विस्मृती भाग - ७

विस्मृती......भावनांची गुंतागुंत.....

भाग - ६ 

https://www.irablogging.com/blog/vismrutibhag-6_9707

           विस्मृती

भाग - ७ 

प्रिय, विधीता 

        आज हा पत्राचा थाट मुद्दामहून घातलाय. कारण मला तुला काहीतरी सांगायचयं. आता तु म्हणशील हे मी भेटले होते तेव्हा का नाही सांगितल मी? किव्हा मोबाईलवर का नाही? पत्रच का?? तर मला समोरासमोर बोलण नाही जमलं असतं कदाचित आणि मोबाईलवर सांगण्यापेक्षा पत्रच बेस्ट वाटलं मला. कारण हृदयातल्या काही गोष्टी शाईच्या रुपात कागदावर फार छान उमटतात. म्हणून हा थाट…

         आपली पहिली भेट तुला आठवतेय? एका पुस्तकाने आपली ओळख झाली. मग घट्ट मैत्री….. आणि त्यापुढेही खूप काही… तुला एक सांगू माझी ईच्छा होती माझ्या बायकोने म्हातारपणी माझ्या बाजूला बसून पुस्तकं वाचून दाखवावी. ती माझी इच्छा तु पूर्ण करशील का?? उत्तराची आतुरतेने वाट पाहतोय. भेटल्यावर बोलू….....

                                                        तुझा,

                                                       विक्रांत

       पत्र वाचून ती चाटच पडली. त्याच तिच्यावर प्रेम आहे हे तिला तसं जाणवायचं पण हा अजून बोलत का नाही हा प्रश्न तिला सतत पडायचा. आणि आज त्याने चक्क असं विचारवं…! तेही थेट लग्नसाठीच..! तिला आनंद गगनात मावेनासा झाला होता. तिला मोठ्याने त्याच नाव ओरडूस वाटत होतं. पण ते शक्य नव्हत कारण ती आता घरात होती. त्यात ती काय एकटी नव्हती तिचे आई- बाबाही होतेच कि..

       मागच्या वेळी ठरलेल्या दिवशी अगदी ठरलेल्या वेळेत आणि ठिकाणी ते दोघं भेटले. पण ह्यावेळी कोणताही फोन न करता चक्क. तो केव्हापासून तिची वाट बघत होता. नेमका तिलाच उशीर झाला. ती त्याला लांबूनच दिसली तिचा चेहरा पडलेला होता. ती आल्यावर त्याने तिला विचारलं "काय ग काय झाल? माझ काही चुकल का?? तुला आवडलं नाहीयेय का मी असं विचारलेल. हे बघ स्पष्ट सांग... मला नाही वाटणार काही?.."   "हो म्हणजे हे मी तुला आधीच सांगायला हवं होत. पण माझी हिम्मतच होत नव्हती. म्हणजे…" ती चेहरा पाडून म्हणाली.  "काय…….??" तो हताश होत म्हणाला. "मला पण तुला पुस्तक वाचून दाखवायला खुप आवडेल." ती मोठ्याने हसत म्हणाली. तो तिचा हात हातात घेवून म्हणाला "म्हणजे तुझा हो आहे…! यस! यस! यस…!" तो मोठ्याने ओरडत नाचत म्हणाला. त्याच्या आनंदाचा तर पारावरच राहिला नव्हता. तो दिवस त्यांच्यासाठी फार खास होता. त्यांनी तो दिवस छानपैकी साजरा केला.   

         थोड्या दिवसांनी तिने घरीही सांगितल. वडील नेहमीच तिच्या पाठीशी होते. त्यांचा विश्वास होता विधीताने निर्णय घेतलाय म्हणजे विचार करून निर्णय घेतला असेल. पण आई थोडी काळजीत होती. मुलाच स्वतःच गावात घर होत, चांगला शिकलेला होता. फार्मसी मध्ये शिक्षण झाल होत. त्याचा उपयोग तो आपल्या शेतीसाठी करत होता. पण त्याचे आई-वडील तो लहान असतानाच वारले होते. त्याला त्याच्या आतेने वाढवल होत. ती गेली पण त्याला स्वतःच्या पायावर उभ करून गेली. आता तो एकटच राहत होता. आईला हे थोड खटकत होत. बाबांनी तिची खूप समजून काढली  "नियतीपुढे कुठे कोणाच चालत का कधी? तो अनाथ झाला ह्यात त्याची काय चूक? बर तो संस्कारी आहे, जबाबदार आहे, आपल्या मुलीवर खूप प्रेम करतो मग अजून काय हव??" ही वाक्य ऐकल्यावर आई कदाचित थोडी नरम पडली. आईने विक्रांतला भेटायला बोलवलं. विक्रांत विधीताच्या आई-बाबांना भेटायला घरी आला. त्या दोघांनाही त्याचा स्वभाव फार आवडला. त्यांना खात्री पटली कि आपल्या मुलीला हा नेहमी आनंदी ठेवेल. पुढे काही महिन्यात त्यांच लग्नही झाल.  अगदी मोजक्या नातेवाईकांमध्ये, साध्या पध्दतीने आनंदात पार पडलं. आई-बाबांना त्यांची  एकुलती एक मुलगी घर सोडून माहेरी जात होती. त्यांचे अश्रू अनावर झाले होते. पण मुलीला रडताना बघून त्यांनी ते आवरले. तिची आनंदाने पाठवणी केली. 

          त्या दोघांच्या आयुष्याला आता खऱ्या अर्थाने नविन सुरुवात झाली होती. त्यांचा सुखी संसार सुरु झाला होता. नेहमी आपण ऐकतो कि लग्न झाल्यावर नव्याची नवलाई संपली कि नवरा-बायकोच  प्रेम आटत जात. पण त्यांच प्रेम खुलत चाललं होत. अजून गाढ  होत चाललं होत. ती आता प्रसंगी त्याची आई, बाबा, मैत्रीण, बायको अश्या नात्यांच्या भुमिका बजावत होती. असाच त्यांचा सुखी संसार चालत असताना अचानक…..... ती भानावर आली. ती रडत होती. तिचे अश्रू थांबतच नव्हते. आणि तिला रागही येत होता. भानावर आल्यावर तिला रेकॉर्डरमधला आवाज ऐकायला आला.

( गाण संपल होत.)

 - वा किती गोड गातेस ग तु. आता परत कधी तु गाशील कोणासं ठावूक म्हणून मी एक गंमत केलीय. 

- काय?

- हे सगळ मी रेकॉर्ड केलय. ( खोडकरपणे हसत म्हणाला) 

- काय तु पण ना पहिल बंद कर तो रेकॉर्डर. Please! 

( ती हसत त्याला विनवत होती) 

तेवढ्यात रेकॉर्डर बंद होतो. ती रडत तिथून उठून स्वयंपाकघराचा मागचा दरवाजा उघडुन बाहेर गेली. तेवढ्यात समोर तो उभा असतो. गावात आल्यापासून तो आपला चेहरा तिच्यापासून लपवत होता. पण आज चक्क तो समोर उभा होता तिच्या. पण त्याच्या चेहऱ्यावर काही भाव नव्हते. त्याचा चेहरा निर्विकार होता. तो तिच्याकडे नजर न मिळवता मान खाली घालून उभा होता.

क्रमशः

🎭 Series Post

View all