Login

व्रत कोणाचे उपास कुणाला?

उगाच पित्त नको भडकायला नाहीतर आपल्यावर उतरायचं
व्रत त कोणाचे?
गोपाळ रावांनी स्वयंपाक घरात येऊन पाहिल राधाबाई साबुदाणा भिजवत होत्या.
चला सकाळी नाश्त्याला साबुदाण्याची खिचडी मिळणार शेवटी.
चार-सहा दिवसापूर्वी त्यांनी सहज म्हटलं “ खूप दिवस झाले ग तुझ्या हातची साबुदाणा खिचडी नाही खाल्ली, आज कर ना “
“काय बाई तुमच तरी अहो असं म्हटल्याबरोबर होतं का? आधी भिजवून ठेवावं लागतो दोन-तीन तास, दाण्याचा कूट, मिरची कोथिंबीर लागते. पाहते साबुदाणा आहे का पुरेसा ?

नाही म्हणायची छान पद्धत आहे ही! गोपाळराव समजून चुकले.

दुसरे दिवशी सकाळी पाहिलं तो राधा ची कसलीशी तयारी सुरू होती..
“काय चाललंय आज”?
“अहो बाबा आज वटपौर्णिमा आहे ना पूजेची तयारी करतोय.”
सात जन्माचा घाट आहे तयारी तेवढी जोरदार मग आपल्याकडे कोण लक्ष देणार?

स्वयंपाक घरातून खिचडीचा तूपजिरेफोडणीच्या वासाने गोपाळ रावांची भूक चांगलीच चाळवली. मुलगा कामावर निघायचं तयारीत तेव्हा त्याला गरमागरम खिचडी दही देऊन बोळवण केली गेली.
गोपाळराव अंघोळ करून आले. “अगं नाश्ता काय आहे?”
“ हो हो थांबा जरा एवढी पूजेची तयारी करून मग देते.” म्हणत राधा कपडे बदलायला गेली गोपाळा रावांनी वेळ घालवायला पेपर वाचायला घेतला.
साधारण अर्ध्या तासाने राधा पूजेचे ताट घेऊन नटून थटून बाहेर आली बरोबर सून सीमाही…
अ”हो कढईत खिचडी ठेवली आहे घ्याल का प्लीज? आम्ही जाऊन येतो.” म्हणत दोघी पसार झाल्या..
गोपाळा रावांनी स्वयंपाक घरात पाहिलं कढईत थंड झालेली थोडीशी खिचडी दिसत होती आता घ्यावी की हांच्यासाठी राहू द्यावी? दोन घास ताटलीत घेऊन त्यांनी खाल्ली व बाकीची झाकून ठेवली.
साधारण दोन तासाने घामाघुम होत पूजे करी बाया घरी आल्या.
“ काय बाई उकाडा हा नुसता म्हणत बसलेल्या राधाला गोपाळ रावांनी गारेगार सरबत आणून दिलं, उपास करते बायको उगाच पित्त नको भडकायला नाहीतर आपल्यावर उतरायचं,

“तुम्ही नाश्ता केला का?”

“ हो केला,
चला तुमची फर्माईश होती ना कधीची आज म्हटलं करावी पूर्ण झाली न इच्छा पूर्ण?”

अग तुमचा उपास आहे ना मग काय खाणार आहे? भूकी नको राहू हो.”

“नाही ग बाई, सीमा नवीन खिचडी करती आहे आमच्यासाठी, सोबत आंबे, केळी आहेत. तुम्ही जेवून घ्या सकाळीच भाजी पोळी करून ठेवली आहे.
म्हणजे परत खिचडी बनती आहे आली ना पंचाईत? बोललो तर? उगाचच नकोच.

‘आता सांगा मला व्रत कोणाचे आणि उपास कोणाला घडला?