्षत्राचा सामावेश होतो.
या मधील जेष्ठा हा तारा प्राचीन काळापासून प्रसिध्द असून चीन मध्ये याला ( The great fire) तर जपान मध्ये याला (The Drunk Star) असे म्हणतात. या तारकासमूहातच्या निरीक्षणासाठी मे-,जून महीना योग्य. पण यांतील रूपविकारी ताऱ्यांच्या निरीक्षणा साठी मात्र मोठ्या दुर्बिणीची गरज आहे.
१५ एप्रिल ते १५ जुलै दरम्यान येथून हलक्या प्रमाणात उल्कावर्षाव होतो.२० मे रोजी प्रमाण जास्त असते.
- चंद्रकांत घाटाळ
संचालक - अनुजा अवकाश निरीक्षण केंद्र
7050131480

🎭 Series Post

View all