विस्मृती भाग - ६

विस्मृती..... भावनांची गुंतागुंत....

भाग - ५  

https://www.irablogging.com/blog/vismrutibhag-5_9576

            विस्मृती

भाग - ६ 

     विधीता आज ज्या वाटेने जात होती ती वाट तिच्या ओळखीची होती. खूप आठवणी जडल्या होत्या त्या वाटेवर तिच्या. ती त्याच्याकडे जात होती. शेवटी तिला झाडांच्या गर्दीत तो एकटा छोटासा वाडा दिसला. वाड्याच्या जीर्ण झालेल्या गेटने उघडताना करकरत आवाज केला. गेट उघडून अंगणात येताच तिच लक्ष एका झाडने वेधलं. ते पारिजातकाच झाड होत. अंगण जरी ओल्या-सुक्या पाचोळ्याने भरलं असलं तरी पारिजातकाच्या फुलांनी अंगाणाच्या छोट्याश्या भागाची का होईना शोभा जपून ठेवली होती. त्याचा सुगंध तिला इतकी वर्ष इथे येण्यासाठी साद घालत असावा. ती पुढे जाणार इतक्यात सुकलेल्या तुळशी वृंदावन बघून तिचे डोळे भरुन आले. तीने त्यावर मायेचा हात फिरवला पण अचानक भानावर याव तसं तिने आपले डोळे पुसले आणि ती घराच्या दरवाज्याजवळ गेली. घर अगदी पोरकं दिसत होतं जस त्याला कोण वालीच नव्हता. इतके वर्ष बंद असल्याने कदाचित ते त्याच्या वयापेक्षा अधिक वयस्कर दिसत होत. तिने दरवाज्याला लावलेल कुलूप फोडण्यासाठी हातात दगड घेतला. पण कुलूप तर आधीच तुटलेल होत. तिला खात्री होती तसचं झाल होत. तीने दरवाजा ढकलून आतमध्ये पाऊल टाकल. आतमध्ये घरात बघून असचं वाटत होत कि कोणाचातरी इथे वावर आहे. सगळ अगदी व्यवस्थित , टापटीप होत. ती सगळं न्याहाळत होती. जे घर ती आधी सोडून गेली होती सगळं अगदी तसचं होत. ती ओसरीतुन ओटीवर गेली. तिथे टेबलावर परडीत नुकतीच पारिजाताची फुल काडून ठेवली होती. ते बघून तिला खात्रीच झाली तो इथेच आहे. ती मोठ्या आवाजात म्हणाली "मला माहितेय तु इथेच आहेस. तुला काय वाटलं मला कळणार नाही! का? का असा त्रास देतोस मला?? समोर का नाही येत आहेस? हा लपंडाव का? तुझं म्हणणं तरी काय आहे?" ती त्याला मोठ्यामोठ्याने हाक मारत होती. त्याला बोलवत होती. घरभर सैरभैर फिरत होती. मजघरातुन मागच्या बाजूला असलेल्या स्वयंपाकघरात आली. तेवढ्यात तिला मागून कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज आला. ती दचकली. तीने झटकन मागे बघितल. मागे कोणीच नव्हत. तो आवाज मागे असलेल्या खणात (भींतीच्या) ठेवलेल्या टेप रेकॉर्डरमधून येत होता. 

- "अगं गा ना!"

- "नको अरे माझा आवाज काय इतका चांगला नाहीयेय. नको अरे!" (हसून)

- "असं करतेस तु. माझी शप्पत आहे तुला. गा बघू."

- "तुझ हे नेहमीचं आहे. शप्पत घालून काम करून घेण. 

- म आता काय करणार तु?" ( मिस्किलपणे हसत)

- "आता काय गावचं लागणार मला…!"

- "तु एकटी नाहीयेस हो माझी बासरी तुला साथ देईल हो."

- "तुझ्या बासरीसमोर तर मी माझा आवाज फिकाच पडेल. तु बासरी वाजवायला लागलासं कि मला कृष्णच भासतोस तु" (प्रेमाने)

- "असं का? म ह्या कृष्णासाठी थोडसं गावु पण नाही शकत का तु?" (लाडात)

- "बर बर गाते गाते. तु बासरी वाजवायला सुरुवात कर."

(मग बासरीच्या साथीला आवाज ऐकायला येतो)

"सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच गीत गात आहे 

अजुनही वाटते मला कि अजुनही चांदरात आहे……."

       गाण ऐकता ऐकता विधीता आपल्या भुतकाळात गेली. तिची त्याच्याशी पहिली भेट एका पुस्तकाच्या दुकानात झाली होती. कॉलेज संपल्यावर ती आपला  पुस्तक वाचण्याचा छंद पूर्ण करत होती. तिच्या आवडत्या लेखकाचं पुस्तक नुकतचं बाजरात आलं होतं आणि त्याच्या प्रती संपायच्या आत तिला ते खरेदी करायचं होत. ती घाईघाईने दुकानात गेली. "एक शेवटची प्रत होती. पण आताच ती एका मुलाने विकत घेतलं. आता पुस्तकं मागवलीत अजून १४-१५ दिवसात येतील. पण तुम्हाला आताच हवं असेल तर तुम्ही त्या मुलाशी बोला." असं तिला दुकानदाराने सांगितलं. तिचा मुड ऑफ झाला कारण तिला ते पुस्तक आताच वाचायचं होत. तिच्या मनात विचार आला. आपण एकदा त्या मुलाशी बोलून तरी बघूया. बघु तरी काय म्हणतोय. नाही म्हणाला तर नाही. ती त्या मुलाजवळ गेली. तो दुकानात इतर पुस्तक बघण्यात व्यस्त होता. "अहो एकता का.! मला तुमच्याशी काहीतरी बोलायचयं." ती त्याच्या मागे उभ राहून बोलत होती. "हा बोल ना बाळं!" तो पुस्तक चाळत मागे न वळताच म्हणाला. "बाळ?? ह्याला मी काय बाळ वाटते. वाटतोय तर हा  २५-३० वर्षाचाचं. जावुदेत आपल्याला पुस्तक भेटल्याशी मतलब आहे." ती मनातल्या मनात म्हणाली. "अहो तुम्ही आताच केशरकरांच एक पुस्तक खरेदी केलत अस मला कळलं. म्हणजे मी त्यांची खूप मोठी फॅन आहे. मला त्यांच लिखाण खूप आवडतं. आणि तुम्ही घेतली ती शेवटची प्रत होती. आता १०-१५ दिवसांनी पुस्तक येणार आहेत. मी खूप दिवस ह्या पुस्तकाची वाट बघत होते. म्हणजे तुमची काही हरकत नसेल तर हे पुस्तक….म्हणजे मी २ दिवसात वाचून तुम्हाला परत करेन अगदी व्यवस्थित. चालेल का???" एका दमात सगळ बोलून ती त्याच्या उत्तराची वाट बघत होती. तो आपली २-३ पुस्तक हातात घेवून मागे वळला आणि तिला बघताच मोठ्याने हसायलाच लागला. तिला प्रश्नच पडला हा असा का हसतोय? ती रागात त्याला म्हणाली "हसायला काय झाल? मी काय चंपक मधला जोक मारला का?" तिला राग आलेला बघून तो म्हणाला "अच्छा म्हणजे हा खरा आवाज आहे तर! मघाशी मला वाटलं माझ्याशी १०-१२ वर्षाची बोलतेय. मागे वळून बघितल्यावर मला कळलं…सॉरी बरं का!" तो हसत म्हणाला. "अहो असुदेत ठिक आहे. पण चुकी तुमची होती म्हणून मी चिडले." ती  त्याला पटवून देत म्हणाली. तो म्हणाला "अगं हो हो मी कुठे नाही म्हणतोय. बरं तु हे पुस्तक घेवून जा. मी २ दिवसात तर नाही पण पुढच्या आठवड्यात येईन. तेव्हा हे पुस्तक दे मला. ह्याच दुकानात भेटू पण कधी येईल कसं सांगू म्हणजे मला यायला जमेल तसं…"  "तुमचा मोबाईल नंबर द्या. मला म्हणजे तुम्ही मला सांगु शकाल. चालेल ना?" तीने त्याला विचारलं. "अगं मग काय चालेल ना. माझ्या हे मनात आलं होत पण तुला चालेल का? म्हणून मी काही बोललो नाही." तो म्हणाला. त्याने तिला नंबर सांगितला. नाव सेव्ह करताना ती त्याला म्हणाली "अहो तुमच नाव मी मघापासून विचारलच नाही. माझ नाव विधीता. तुमच?"  "अरे हो माझ नाव विक्रांत. मला अरे तुरे केलस तर जास्त आवडेल. अहो जाहो नको. तसही आपण जवळपास वयाचे असू असं मला वाटतयं. तुझ वय काय? म्हणजे मुलींना वय सांगायला आवडत नाही. बघ म्हणजे तुला सांगायच असेल तर सांग." तो मस्करीत हसत म्हणाला. "माझ असं काही  नाही. वय नाही सांगितलं तर ते काय वाढायचं थांबणार आहे का? मला हे नाही पटत. माझ वयं २२ आहे. तुमच? अरे सॉरी तुझ?" ती स्वतःच मत मांडत विचारते. "माझ २७. तुझे विचार इतरांपेक्षा वेगळे आहेत ही एक गोष्ट मला आवडली. ऐक चलं आता मी जाते. बस आहे माझी ५ ची." तो हातातल्या घड्याळाकडे बघत तिला म्हणाला. "कुठे राहतोस तु?" तिने विचारलं.  "मी राजापूर ला राहतो. बर चल बोलू नंतर. चल येतो." असं म्हणत तो घाईघाईने चालू पडला. तिने त्याचा निरोप घेतला.  त्याला पाठमोरा बघताना त्याने जावू नये थांबाव असं उगाचचं तिला वाटत होतं. पण तो गेला होता. तीही घरी पोचली. पण तिला तोच आठवत होता.  बॅगमधून तिने पुस्तक बाहेर काढल आणि घडलेल सगळ तिला आठवलं अगदी त्याने तिचं केलेल कौतुकही . ती गालातल्या गालात हसली. तिच्या नकळत तिच्या मनाला तो भावला होता. ती आल्यापासून त्याच्याच विचारात होती. तिला मॅसेज करायचा होता त्याला पण तिने नाही केला. इतक्यात त्याचाच मॅसेज आला. तिच्या आनंदाला तर पारावारच उरला नाही. ती दोघं  एकमेकांशी अगदी जुनी ओळख असल्यासारखं बोलायला लागले. पुढे अश्याच त्यांच्या भेटीगाठी होत राहिल्या. खूप गप्पा होवू लागल्या. त्यात अनायसे मनातल्या गोष्टी एकमेकांशी शेअर करणही झालाचं. ती त्याच्याबद्दलच्या गोष्टी जाणून घेवू लागली.... तिला त्याला जाणून घ्यायच होत…...... त्याला समजूत घ्यायच होत…. त्याच्यावर मनभरुन प्रेम करायचं होत. होय….....! ती नकळत त्याच्या प्रेमात पडली होती. कुठेतरी तिने वाचलं होत कि 'प्रेम हे सांगता येत नाही ते अनुभवायचं असतं ह्याची तिला प्रचीती येत होती.' त्याच्या मनात काय असेल? पण त्याचही असं होत असेल का? त्यालाही तेच वाटत असेल ना जे तिला वाटतयं त्याच्याबद्दल? असे अनेक प्रश्न तिच्या मनात येत असत. असेच तिच्या आयुष्यातले हे सुंदर क्षण ती जगून घेत होती. आज पुन्हा एकदा अशीच एक भेट झाली. विनाकारणच म्हणा. तिला नेहमीच त्याची खूप आठवण येत असे. आपली पुन्हा भेट कधी होतेयं याची ती वाट बघत असे. अशीच एकदा विनाकरणच त्यांची भेट झाली. त्यांनी एकमेकांशी खूप गप्पा मारल्या. खूप वेळ घालावला. जाण्याची वेळ कधी आली तिला कळलचं नाही. जाताना त्याने तिला एक पुस्तक दिल "हे वाच खूप छान आहे आणि कसं वाटलं ते सांग मला... मोबाईलवर नाही हा! भेटून सांग. मी परवा एका कामासाठी येतोय तेव्हा भेटू." तो गोडसं हसू चेहऱ्यावर आणत म्हणाला. ते पुस्तक देताना त्याच्या डोळ्यातले भाव वेगळेच होते. तिला ते जाणवले. त्यांनी एकमेकांचा नाईलाजाने निरोप घेतला. ती घरी आली. आईने तिच्या आवडीचे उकडीचे मोदक केले होते. पण नंतर खाते असं सांगत ती आपल्या खोलीत गेली. आईलाही  आश्चर्यच वाटल असाव. आज उकडीच्या मोदकापेक्षा त्याने दिलेल पुस्तक तिला वाचायच होत. "असं काय होत त्या पुस्तकात जे कसं वाटलं? हे भेटूनच मी सांगाव असं त्याला वाटतयं...???" ती स्व:ताशीच म्हणाली. तिने ते पुस्तक घाईघाईने घेताना ते तिच्या हातातून पडल. ते उचलत असताना तिला त्यातून एक वहीच दुमडलेल पान बाहेर आलेला दिसला. पुस्तक बाजूला ठेवून तिने ते पान उघडलं. चक्क त्याने तिच्यासाठी पत्र लिहिल होत. तिच्या हृदयाची धडधड वाढू लागली. तिने ते पत्र वाचायला सुरुवात केली.

क्रमशः

🎭 Series Post

View all