विस्मृती भाग - 3

विस्मृती..... भावनांची गुंतागुंत..

                   

भाग -२ 

https://www.irablogging.com/blog/vismrutibhag-2_9271

 

          विस्मृती

भाग - ३ 

     तिघीही फ्रेश होवून कृष्णाच्या देवळात जायला निघाल्या. देऊळ फार छान आणि अगदी भव्य होत. देवळाच्या कळसावर केलेलं बारीक नक्षीकाम गाभाऱ्यातील मूर्ती अगदी लक्ष वेधून घेणारी होती. देऊळच्या खांबांवर कोरलेल्या श्रीकृष्णाच्या बाललीला मन मोहून टाकत होत्या.  देवळात जाताना मामाने दिलेली फुलं त्या आणायला विसरल्या. तेवढ्यात विधीता अचानक म्हणाली, "त्या देवळाच्या उजव्या बाजूला पारिजाताच झाड असेल. तिथे जावुया चला.' त्या तिथे गेल्या खरचं तिथे पारिजाताच झाड होत. त्या दोघीनाही आश्यर्य वाटलं. स्वाती म्हणाली, "तुला कसं कळलं ग?" स्वातीच्या ह्या प्रश्नाच विधीताकडे काय उत्तरच नव्हतं कारण तिलाच कळल नाही हे कि आपल्याला कसं माहित होत. ती वाक्य तर आपणहून तिच्या तोंडातून निघालीत. "अग मी असचं अंदाज बांधला." ,ती काहीतरी बोलायच म्हणून बोलली. त्या तिघी फुलं घेवून देवळात गेल्या. श्रीकृष्णाच्या ती सुंदर, शांत, प्रसन्न अशी मुर्ती मनाला जणू दिलासाच देत होती कि सगळं काही ठिक होईल. देवाच दर्शन घेताना त्या तीघीही अगदी भारावून गेल्या. दर्शन झाल्यावर त्या देऊळ आणि आसपासचा परिसर फिरत होत्या. फिरत असताना परत विधीताच्या मनात तेच विचार येवू लागले. "आपण इथे आधी आलोय. पण कधी? हे गाव, हे देऊळ, गाभाऱ्यातली लक्ष वेधून घेणारी कृष्णाची मुर्ती हे सगळ किती ओळखीच असल्यासारख वाटतयं. बास किती विचार करशील विधीता." असं म्हणत तिने स्वत:ला थांबवलं. 

     देवदर्शन झाल्यावर त्या गावाच्या बाजारपेठत जाणार होत्या. ती बाजारपेठ मातीच्या वस्तुंसाठी प्रसिद्ध होती. अगदी शहरातही ह्या वस्तूंना मागणा होती. त्या तिघी चालत असताना एक म्हातारी बाई येत होती. ती विधीताकडे बघत हसतच येत होती. विधीताही तिच्याकडे बघून हसली. जशी काय जुनी ओळखच आहे तिची असं. ती म्हातारी बाई जवळ आली तशी तिने विधीताला आपुलकीने विचारलं, "बाय तु वृंदा ना? कसा  हायस? किती वर्षांनी आलसं. आता तब्बेत बरी हाय ना तुझी? मी पण काय विचारत बसलयं. बराच असणार ना तु. तुझो हसरो चेहरोच बोलताय. बरा झाला हा तु सगला विसरून पुढे गेलसं ता.  "कोण तुम्ही? म्हणजे मी खरचं नाही ओळखल तुम्हाला. म्हणजे तुम्ही ओळखीच्या वाटताय मला पण नक्कि कोण तेच आठवत नाहीयेय." ,विधीता आठवण्याचा प्रयत्न करत त्या म्हाताऱ्या बाईला म्हणाली. तेवढ्यात मध्येच अवनी त्या म्हाताऱ्या बाईला म्हणाली, "अहो आजी ही विधीता आहे. मुंबाईला राहते आणि ही इथे पहिल्यांदाच आलीय. ही तुमची वृंदा कशी असेल??"  "होय काय माफ कर हा बाय माज. बाकि सगला वेगला असला तरी तोच चेहरो, ताच गोड हसू म्हनून माज वाटला हो ! ओलखन्यात चूक झाली असात." म्हाताऱ्या आजीचा चेहरा पडला होता. ती एवढ बोलून तिथून निघूनही गेली. विधीताला त्या म्हाताऱ्या बाईबद्दल खूप वाईट वाटत होत. "बिचाऱ्या आजी. ही वृंदा कोण असेल? विधीता विचार करत स्वतःशी म्हणाली. "अगं ते सोड. तु काय एवढा विचार करतेस. ते बघा आपण त्या दुकानात जावू." ,स्वाती एका दुकानाकडे बोट दाखवत तिला म्हणाली. त्या तिघी त्या दुकानात गेल्या. तिथे मातीने बनवलेल्या फार छान कलाकृती होत्या. वेगवेगळे प्राणी, छोट्या-मोठ्या आकाराची मडकी, इतर खूप काही मातीच्या बनवलेल्या नक्षीदार कलाकृती होत्या. अवनी आणि स्वातीने खूप काही घेतलं. पण विधीताला काही पसंतच पडत नव्हत. ती इतर दुकानात जावून बघून येते अस म्हणत ती बाकिची दुकान फिरायला लागली. २-४ दुकान फिरल्यावर तिला एका दुकानात एक मुर्ती दिसली. किती मोहक होती ती! मोहनाची जी होती! तिला ती मुर्ती फार आवडली. तीने लागलीच ती विकत घेतली. तिला ती मूर्ती अवनी आणि स्वातीला दाखवायची होती. त्या दोघी समोरच पलिकडच्या  दुकानात होत्या. ती त्या मूर्तीला नीट जपून हातात धरून नेत त्यांच्याकडे जात होती. अचानक एका माणूस तिच्या बाजूने गेला. त्याच्या हातात असणाऱ्या एका वस्तूचा तिला स्पर्श झाला. तिला त्या स्पर्शाने एक झटका बसल्यासारख झालं. तिने मागे वळुन बघितलं. तो माणूस तिला पाटमोरा जाताना दिसला. तो अबोली शर्ट घातलेला, त्याने हाथ फोल्ड केलेले, खाली काळी पॅन्ट घातलेली, सावळ्या रांगाचा, उंच पण भारदस्त शरीरयष्टी असा होता. पण विधीताच लक्ष वेधून घेतलं त्याच्या हातात असलेल्या त्या बासुरीने. हिच तर तिच्या हाताला लागली होती. ती त्या पाठमोऱ्या आकृतीकडे स्तब्धपणे बघतच उभी राहीली. पण तिचं मन तर त्याला साद घालत होत. त्याच्या दूर जाण्याने तिला फार त्रास होत होता. तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. अचानक तो त्या गर्दीत कुठेतरी हरवुन गेला. पण ती तशीच बघत बसली.

क्रमशः

🎭 Series Post

View all