विस्मृती भाग - ४

विस्मृती.....भावनांची गुंतागुंत....

विस्मृती भाग 3

https://www.irablogging.com/blog/vismrutibhag-3_9342

            विस्मृती

भाग - ४ 

     "विधीता...विधीता..विधीता....विधीता…!" ,अवनीने तिला हाक मारली तशी ती खूप भानावर आली. "अगं लक्ष कुठेय तुझ? आम्ही किती हाक मारऱ्या दुकानातून तुला?", स्वाती म्हणाली. "नाही कुठेच नाही. हे बघा मी काय घेतलं!", विधीता विषय बदलत म्हणाली. दोघींनाही मूर्ती फार आवडली. "वाह..! खूपच छान आहे ग मूर्ती.", अवनी म्हणाली. घरी यायला उशीर झाला म्हणून अवनीला मामाचा कॉल आला तश्या त्या घरी जायला निघाल्या. दुपारच मस्तपैकी अगदी गावच्या पद्धतीने जेवण झाल. "ऐका! आपण संध्याकाळी एका तलवाच्या इथे फिरायला जावुया का?" अवनी दोघींना म्हणाली. 

      दुपारी आराम करून ठरल्याप्रमाणे त्या तिघी त्या तलावाजवळ गेल्या. तलाव फार मोठ होतं. त्याची बांधणी पुरातन काळातली वाटत होती. आजूबाजूला असलेली वेगवेगळी झाडं- वेली त्यामुळे ते अजूनच आकर्षण वाटत होतं. गेल्या गेल्या तिथे अवनी आणि स्वातीचा सेल्फि सेशन सुरु झाला. विधीताला त्यात फारशी आवड नव्हती म्हणून ती तलावाच्या आजूबाजूचा परिसर फिरु लागली. फार ओळखीच वाटत होत तिला ते तलाव. ते वातावरण खूप छान होत. पण का कुणास ठावूक तिथे गेल्यापासूनच तिच मन अस्वस्थ होऊ लागल. म्हणून ती आजूबाजूला परिसरात मन रमवण्याचा प्रयत्न करत होती. पुढे थोड लांब एक लहानसं देऊळ दिसत होतं. ते शंकराच देऊळ आहे अस अवनी तिला म्हणाली होती. देवाच दर्शन घ्याव म्हणून ती देऊळाच्या दिशेने जात असताना तिला देऊळातून बाहेर पडताना कोणतरी माणूस दिसला. तो तोच होता ज्याच्याशी तिचा सकाळी धक्का लागला होता. तो बासरीवाला…! तिने त्याला लांबूनच ओळखल. तो जात होता पण तिला त्याला गाठायच होतं. त्यामुळे ती जवळजवळ धावतच सुटली "अरे ए थांब…….ए अरे.." तीने खूप हाक मारली त्याला पण तो निघून गेला होता. ती देऊळाजवळ पोचली पण तो आजूबाजूला कुठेच नव्हता. गायब झाल्यासारखा. ती दम खात त्याला सगळीकडे शोधत होती. तिला धावताना बघून मागून अवनी आणि स्वातीही थोड्याच वेळानी तिथे पोहोचल्या. स्वाती म्हणाली, "काय ग? काय झालं? तु अचानक धावत का सुटलीस?? आणि कोणाला हाक मारत होतीस???" विधीता दमून एका पायरीवर दम खात बसली पण स्वातीने मात्र तिच्यावर प्रश्नांचा भडिमार सुरु केला होता. विधीताला थोड बर वाटलं तेव्हा ती स्वातीला म्हणाली, "अगं मला तो परत दिसला. म्हणजे सकाळी दिसला होता. पण गर्दीत कुठे निघून गेला कोणास ठावूक? आताही दिसला. मी त्याला थांबण्यासाठी हाक मारत होते. पण तो आताही कुठेतरी गायब झाला. मला त्याला भेटायच होत." विधीता आतूर होवून म्हणाली. स्वाती आणि अवनी एकमेकींकडे आश्चर्याने बघायला लागल्या. अवनी म्हणाली, "एक मिनीट तु कोणाबद्दल बोलतेस? कोण आहे हा? जो तुला सकाळी दिसला आणि आताही??? तुझ्या कोणी ओळखीचा आहे का?"  "अगं तो…ओळखीचा असं नाही पण मी बघितलयं त्याला कुठेतरी म्हणजे कसं सांगू…अगं म्हणजे.." विधीताला काय बोलावं हेच सुचत नव्हतं. "आपल्या तिघींशिवाय इथे कोणीही नव्हतं अगं. कोण असतं तर आम्हाला पण दिसलं असतच ना?" ,स्वाती म्हणाली. "म्हणजे तो फक्त मलाच..",विधीता थोडी घाबरत गोंधळलेल्या अवस्थेत पुटपुटायला लागली. हे बघून अवनी विधीताला म्हणाली, "अगं असं नाही काही आम्ही सेल्फि काढण्यात एवढे गुंग होतो ना त्यामुळे आम्हाला एक काय चार-पाच माणसं असली तरी दिसली नसती. होय कि नाय ग स्वाती?",अवनी स्वातीचा हात दाबत बोलली. स्वातीही अवनीच्या सुरात सुर मिळवून बोलली, "अगं होय. खरच असच असणार अगं. आम्ही वेगवेगळ्या पोझ ने फोटो काढण्यात बिझी होतो. त्यामुळे मला कोणी दिसलं नसेल. पण अवनी एक सांग कोण होता कोण तो?? जो मागे लागलाय तुझ्या. तुला तो बघितल्यासारखा पण वाटतोयं.  हु...हु...हु.. कुछ तो गडबड है…? बघितलसं अवनी विधीताने गावात येवून काय प्रगती केलीय.."स्वाती विधीताला चिडवण्याच्या स्वरात म्हणाली. विषय दुसरीकडेच जात होता हे बघून विधीता विषय संपवत बोलली, "असं काही नाही मला त्याला कुठेतरी बघितल्यासारख वाटलं बस..! बाकि काही नाही. आता मला तो परत दिसला कि त्याला तुझ्या मागे लागायला सांगते हा…! चला आता काळोख पडतोय." विधीता मिस्किलपणे हसतं म्हणाली. तिघीही मोठ्याने हसायला लागल्या.

क्रमशः

🎭 Series Post

View all