विसरलास काही तू भाग 1

Visrlas


विसरला काही तू

तो kitchen मधून बाहेर आला...त्याच्या हातात kitchen ऍपरण होते...
आणि ती ऑफिसच्या तयारीत होती...

ती मागेपुढे करत होती.... त्याला समजत होते ही मागे पुढे का घोटमळत आहे...

तो मुद्दाम....तुझी पर्स विसरलीस का ??
गाडीची चावी राहिली का ??
तुला काही हवंय का..? काय हरवलंय नेमकं तुझं

ती.... खूप काही हरवलंय रे...तुला लक्षात नाही असे वाटते....तुला खरंच लक्षात नाही..

तो.... अग होतं कधी कधी...माणूस आहे मी तर विसरायला होत असेल ..पण तू सांगितले तर कळेल...तुला माहीतच आहे तुझा नवरा किती विसरत असतो...आणि तू आठवण करून देत असतेस...मग जर मी काही विसरलो तर तू शहाण्या बायको सारखे मला आठवून दे...

ती.... जोरात पर्स उचलते आणि त्याला सांगते ," जाऊदे तुला आठवले तर ठीक आहे...नाहीतर तू विसर..."

त्याला कपाळावर किस करून निघत असते... आणि मग तो ती गेली समजून kitchen मध्ये परत आपल्या कामाला जातो...

ती परत येते...आणि फुगून सोफ्यावर बसलेली असते...तश्या तो परत बाहेर येऊन बघतो तर ती पुन्हा आलेली असते...

तो... तू अजून ही गेली नाहीस...कधी जातेस यार...उशीर होईल तुला...मग ट्रॅफिक लागेल...मग टेन्शन...की आज सुट्टी तर घेणार नाहीस ना....नाही हा तू सुट्टी अजिबात घेऊ नकोस... एक दिवसाचा पगार वाया घालवू नकोस....

ती.... तुला पैश्याची पडली आहे तर...ठीक आहे मी जाते...पण तुला काही लक्षात नाहीच का ?
काही खास असे राहिले का आठव रे...मग नंतर आठवण आली तर मला घरी परत बोलवशील..

तो... नाही अग, मी काहीच विसरलो नाही...मला चांगलेच लक्षात आहे...कारण आज मला मीटिंग आहे...एका खास व्यक्तीला भेटायला जायचे आहे..

ती... खास व्यक्तीला आजच भेटायला जाणार आहेस का, ?? उद्या गेला तर नाही चालणार का ?? उद्या जा ना...आज नको...आज मी सुट्टी घेऊन घरीच राहण्याचा प्लॅन केला आहे... मस्त सोबत दिवस घालवू...

तो... नको अग... मला त्याला भेटायचे हे महिना भरा पासूनच ठरले आहे...तूच उद्या तुझा आणि माझा प्लॅन कर...हवे तर बाहेरच फिरायला जाऊ..लॉंग ड्राईव्ह...मक्याचे कणीस...थंड गारवा...पडणाऱ्या पावसात माथेरान लाच जाऊ...मस्त आनंद घेऊ...पण आज तू लवकर जा ऑफिस ला... मला ही निघायचे आहे... त्या माझ्या खास माणसाला surprise द्यायचे आहे... तू जा dear...

ती... कमाल आहे रे तू...मी कधी नवत तयार झाले ऑफिस बुडवायला आणि घरी तुझ्या सोबत वेळ घालवायला आणि तू हे असे वागशील असे वाटले नव्हते रे... मला तू घराच्या बाहेर काढतोस.. किती उतावळा झाला त्या तुझ्या माणसाला surprise द्यायला... माझ्यापेक्षा महत्वाचा झाला आहे ना तो तुला... बरं हेच कर तू...मला आज तरी ही अपेक्षा नव्हती....पण हरकत नाही...मी पुन्हा कधीच सुट्टी घेणार नाही...दुष्ट नवरा...

तिला आता ऑफिसमध्ये जायचे नसताना तीने बॅग उचलली आणि निघाली...तेव्हाच त्याला फोन आला...आणि तो ती समोर उभी आहे हे पाहून kitchen मध्ये जाऊन बोलू लागला... ते ही हळूहळू ...तिला न ऐकू येईल असे....

तिला अजूनच वाईट वाटत होते...ह्याने खरंच तिचे मन दुखावले होते...त्याला निदान एक पुसट आठवण ही नाही...निदान विचारावे...विचार करावा...अरे आपली बायको कधी ऑफिस न बुडवणारी आज खुद्द ऑफिस का बुडवते...तिचे काय हरवले... तिचे मन का उदासले... तिला आपला वेळ का हवा असेल?? तिला स्पष्ट म्हणता येत नाही...सरळ व्यक्त होता येत नाही...ती कसली आठवण करून देत आहे वारंवार हे ही कसे ह्या दगडाच्या काळजाच्या माणसाला कळत नाही.... किती वर्षे हेच...आज तरी ह्या वर्षी तरी लक्षात असेल वाटले... मागे दोन वर्षांपूर्वी ह्याच गोष्टी वरून भांडण झाले होते किती....मग कुठे रात्री 12 वाजता दुसरा दिवस लागण्यापूर्वी त्याने सगळे सलेब्रशन arrange केले,कुठून तरी cake मागवला होता.... गच्ची वर जरा lightings लावल्या होत्या... मग पुन्हा propose करून आणि झालेल्या विसरभोळे पणाची कान पकडून माफी मागितली होती...वाटले सोनाराने कान टोचले...आता परत विसरणारच नाही....ह्या दिवसाला दोन महिन्या आधीपासूनच मोबाईल मध्ये save करून ठेवतो की नाही बघच तू... पाढे पाठ करून ठेवावे आणि ते कायम लक्षात रहावे असा हा आजचा दिवस पाठच करून ठेवतो मी......आणि कडक रागवलेली मी पटकन त्याच्या ह्या बोलण्याने हसले... किती तरी वेळ हसत होते.... तेव्हा समजले थोडे रुसायचे ही असते तरच नवरा सरळ होतो... अजून एक कळले की ह्या कमी बोलणाऱ्या नवऱ्याला पोपटा सारखे बोलता येते.....मग ठरवले नाक दाबायचे तोंड आपोआप उघडतेच... मला रात्रभर त्या गार हवेत त्याच्या कुशीत... कधी मिठीत...कधी तो माझ्या कुशीत..कधी मांडीवर डोकं टेकवत ,आणि बोलत तो दिवस साजरा केला होता आम्ही....तो म्हणाला होता...मी तुला ह्या दिवसाचे खास गिफ्ट देईल....पण मी मूर्ख म्हणाले.."राहू दे तू हे केले हेच खूप झाले माझ्यासाठी..." आणि तो ही लगेच पडत्या फळाची आज्ञा समजून गप्प बसला......


तेव्हा तो दिवस आणि आज हा दिवस...कश्याचे काही सोयर सुतक नाही...अजून ही बिनधास्त आहे...मी तरी किती चिडू ,किती रागात त्याला सरळ करू.... असो....नशीब असते काहींचे की, ज्यांचे नवरे त्यांच्यासाठी सीक्रेट पार्टी arrange करतात... फुलांनी घर सजवतात.... सगळे कसे स्वप्ना गत असते...त्यांच्या अंगावर मूठ भर मास चढते....डायरेक्ट /सातवे आसमान पर/ आमचे इतके नशीब कुठे.... चला आहे ते गोड मानावे... दुःखा परी सुख बरे मानावे.... काही असो...तो वेडा आहे हे मात्र पक्के आहे....

तो.../हळूहळू/ त्या व्यक्ती सोबत बोलत होता..."अरे ती अजून इथेच आहे... ती गेली की येतो लगेच\"च मी.. तू मात्र तुझ्या प्लॅन साठी तयार रहा...."

ती ऐकत होती...काही तरी त्यांचे planning असेल...ते तरी कश्याला मला सांगेल हा... मी उलट अडचण नको त्यांच्या मते...मग अगदी निघून जाते...त्याला न सांगता...पण तरी फोन try करते...पण किती तरी वेळ त्याचा फोन busy लागत होता.... पुन्हा पुन्हा try करून ही busy... काय निदान बोलायचे वाटले तर busy...

तो..... गेली ती...आता तुम्ही सगळे या घरात... ती आता बहुतेक तासात किंवा दोन तासात येईल...मी केक तयार नाही केला ती होती म्हणून...पण मी ऑर्डर केला आहे...तिला आवडतो म्हणून बकलावा ही मागवला आहे... आणि एक रेड वाईन....बाकी तुम्ही arrange करायचे आहे...ते ही एकदम परफेक्ट हवंय...तिच्या old memories... तिचे लहानपणीचे फोटो.... कॉलेज चे फोटो....लग्न जमले तेव्हाचे फोटो....लग्नाचे फोटो असे सगळे मिळून एक ऑडिओ विडिओ हवाय....तिला तो आत्ता पर्यंतचा बेस्ट surprise द्यायचा आहे...तिला आज कमालीचा त्रास दिला आहे... ती स्ट्रेस घेते हे माहीत असून ही हे धाडस केले आहे मी....तिचा चेहरा बघवत नव्हता रे....


त्यांची मस्त तयारी झालेली होती...घरात lightings.... बलूनस पसरवले होते.... एका table वर केक....एकीकडे हँगिंग बलून...आणि सगळ्या lights ऑफ केल्या होत्या... तिचे आई बाबा....सासू सासरे आले होते.... तिला काही खबर नव्हती घरी काय वाढवून ठेवले आहे... स्वप्न पूर्ण होणार होते....

ती आज ऑफिस ला गेली नव्हती...तर ती त्याच्या साठी खास खरेदी करत होती...त्याच्या आवडीचे ice cream घेतले होते... त्याच्यासाठी wrist watch घेतले होते ,त्यात तिचे 2 तास सहज निघून गेले होते.... तिला आता ही घरी जायची ओढ लागली होती...त्याचा फोन येईल ही आशा होती...आणि फोन करून म्हणेन ,चल तुझ्यासाठी cancle केले मित्र आणि त्याची भेट...चल आपणच जाऊ कुठे तरी दूर...भले ही नेहमी सारखे माथेरान असो किंवा महाबळेश्वर असो...पण त्याने घेऊन जावे... पण फोन काही वाजला नाहीच...ती आता घराकडे निघत होती...विचार केला...चल मीच फोन करते...


तिने फोन करण्यासाठी ,बॅगेतून फोन काढला तर त्याचे किती तरी कॉल येऊन गेले होते... अर्धा तास झाला होता कॉल येऊन...तिने फोन vibrate वर टाकला होता चुकून ,आणि ते आत्ता कळले...लगेच त्याला पटकन कॉल केला...

"अरे काय ,काय झाले ,किती हे कॉल तुझे...काही प्रॉब्लेम झाला का ?? मी घाबरले
ना.."


काय झाले असेल...काय असेल तिची अवस्था हे त्याने केलेल्या surprise ला बघून...पाहू पुढच्या भागात


क्रमशः....???

🎭 Series Post

View all