विटाळ ? की आनंदाची अनुभूती? ( भाग 2 )

मधुने राधिकाला मिठी मारली." ताई तुमचे आभार कसे मानू मी ? आज तुमच्यामुळेच सगळं छान झालं .तुम्ही किती भाग्यवान आहात तुम्हाला असं समजून घेणारं सासर मिळालं..."राधिकाच्या डोळ्यात पाणी आलं ..." मी खोटं बोलले मधू ...माझ्याघरी खूपच जुन्या विचारांची माणसे आहेत...पाळीच्या वेळी मला आंधाऱ्या खोलीत राहावं लागतं...घाणेरडी गादी , चादर वापरावी लागते...नीट खायला प्यायलाही देत नाहीत...आणि धुणी , भांडी यासारखी अनेक कष्टाची कामे करावी लागतात...आणि आणि माझ्या पिल्लूलाही माझ्याजवळ येऊ देत नाहीत ग... त्याचं माझ्यासाठी रडणं जीव हेलावून टाकत ....माझी तर या नरक यातनेतून सुटका नाही निदान तुला तरी हा त्रास भोगावा लागू नये यासाठी हा सगळा खटाटोप..." रधिकाचा बांध फुटला होता.मधू ला काहीच सुचेना...
फक्त स्त्रीला मिळणारी मातृत्वाची ही अनुभूती ह्यामुळेच तर मिळते हे तर तू मान्य करतेस ना...अगं आई ही वेळ तिच्यावर ओरडण्याची नाही तर तिची काळजी घेण्याची आहे .आणि प्रत्येक स्त्री यातून जातच असते त्यात लाज कसली ग ? तू तर इतकी मॉडर्न विचाराची आहेस आणि नेमकी याचं बाबतीत इतके बुरसटलेले विचार का ग तुझे ? तीच्याजगी मी असते तर ...?"
राधिकाच्या बोलण्याने गीताबाईना स्वतःच्या विचारांची लाज वाटते आहे असे जाणवत होते पण सासू पणाचा इगो आणि आता सगळ्यांसमोर होणारी आपली नाचक्की यामुळे त्या अजूनही राग धरून होत्या. लेकीचं बोलणं खरंतर मनाला लागलं होतं पण सुनेची इतकी मोठी चूक माफ कशी करायची ? आतापासून असे वागलो तर डोक्यावर बसेल सून ...अश्या बुरसटलेल्या मनोवृत्तीचे काय करणार ?
तितक्यात पूजेच्या पूर्व तयारीसाठी गुरुजी आले...आता काय करायचे ? सूनेकडे एक जळजळीत कटाक्ष टाकून गिताबाईनी गुरुजींना हळूच बाजूला बोलावून परिस्थीती सांगितली...
साने गुरुजी अत्यंत विद्वान आणि आयुर्वेदाचार्य होते...केवळ स्वतःची आवड म्हणून काही जवळच्या लोकांकडे पूजा सांगायला ते जायचे.राधिकाला ते लहानपणापासून ओळखत होते त्यामुळे तिने मागून केलेल्या खाणा - खुणा त्यांना कळत होत्या...
गुरुजी हसले ," गीता ताई काय हो हे ? हा विटाळ पाळणार का तुम्ही ? पूर्वीच्या काळी स्त्रियांना आराम मिळावा म्हणून या चालिरीती होत्या पण आता आपण सगळे किती प्रगल्भ विचारांचे आहोत.यामागचे कारण तर आपण सगळेच जाणतो ना मग त्यासाठी इतकी कुत्सित भावना कशाला ? स्त्री ला देविस्वरुप मानले आहे आपल्या संस्कृतीत ! मग देवीला विटाळ कसा होईल... चला लवकर या सगळे...पूजेला विलंब नको..."
गुरुजींच्या बोलण्याने मळभ दूर झाले... मधुला जवळ घेऊन गीता बाईंनी तिची माफी मागितली आणि तिला तयार व्हायला सांगून त्या स्वतःही तयारीला गेल्या...!
मधुने राधिकाला मिठी मारली." ताई तुमचे आभार कसे मानू मी ? आज तुमच्यामुळेच सगळं छान झालं .तुम्ही किती भाग्यवान आहात तुम्हाला असं समजून घेणारं सासर मिळालं..."
राधिकाच्या डोळ्यात पाणी आलं ..." मी खोटं बोलले मधू ...माझ्याघरी खूपच जुन्या विचारांची माणसे आहेत...पाळीच्या वेळी मला आंधाऱ्या खोलीत राहावं लागतं...घाणेरडी गादी , चादर वापरावी लागते...नीट खायला प्यायलाही देत नाहीत...आणि धुणी , भांडी यासारखी अनेक कष्टाची कामे करावी लागतात...आणि आणि माझ्या पिल्लूलाही माझ्याजवळ येऊ देत नाहीत ग... त्याचं माझ्यासाठी रडणं जीव हेलावून टाकत ....माझी तर या नरक यातनेतून सुटका नाही निदान तुला तरी हा त्रास भोगावा लागू नये यासाठी हा सगळा खटाटोप..." रधिकाचा बांध फुटला होता.
मधू ला काहीच सुचेना...

🎭 Series Post

View all