विश्वासाचं नातं

आपल्या सौंदर्याचा फार गर्व झाला होता तिला, आपल्याला कोणी नाही म्हणू शकत नाही, जे हव ते आपण करू श??

कॉलेजहुन यायला आज ही सखीला उशीर झाला

सखी अग कुठे आहेस? , आईने फोन वर विचारल, 

येते ग आई, तू सारखी फोन करू नकोस, सबमिशन आहे माझं,...... सखी वैतागली, 

घरच्यांशी नीट वागत नव्हती सखी, छोट्या गोष्टीवरून खूप चिडायची, आई उगीच त्रास देते असा समज करून घेतला होता तिने, 

आपल्या सौंदर्याचा फार गर्व झाला होता तिला, आपल्याला कोणी नाही म्हणू शकत नाही, जे हव ते आपण करू शकतो असं वाटत होतं तिला, पूर्ण वेळ मित्र मैत्रिणी कॉलेज क्लास मध्ये घालवायचा ती, कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होती ती, 

बाबांनाहि तिच्यातील बदल कळत होता, त्यांनी आई जवळ तसं बोलूनही बघितलं होतं 

आई वडील स्थळ बघत होते तिच्यासाठी, आलेल प्रत्येक स्थळ ती नाकारत होती, अजून शिकायचा मला असा सुरू होता तिच, 

पुढच्या आठवड्यात कॉलेजची स्टडी टूर जाणार होती, सखी खूप एक्साईटेड होती, त्या निमित्ताने सचिनशी अजून ओळख वाढवणार होती ती, सचिन तिच्याच वर्गात होता, रूबाबदार उंचपुरा सचिन खूप आवडत होता तिला, तिच्या मैत्रिणीने सांगितल सचिन चांगला मुलगा नाही, उगीच टाइम पास करेल तो, सगळ समजून सुद्धा सखी सचिनच्या मागे होती , 

अखेर तो दिवस आला, सगळे बसने स्टडी टूरला जायला निघाले, बस निघाल्या, गाण्याच्या भेंड्या रंगात आल्या होत्या , मुले vs मुली कोणीही माघार घेत नव्हत, सखी प्रत्येक गाणं सचिन कडे बघून म्हणत होती, हे नजरेतून सुटला नव्हत त्याच्या, तो ही तेवढाच प्रतिसाद देत होता तिला, बस मध्ये प्रत्येकाच्या हे लक्षात आला होता, चिडवाचिडवी सुरू झाली होती, 

महाबळेश्वरला पोहोचले ते, सुरेख हिरवा निसर्ग, एका बाजूला उंच उंच डोंगर तर दुसऱ्या बाजूला खोल दरी, अथांग पाण्याचा तलाव, अतिशय शांतता होती, सुंदर निसर्ग सौंदर्य, सुखद गारवा अगदी वेड लावणार होत,  

त्या दिवशी आराम करून दुसर्‍या दिवशी स्टडी टूरची सुरुवात झाली, निसर्गाच्या सानिध्यात खोल दरीत उतरून बॉटनीच्या वनस्पतींची कलेक्शन सुरू झाले, गाईड पूर्ण माहिती देत होता, सगळी मुले माहिती लिहून घेत होते, 

सखीच अजिबात लक्ष नव्हत कलेक्शन मध्ये , तीला माहिती होते की थोडस गोड बोलल की कोणी ही तिला मदत करेन, सचिनकडे तिच पूर्ण लक्ष्य होत , दिवसा स्टडी टूर संध्याकाळी शॉपिंग, फायर कॅम्प असा सुरू होत, 

तीन दिवस लगेच निघून गेले, सचिन सखी खूप छान मित्र झाले, तिला असाच मुलगा हवा होता जिवन साथी म्हणून घरी, वापस गेले की भेटत रहायचे ठरवल त्यांनी ,

सखीला आसमंत ठेंगणं झाल होता, काय करू काय नको असा झाल होत, स्वप्नांच्या दुनियेत होती ती सचिन सोबत , त्यातून बाहेर यायचा नव्हत तिला, 

घरी आल्यावर ती त्याच मूड मध्ये होती, परीक्षा जवळ आली होती, अभ्यासात लक्ष लागायच नाहि तिच, परीक्षा झाली, तिची आणी सचिनचि मैत्री सगळ्यांना माहिती झाली होती आता पर्यंत , 

घरातून स्थळ दाखवले जात होते, सखीने सचिनला लग्नाबद्दल विचारल, 

वेडी आहे का तू? मी कधी तुझा असा विचार केला नाही, तुझ्याकडे एक चांगली मैत्रीण म्हणून बघतो मी, मला पुढे शिकायचा आहे, मी पोस्ट ग्रॅज्युएट झाल्या शिवाय लग्न करणार नाही, पुढचं एडमिशन घेतलय मी... सचिन बोलला,  

सखीच्या पायाखालची जमीन घसरली, माझ्या लग्नाचा बघता आहेत घरचे, काय करू मी आता, तुझ्या वर खूप प्रेम करते मी सचिन 

कर पसंद मुलाला करून घे लग्न ......... सचिन सहज बोलला , 

असा कसा करू मी पसंद? मनापासून तुला आपला मानल आहे , सखी रडवेली झाली होती

हे बघ सखी या गोष्टीचा आता काही उपयोग नाही मी एवढ्यात लग्न करायला तयार नाही, तुला वेळा असेल तर थांब नाही तर कर लग्न, सचिन त्याच्या विचारावर ठाम होता

सखी तुटून गेली होती मनातून, ती तशी घरी आली कोणाशी न बोलता बसुन राहिली, सगळ संपला होत, तिची चूक समजली होती तिला, 

आई वडीलांच ऐकायच ठरवल होत तिने ,मन घट्ट करून आई बाबांना सगळ सांगितल, त्यांची माफी मागितली, बाबानी माफ केलं तिला. 

सखीने सगळ विसरून पुढे जायचं ठरविल, 

राहुलचे स्थळ सांगून आल सखीला, मोठ्या पोस्ट वर होता तो मल्टिनॅशनल कंपनित, घरी आई वडील आणि तो एकुलता एक, घरची परिस्थिती उत्तम, नाव ठेवायला जागा नव्हती, 

बाबांनी सखीला विचारले, सखीने होकार दिला, लगेच लग्न जमल, एका महिन्यात लग्न झाल ही,सखी राहुल फिरून आले, 

मन नव्हत सखीच या लग्नात पण इलाज नव्हता , 

सासू सासरे खूप चांगले होते, अगदी आई बाबा घेणार नाही इतकी काळजी घ्यायचे ते तिची , नवरा बिझी असायचा ऑफिस कामात, रोज वेळ व्हायचा घरी यायला, रविवारी जायचे ते दोघा बाहेर नाटक सिनेमाला , सासुबाई मुद्दाम पाठवायच्या त्यांना तेवढाच वेळ मिळायचा एकमेकांसाठी , 

सखीचा वेळ जात नव्हता, एवढी शिकलेलो काहीही करत नाही म्हणून ती स्वतःलाच दूषणे लावून घेत होती, सासुबाई बोलल्या कर तू नौकरी मी बघेन घरच, 

एका चांगल्या कंपनीत नौकरी मिळाली सखीला , मैत्रिणी खूप मिळाल्या, दोन वर्ष भुरकन उडून गेले, मातृत्वाची चाहूल लागली, पहिले 7 महिने केल काम, नंतर ऑफिस मधुन सुट्टी घेतली, ती माहेरी गेली होती डिलेव्हरी साठी तेव्हा कळल की सचिनच ही लग्न झाल, 

आई बाबा खुप काळजी घेत होते सखीची , तीला मुलगी झाली, अन्वीच्या येण्याने खूप फरक पडला, 

आजी आजोबा आनंदी झाले.. उत्साहित झाले, राहुल वेळेवर घरी येवू लागला , संसारात रमली होती सखी, सगळ जग अन्विच्या आसपास निर्माण झाल होते , एकदम सुखात दिवस जात होते,

अन्वि 6 महिन्याची झाल्यावर सखीने ऑफिस जॉईन केल , सुरळीत सुरू होत सगळ मध्ये माहेरी जावून येत होती ती , दोन वर्ष झाले , 

सकाळी सकाळी बॉसचा फोन आला की एका महत्त्वाच्या प्रोजेक्ट मध्ये तुझी निवड करण्यात आली आहे, आज क्लायंट मीटिंग आहे, लवकर येतं येईल का ऑफिसला? , प्रेझेंटेशन ही बनवून आण, 

मस्त कॉटनची साडी नेसून सखी तयार झाली मुळातच सुंदर होती ती, त्यात वेगळाच आत्मविश्वास आला होता तिला, अजून सौंदर्य खुलली होत तिच 

ऑफिसला पोहचली थोड्या वेळात मीटिंग सुरू झाली , प्रेझेंटेशन साठी सखीला आत बोलावले, समोर सचिन उभा होता तिचा भूतकाळ ज्याला ती विसरून गेली होती...... 

कस बस प्रेझेंटेशन पूर्ण केल अणि वाॅशरूम मध्ये आली ती , 

आता हा कश्याला आला इथे, सगळ सुरळीत सुरू होत माझ, उगीच गैरसमज व्हायचे चांगली नौकरी जायची हातून, विचार करत ती बाहेर आली 

तो पर्यंत सचिन आणि सोबतचे क्लायंट लंचला बाहेर गेले होते, तिथून ते एयरपोर्टवर जाणार होते , 

सखीला बर वाटत नव्हत, ती लवकर घरी निघाली , 

माया तिच्या ऑफिस मधील रिसेप्शनिस्ट ती आली तेवढ्यात , सखी हे घे कार्ड सचिन सरांनी दिल, तुला फोन करायला सांगितल, ओके म्हणून तिने ते कार्ड ठेवून दिल ड्रॉवर मध्ये, 

काय झालं ग सखी गप्प गप्प आहेस राहुल बोलला, काही नाही ठीक आहे सगळ, पण तिच्या मनात वेगळी हुरहूर होत होती, सांगावा की नाही राहुलला? .... समजून घेईन का तो? समजत नव्हते, विचार करता करता कधी झोप लागली ते कळलेच नाही. 

अन्वीच आवरुन तिला शाळेत सोडून सखी ऑफिसला गेली , आज परत प्रेझेंटेशन होता, सचिन आणी त्याची टीम वेळेत आली, नको नको होत असतांना तिने प्रेझेंटेशन दिला, 

तिच्या प्रोजेक्टच सिलेक्शन झाल, लगेच काम सुरू झाल, 

संध्याकाळी पार्टी होती, मी लवकर घरी जाईन या बोलीवर सखी पार्टीत आली , 

सचिन तिची वाट बघत होता, 

Hi सखी..... ओळखत नसल्यासारखी काय करतेस, कशी आहेस तु, किती सुंदर दिसतेस, तो एकदम बोलला , 

सॉरी सर आपण काही म्हटलात का.. सखी बोलली , 

अहो काय म्हणतेस आणी सर वगैरे काय , ओळखत नाही का तू मला, माझा फोन ही उचलला नाहीस तू, अजूनही नाराज आहेस का? , 

नाही सर पण आपण पर्सनल नको बोलूया.... सखी , ऑफिसची पार्टी आहे ही काही प्रोजेक्टच बोलायच असेल तेच बोला, असा बोलून ती तिथून निघून गेली,

काय चाललय सखी क्लायंट शी असे वागतात का?..... सर ओरडले सखीला, 

माझ काही चुकला का सर?...., सखी

हो तू काल पार्टीत Mr सचिन यांच्याशी नीट वागली नाही ते सांगत होते, call him n say sorry right now,..... सर  

ओके सर सखी जागेवर जावून बसली, 

सुमेधा तिची ऑफिस मधील सहकारी तिने विचारले काय झालं ग अशी का बसली आहेस? 

सचिन सर त्रास देता आहेत ग मला, पूर्वी ओळख होती आमची, काय करू समजत नाही,.... सखी ने सुमेधाला सांगितलं

एवढाच ना, कर फोन नीट बोलून घे त्यांच्याशी, 

सखीने फोन लावला, Hello मी सखी..... 

हा बोल सखी.. सचिन  

सखी - I am sorry sir for my yesterday's behavior 

सचिन -Its ok मला काही प्रॉब्लेम नाही 

सखी - प्रॉब्लेम नाही म्हणून सांगितल ना माझ्या बॉसला सगळ

सचिन - तस नाही ग सखी पण तू माझ्याही अशी तुटक वागते ते सहन झाला नाही मला, I really like you, तू म्हणशील तर आपण परत नव्याने सुरुवात करू शकतो 

सखी - नाही सचिन please stop this, मी खूप पुढे निघून आले आता , माझा संसार आहे प्रेमळ नवरा आहे मुलगी आहे , माझ्यासाठी हे प्रकरण कधीच संपलय, be professional, please या पुढे कामाव्यतिरिक्त माझ्याशी इतर विषयांवर बोलू नकोस 

सचिन - सखी please अस म्हणू नकोस I really need you, मी तुला विसरू शकलो नाही, माझ्या त्या दिवशी च्या निर्णयावर मला पश्चाताप होतोय अजून 

सखी - तुझ लग्न झाल ना 

सचिन - हो झालय, एक मुलगा आहे मला 

सखी - मग का मागे लागलाय माझ्या? की तुझा इगो दुखावला मी बोलत नाही म्हणून, कसा ही करून त्रास द्यायच अस ठरवल का तू? 

सचिन - नाही सखी माझ माझ्या बायकोशी पटत नाही, आमचे विचार जुळत नाहीत 

सखी - मग जुळवून घे, सांभाळा तिला आणी स्वताला, लग्न झालाय माझं, आणी मी माझ्या कुटुंबाशी प्रामाणिक आहे, नीट निर्णय घे, मला विसरून जा, बायको सोबत नव्याने सुरुवात कर 

सखीने फोन ठेवून दिला..... 

घरी आली तरी तो विषय सखीच्या डोक्यातून जात नव्हता, दुसर्‍या दिवशी ऑफिस कामात बिझी होती ती, फोन वाजला Hi असा मेसेज आला सचिनचा , दुर्लक्ष केल तिने, परत थोड्या वेळाने Hello असा मेसेज आला, तिला समजत नव्हत काय करावे, लंच ब्रेक नंतर एक मिस कॉल आला, तिने ठरवला होत काहीही झालं तरी मी फोन उचलणार नाही 

सखी घरी आली, रडवेली होवुन बसली होती बेडरूम मध्ये, राहुल आला घरी त्याने बघितल काही तरी बिनसले आहे, जेवताना काही बोलला नाही तो, 

अन्वी झोपल्यावर त्यांने हळूच विचारल सखीला काय झालाय मॅडम? , तशी सखी एकदम रडायला लागली, राहुलने धीर दिला तिला, 

काय झालाय सांगणार का? ,

मी एक गोष्ट सांगितली नाही मी तुला... सखी सांगत होती , माझा एक भूतकाळ आहे, मी ही कधी कोणावर प्रेम केलय, 

सचिन बद्दल बोलते आहेस ना तू,... राहुल 

सखीला धक्का बसला, तुला कस माहिती? , 

तुझ्या बाबांनी लग्नाआधी सांगितला होत मला सगळ, 

मग बोलला नाहीस तू कधी मला काही,... सखी

प्रेम करण काही गुन्हा नाही सखी, I respect your privacy, आता काय झालाय ते सांगणार का?.... राहुल 

हो... सखी बोलली,

सचिन भेटला होता ऑफिस मध्ये, आमच्या नवीन प्रोजेक्टचा क्लायंट आहे तो, दोन तीन दिवसा पासुन येतोय तो ऑफिसला , तो बोलला मला की नव्याने सुरुवात करू आपण, मी खूप बोलले त्याला, की ऑफिसच्या कामाबद्दल बोल फक्त, मला अजिबात आवडत नाही जे चाललं आहे ते

राहुल नीट ऐकत होता,  

तू टेंशन घेवू नकोस सखी , होत अस , मनुष्य स्वभाव आहे, सोडून दे, उद्या तो भेटला की त्याला आपल्या घरी जेवणाच आमंत्रण दे, 

अरे काय बोलतोस तू? नाही, आई बाबांना समजलं तर, मी नाही बोलवणार त्याला घरी ..... सखी बोलली , 

अग ऐक कोणी काही म्हणणार नाही, तू बोलाव त्याला मी करतो सगळ नीट ,.... राहुल 

ठीक आहे पण मला गडबड नकोय, 

विश्वास ठेव माझ्यावर.... राहुल बोलला , 

सखी निश्‍चिंत झाली,

दुसर्‍या दिवशी ऑफिस मध्ये सचिन आला, काम झाल्यावर लंच ब्रेक मध्ये तो सखीच्या टेबल वर आला, 

कॉफी घेवू या का आपण सखी? , 

ती त्याचीच वाट बघत होती, cafeteria त कॉफी घेता घेता सखी बोलली संध्याकाळी ये जेवायला माझ्या घरी आज, 

सचिनला धक्काच बसला एकून, R u sure, घरी कोणी नाही का? , 

नाही रे आहेत घरी सगळे, माझ्या नवर्‍याला भेटायच आहे तुला, 

त्याला माहिती आहे का माझ्याबद्दल? , 

हो... उद्या तुझ काम झालं की तू वापस जाशील तेव्हा आज येवून जा, सखीने आमंत्रण दिलं

ठीक आहे तो बोलला, 

संध्याकाळी तयार होवून सचिन दिलेल्या पत्यावर आला, 

सुंदर बंगला होता, आजुबाजूला छान गार्डन मेंटेन केल होत, चारचाकी गाडी उभी होती, सधन कुटुंब वाटत होत बेल वाजवली, बाबानी दार उघडले, 

या आत, 

सखी अग सचिन आला, सचिन आश्चर्यचकित झाला, बसायला सांगितल त्याला , 

सासुबाई पाणी घेवून आल्या, 

अन्वी चित्रं काढत बसली होती तिथे, सचिनने तिला गिफ्ट आणल होत ते दिलं, 

सखी आणी राहुल आले आतून, 

सखीने ओळख करून दिली, हा माझा मित्र सचिन, कॉलेज मध्ये सोबत होतो आम्ही, तुम्ही बसा बोलत मी बघते स्वैपाकाच, 

आत आली तरी तिची धड धड थांबली नव्हती, 

राहुल आणी सचिन मस्त गप्पा मारत होते, सुरेख स्वैपाक झाला होता, सचिनने सासुबाईनचे आभार मानले, 

मला निघायला हवं सकाळी लवकरची फ्लाइट आहे, 

सखी सोडून ये त्यांना गेट पर्यंत सासरे बोलले, 

तस तिने राहुल कडे बघितल 

अग तु जा, मला अन्वी कडे बघायचा आहे... राहुल मुद्दाम गेला नाही

गेट जवळ टॅक्सी उभी होती, 

मला माफ कर सखी मी वहावत गेलो, तुला बघीतल आणी जुने दिवस आठवले, छान आहेत तुझ्या घरचे, be blessed, टच मध्ये राहू, एक मित्र म्हणून मी बोलु शकतो का तुझ्याशी? ,.... सचिन

कधीही , आणी पुढच्या वेळी आला की ये घरी ,.....सखी

सचिन टॅक्सीत बसुन निघून गेला 

अन्वी झोपल्यावर सखी राहुल जवळ आली, त्याचा हात हातात घेतला, "मला तुझा अभिमान आहे किती छान हॅन्डल केलस तू हे सगळे, मला समजावून घेतल,.... 

Thank you" ,